AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रचाराचं काउंटडाउन सुरू असताना जरांगे जाणार भुजबळांच्या बालेकिल्ल्यात, समोर आलं मोठं कारण!

विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचं काउंटडाऊन सुरू झालं आहे. येत्या 20 नोव्हेंबरला विधानसभेसाठी मतदान होणार आहे, त्यापूर्वी मोठी बातमी समोर आली आहे. मनोज जरांगे पाटील येवल्याला जाणार आहेत.

प्रचाराचं काउंटडाउन सुरू असताना जरांगे जाणार भुजबळांच्या बालेकिल्ल्यात, समोर आलं मोठं कारण!
| Updated on: Nov 15, 2024 | 8:09 PM
Share

विधानसभा निवडणुकीच्या मतदानसाठी आता अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. येत्या वीस नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. तर तेवीस नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. प्रचाराचं काउंटडाउन सुरू असतानाच मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे मनोज जरांगे पाटील हे येवल्याला जाणार आहेत. येवल्यामध्ये यावेळी विधानसभा निवडणुकीत हायहोल्टेज मुकाबला पाहायला मिळू शकतो. राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून येवला विधानसभा मतदारसंघात छगन भुजबळ हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत, तर शरद पवार गटाकडून माणिकराव शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

मनोज जरांगे पाटील हे अजूनही मराठा समाजाला ओबीसीमधूनच आरक्षण मिळावं या आपल्या मागणीवर ठाम आहेत. मात्र दुसरीकडे छगन भुजबळ यांनी मात्र ओबीसीचं नेतृत्व करताना मनोज जरांगे पाटील यांच्या या मागणीला मोठा विरोध केला आहे. याच मुद्द्यावरून आता येवल्याची निवडणूक चर्चेत आहे. या मतदारसंघाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. दरम्यान मनोज जरांगे पाटील हे येवल्याला जाणार आहेत. मात्र हा आपला राजकीय दौरा नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.  ‘येवला दौरा हा राजकीय नसून, त्या ठिकाणी आमच्या एका सहकाऱ्याची आजी वारली आहे, त्यामुळे सांत्वनपर भेट आहे. ही राजकीय भेट नसून सामाजिक आणि दुःखाची भेट आहे,’ असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.

दरम्यान यावेळी बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं की, देवेंद्र फडणवीस पहिल्यांदा खरं बोलले, मराठा समाज कट्टर हिंदुत्ववादी आहे. मराठा समाज महायुतीच्या बाजूने आहे. मराठ्यांविषयी त्यांनी  पहिल्यांदा चांगली आणि खरी गोष्ट बोलली. परंतु हिंदुत्ववादी हिंदुत्ववादी म्हणून आमचे लोक मरायला लागले आहेत. मराठा आरक्षणामुळे आमचे हाल सुरू आहेत. आरक्षणापासून रोखायला नको होतं. तुम्हाला वाटतं महायुतीसाठी मराठ्यांनी काम केलं तर त्यांना आरक्षण देण्याची जबाबदारी तुमची होती. जसे आम्ही तुमच्यासाठी कट्टर होतोच तसे तुम्ही आमच्यासाठी कट्टर नाही, आम्हाला माहिती आहे महाविकास आघाडी फसवत आहे, असं जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.

Follow Us
थरकाप उडवणारा घटनाक्रम, टँकरचा भीषण अपघात, विरार पश्चिमेला जोडणाऱ्या प
थरकाप उडवणारा घटनाक्रम, टँकरचा भीषण अपघात, विरार पश्चिमेला जोडणाऱ्या प.
ठाकरेंचा दगाबाजी करायचा संकल्प, पण संधी मिळाली नाही; भाजप नेत्याचं...
ठाकरेंचा दगाबाजी करायचा संकल्प, पण संधी मिळाली नाही; भाजप नेत्याचं....
एकच जागा, वाढती नाराजी? ठोंबरे पाटील यांचे ते स्टेटस चर्चेत
एकच जागा, वाढती नाराजी? ठोंबरे पाटील यांचे ते स्टेटस चर्चेत.
साहेब, आपला आदेश..., ती ट्वीटर पोस्ट अन् चर्चेला उधाण, विधान परिषदेची
साहेब, आपला आदेश..., ती ट्वीटर पोस्ट अन् चर्चेला उधाण, विधान परिषदेची.
सपकाळांच्या अंतरात्मा वक्तव्यावर शिंदेंचा चिमटा; आत्मा हरवला तर....
सपकाळांच्या अंतरात्मा वक्तव्यावर शिंदेंचा चिमटा; आत्मा हरवला तर.....
रुपाली चाकणकरांचा पटलवार! खरात प्रकरणी थेट कोर्टात धाव, नेमकी भानगड का
रुपाली चाकणकरांचा पटलवार! खरात प्रकरणी थेट कोर्टात धाव, नेमकी भानगड का.
बच्चू कडू शिवसेनेत दाखल, आता पुढे काय? शिंदे म्हणाले, विश्वासाला तडा..
बच्चू कडू शिवसेनेत दाखल, आता पुढे काय? शिंदे म्हणाले, विश्वासाला तडा...
...म्हणून कॉंग्रेस पक्षाची विधानपरिषेदत उमेदवार देण्यातून माघार, नेमक
...म्हणून कॉंग्रेस पक्षाची विधानपरिषेदत उमेदवार देण्यातून माघार, नेमक.
शिवसेनेकडून दुसऱ्या जागेसाठी नीलम गोऱ्हे यांचं नाव समोर, कारण...
शिवसेनेकडून दुसऱ्या जागेसाठी नीलम गोऱ्हे यांचं नाव समोर, कारण....
बच्चू कडूंची शिवसेनेत घरवापसी; पदासाठी नाही, मुद्द्यांसाठी लढणार....
बच्चू कडूंची शिवसेनेत घरवापसी; पदासाठी नाही, मुद्द्यांसाठी लढणार.....