Maratha Morcha: बीडमध्ये मराठा समाजाचा एल्गार; परवानगी नाकारुनही मोर्चाची जय्यत तयारी

सकाळी 11 वाजता छत्रपती शिवाजी चौकातून या मोर्चाला सुरुवात होईल. मात्र, पोलिसांनी मोर्चाला परवानगी नाकारल्यामुळे आता पुढे काय घडणार, हे पाहावे लागेल. | Maratha Morcha

Maratha Morcha: बीडमध्ये मराठा समाजाचा एल्गार; परवानगी नाकारुनही मोर्चाची जय्यत तयारी
मराठा आरक्षण आंदोलन, फाईल फोटो
Follow us
| Updated on: Jun 05, 2021 | 7:51 AM

बीड: सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाचे सामाजिक आणि शैक्षणिक आरक्षण रद्द केल्यानंतर बीडमध्ये राज्यातील पहिला मराठा मोर्चा (Maratha Morcha) निघणार आहे. बीडमध्ये निघणाऱ्या या मराठा क्रांती मोर्चाला (Maratha Kranti Morcha) पोलिसांनी परवानगी नाकारली असली तरी मोर्चेकऱ्यांकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. बीड शहरात अनेक ठिकाणी भगव्या पताका लावण्यात आल्या आहेत. सकाळी 11 वाजता छत्रपती शिवाजी चौकातून या मोर्चाला सुरुवात होईल. मात्र, पोलिसांनी मोर्चाला परवानगी नाकारल्यामुळे आता पुढे काय घडणार, हे पाहावे लागेल. (Maratha Kranti Morcha in beed)

शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात येणार आहे. एकीकडे संभाजीराजे छत्रपती यांनी कोरोनाच्या काळात मोर्चे काढू नका, अशी भूमिका घेतली असताना विनायक मेटे मोर्चा काढण्यावर ठाम होते. काही दिवसांपूर्वीच त्यांनी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांची भेट घेऊन मोर्चाला परवानगी मिळावी म्हणून निवेदन सादर केले होते. सदरचा मोर्चा मराठा क्रांती मोर्चांच्या प्रथेप्रमाणे शांततेत व शिस्तीत, कायदा व सुव्यवस्थेला कुठलीही बाधा येऊ न देता काढला जाईल. त्याचप्रमाणे करोना महामारीच्या काळातील आरोग्यविषयक सर्व नियमांचे पालन करून, सोशल डिस्टनसिंग पाळून हा मोर्चा काढला जाईल याची खात्री असावी, असे या निवेदनात म्हटले होते. मात्र, त्यानंतरही पोलिसांकडून या मोर्चाला परवानगी नाकरण्यात आली होती.

संभाजीराजे छत्रपती राज्यभरात मोर्चे काढण्याच्या विरोधात

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात मोर्चे काढण्याला संभाजीराजे छत्रपती यांचा विरोध आहे. आंदोलन काय असतं, हे कोणीही मला शिकवू नये. आक्रमक व्हायला दोन मिनिटं लागतात. आंदोलनाला काय लागतं, आता लगेच करु. पण त्यामध्ये कोणी मयत झाले तर त्याला जबाबदार कोण, शाहुंचा वंशज, असा सवाल संभाजीराजे यांनी उपस्थित केला होता.

मोर्चे काढण्याची गरजच काय?

जेव्हा एखादी गोष्ट राज्यकर्त्यांपर्यंत पोहोचवायची असते, तेव्हा मोर्चे काढले जातात. मराठा समाजाने 58 मोर्चे काढून आपलं म्हणणं सरकारपर्यंत पोहोचवलं आहे. मराठा समाजाला काय हवंय, हे राज्यकर्त्यांना माहिती आहे. मग परत एकदा मोर्चे काढून लोकांना वेठीस का धरायचे, असा सवाल संभाजीराजे यांनी इतर मराठा नेत्यांना विचारला होता.

रस्त्यावर उतरून कोरोनामुळे लोक मेले तर काय करायचं? राज्य सरकारने दखल घेतली नाही तर आंदोलन करावेच लागेल. मात्र, सर्वप्रथम राज्यकर्ते मराठा समाजासाठी कोणत्या गोष्टी करायला तयार आहेत, हे त्यांनी सांगावे. श्रीमंत मराठ्यांना एक टक्काही आरक्षण देऊ नका. पण 30 टक्के गरीब मराठा समाजाला मदत मिळालीच पाहिजे, असे संभाजीराजे यांनी सांगितले.

संबंधित बातम्या:

‘श्रीमंत मराठ्यांना एक टक्काही आरक्षण नको, पण बहुजनांना जो न्याय, तोच गरीब मराठ्यांनाही द्या’

संभाजी छत्रपती आणि भाजपात मतभेद वाढतायत? पाटील म्हणतात, पक्षाने किती सन्मान दिला हे संभाजीराजे सांगत नाहीयेत!

Maratha Reservation: शरद पवार आणि संभाजीराजेंची अवघ्या 10 मिनिटांची चर्चा सकारात्मक कशी, विनायक मेटेंचा सवाल

(Maratha Kranti Morcha in beed)

Non Stop LIVE Update
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?.
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका.
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर.
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय.
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल.
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?.