AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

SEBC 10 टक्के, EWS 10 टक्के आणि आता ओबीसी… मराठा आरक्षणावरुन छगन भुजबळांचा संताप

लातूरमधील एका तरुणाच्या आत्महत्येनंतर ओबीसी समाजात मराठा आरक्षणाबाबत अस्वस्थता पसरली आहे. छगन भुजबळ यांनी मराठा समाजातील शिक्षित नेत्यांना त्यांच्या आरक्षणाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले आहेत.

SEBC 10 टक्के, EWS 10 टक्के आणि आता ओबीसी... मराठा आरक्षणावरुन छगन भुजबळांचा संताप
| Updated on: Sep 12, 2025 | 11:08 AM
Share

मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याच्या मागणीमुळे ओबीसी आरक्षणाला धोका निर्माण होईल, अशी भीती ओबीसी समाजामध्ये वाढत आहे. याच भीतीतून लातूर जिल्ह्यातील एका ३५ वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. भरत महादेव कराड (३५) असे या तरुणाचे नाव असून, तो लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यातील वांगदरी गावात राहत होता. या घटनेनंतर ओबीसी समाजामध्ये प्रचंड अस्वस्थता पाहायला मिळत आहे. आता याप्रकरणी ओबीसी नेते आणि राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी संताप व्यक्त करत मराठा आरक्षणासंदर्भात पुन्हा एकदा महत्त्वपूर्ण विधान केले आहे. यावेळी त्यांनी मराठा समाजातील शिक्षित नेते आणि लोकप्रतिनिधींना आरक्षणाबद्दल काही थेट प्रश्न विचारले आहेत.

छगन भुजबळ यांनी नुकतंच प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मराठा समाजातील शिक्षित नेते आणि लोकप्रतिनिधींना सवाल केले. मी मराठा समाजातील शिक्षित, माजी आणि सध्याच्या लोकप्रतिनिधींना एक प्रश्न विचारू इच्छितो. ज्यांना आरक्षण म्हणजे काय हे समजत नाही, अशा अशिक्षित व्यक्तींकडून मला कोणत्याही उत्तराची अपेक्षा नाही.” असा टोला छगन भुजबळांनी लगावला.

छगन भुजबळ काय म्हणाले?

जे मुख्यमंत्री, मंत्री, खासदार, आमदार शिक्षित आहेत आणि ज्यांना आरक्षण म्हणजे काय हे माहिती आहे, त्याच्यासाठी मी सांगतो. जेव्हा ५० टक्के आरक्षण आणि ५० ओपन असं होतं, तेव्हा ब्राह्मण समाज २ ते ३ टक्के होता. पण तेव्हा मराठा समाज हा ५० टक्के होता. त्यानंतर मग आंदोलन झालं आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रापासून गुजरातपर्यंत मराठा समाजाला १० टक्के जे आर्थिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास आहेत, पण सामाजिक दृष्ट्‍यामागास नाहीत अशांना हे आरक्षण दिले. त्यातही मराठा समाज एकटाच होता. त्यानंतरही वेगळं आरक्षण हवं अशी मागणी करण्यात आली. यानंतर मराठा समाजाला पुन्हा १० टक्के आरक्षण देण्यात आले आहे. त्यानतंर मराठा समाजाला ओबीसीत घ्या यासाठी आंदोलन होत आहे. यासाठी प्रेशर टाकले जात आहे, असा आरोप छगन भुजबळ यांनी केला.

यामुळे मला त्यांना विचारायचं की तुम्हाला १० टक्के मराठा आरक्षण नको का? ते रद्द करायचं का? ते रद्द केलं तर EWS मध्ये तुम्ही ८० ते ९० टक्क असतात, तेही तुम्हाला नको आहे का? त्यासोबत तुम्ही जे ओपनमध्ये फिरत असता तेही तुम्हाला नको आहे का याचं उत्तर मराठा समाजातील आजी माजी लोकप्रतिनिधींनी मला द्यावे. ज्यांना काही समजत नाहीत, अशिक्षित आहेत, माहिती नाही, त्यांच्याकडून या उत्तराची अपेक्षा नाही. त्यामुळे माझी मराठा समाजातील आजी माजी लोकप्रतिनिधींनी विनंती आहे की तुम्ही बोलायला हवं. त्यांनी पुढे येऊन सांगावं की आम्हाला SEBC १० टक्के, EWS १० टक्के आणि खुल्या वर्गातील आरक्षण नको, असं सांगावं. फक्त ओबीसींच आरक्षण हवं आहे, असं त्यांनी सांगावं, असेही छगन भुजबळ यांनी म्हटले.

पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.