AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गावोगावी मराठा समाजाच्या बैठका, लोकसभेसाठी मराठा समाजाकडून उमेदवार देणार

lok sabha election 2024: मावळ लोकसभा मतदारसंघात चिंचवड, मावळ, कर्जत मोठ्या प्रमाणात मराठा समाज आहे. त्यामुळे येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत मराठा समाजाच्या मतदानाचा प्रभाव हा उमेदवारांना दिसून येणार आहे.

गावोगावी मराठा समाजाच्या बैठका, लोकसभेसाठी मराठा समाजाकडून उमेदवार देणार
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Mar 18, 2024 | 11:26 AM
Share

मावळ, पुणे | 18 मार्च 2024 : मराठा आरक्षणासाठी मराठा आंदोलन सुरु करण्यात आहे. राज्य सरकारने मराठा समाजास दहा टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. परंतु हा निर्णय मराठा समाजास मान्य नाही. यामुळे मराठा समाजाने गावागावत बैठका घेणे सुरु केले आहे. या बैठकांच्या माध्यमातून लोकसभेसाठी उमेदवार देण्याचा निर्णय घेतला जात आहे. अनेक ठिकाणी मोठ्या संख्येने उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहे. यामुळे लोकसभा निवडणुका ईव्हीएमवर घेता येणार नाही.

मावळ लोकसभेसाठी उमेदवार देणार

मावळ लोकसभा मतदारसंघात मराठा समाज उमेदवार देणार आहे. राठा समाजाच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मावळ लोकसभा मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडीकडून उमेदवार देण्यात येणार आहे. आता दुसरीकडे मावळ लोकसभा मतदारसंघात मराठा समाजाकडून देखील उमेदवार देण्यात येणार आहे. त्यासाठी मावळ तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने गावोगावी बैठका घेण्यास सुरुवात केलेली आहे.

राज्य सरकारकडून फसवणूक

राज्य सरकारने गाजर दाखऊन मराठा समाजाची फसवणूक केली आहे. त्यासाठी येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत आपला सरकारला हिसका दाखवायचा आहे. दरम्यान प्रत्येक गावातून दोन उमेदवार देण्याची चर्चा या बैठकीत करण्यात आली. मावळ लोकसभा मतदारसंघात चिंचवड, मावळ, कर्जत मोठ्या प्रमाणात मराठा समाज आहे. त्यामुळे येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत मराठा समाजाच्या मतदानाचा प्रभाव हा उमेदवारांना दिसून येणार आहे.

दरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणावर चर्चा करण्यासाठी 24 मार्चला बैठक बोलवली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मराठ्यांना कायद्याने खेटायचे ठरवले आता मराठेही कायद्यानेच खेटणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

चौघांनी जीवन संपवले

आधी आरक्षण नंतर इलेक्शन म्हणत आरक्षणासाठी मराठवाड्यात चार जणांनी जीवन संपवले. आष्टी, बीड, बदनापूर, रेनापूर येथे आत्महत्याच्या घटना घडल्या. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी स्टेटस ठेवून तसेच पत्र लिहून यांनी जीवन संपवले. उद्धव कोल्हे, नंदकुमार जाधव,चंद्रकांत पतंगे, दिलीप सोनवणे असे चार जणांची नावे आहेत.

Follow Us
माझ्या शेतातून एक किलो सोयाबीन काढून दाखवा, नाहीतर... शेतकरी संतप्त
Viral Video : माझ्या शेतातून एक किलो सोयाबीन काढून दाखवा, नाहीतर... संतप्त शेतकऱ्याचं सरकारला आव्हान
गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात राडा; थेट पोलिस...अहिल्यानगरच्या शेवगाव...
गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात राडा; थेट पोलिस... अहिल्यानगरच्या शेवगावात नेमकं काय घडलं?
दिल्लीत SIR नोटिसांचा धडाका; आडवाणी, जयशंकर, केजरीवालांसह...
दिल्लीत SIR नोटिसांचा धडाका; आडवाणी, जयशंकर, केजरीवालांसह दिग्गजांच्या नावांची पडताळणी, नेमकं प्रकरण काय?
आठ महिन्यांपूर्वीचं आश्वासन पुन्हा चर्चेत; राहुल नार्वेकरांची जैन...
आठ महिन्यांपूर्वीचं आश्वासन पुन्हा चर्चेत; राहुल नार्वेकरांची निलेशचंद्र मुनींशी भेट
गणपती विसर्जनावेळी दोन गटांमध्ये तुफान राडा; वादानंतर दगडफेक...
गणपती विसर्जनावेळी दोन गटांमध्ये तुफान राडा; वादानंतर दगडफेक... व्हिडीओ व्हयरल
राज ठाकरेंना मुख्यमंत्री होण्यासाठी...अमित ठाकरेंच्या इच्छेबाबत भरत...
राज ठाकरेंना मुख्यमंत्री होण्यासाठी... अमित ठाकरेंच्या इच्छेबाबत भरत गोगावलेंचा थेट पलटवार
पाऊस सरासरीपेक्षा कमी; शेतकऱ्यांसाठी रोहित पवारांचा आक्रमक पवित्रा
पाऊस सरासरीपेक्षा कमी; शेतकऱ्यांसाठी रोहित पवारांचा आक्रमक पवित्रा, थेट...
हर्षवर्धन सपकाळांचे आणखी एक शिलेदार भाजपच्या वाटेवर,
मोठी बातमी! हर्षवर्धन सपकाळांचे आणखी एक शिलेदार भाजपच्या वाटेवर, पक्ष सोडण्याआधीच म्हणाले...
डीजेच्या तालावर अनिल बोंडेंनी धरला ठेका; अमरावतीत गणपती विसर्जन...
डीजेच्या तालावर आमदार अनिल बोंडेंनी धरला ठेका; अमरावतीत गणपती विसर्जन मिरवणुकीचा जल्लोष
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा