जरांगे पाटलांची प्रकृती बिघडली, दिवसभरात दुसऱ्यांदा डॉक्टरांचे पथक, शासनाला कळवला “हा” निर्णय

manoj Jarange Patil: मनोज जरांगे पाटील उपचार घेत नसल्याचे प्रशासनाने सरकारला लेखी कळवले आहे. तसेच राज्य शासनाच्या शिष्टमंडळाबाबत अजून कोणताही निरोप नाही, असेही तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी म्हटले.

जरांगे पाटलांची प्रकृती बिघडली, दिवसभरात दुसऱ्यांदा डॉक्टरांचे पथक, शासनाला कळवला हा निर्णय
मनोज जरांगे पाटील
Follow us
| Updated on: Jun 11, 2024 | 2:54 PM

मराठा आरक्षणासाठी लढणारे मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती बिघडली. उपोषणाच्या चौथ्या दिवशी त्यांना त्रास सुरु झाला. जरांगे पाटील यांचा रक्तदाब (बीपी) आणि मधुमेह (शुगर) कमी झाला आहे. त्यामुळे त्यांना उपचार सुरु करण्यासाठी डॉक्टरांचे पथक मंगळवारी दुसऱ्यांदा पुन्हा अंतरवाली सराटी येथे दाखल झाला आहे. जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर राजेंद्र पाटील यांच्यासह अंबडचे तहसीलदार चंद्रकांत शेळके पोहचले होते. तहसीलदार चंद्रकांत शेळके आणि जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर राजेंद्र पाटील या दोघांनीही जरांगे यांच्याकडे उपचार घेण्याची विनंती केली. मात्र ही विनंती जरांगे पाटलांनी धुडकावून लावली.

प्रशासनाने शासनाला कळवला मनोज जरांगे यांचा निर्णय

मनोज जरांगे पाटील उपचार घेत नसल्याचे प्रशासनाने सरकारला लेखी कळवले आहे. तसेच राज्य शासनाच्या शिष्टमंडळाबाबत अजून कोणताही निरोप नाही, असेही तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी म्हटले. जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या आज चौथा त्यांना भेटण्याठी आज ख्रिश्चन धर्मगुरू आले. अंतरवाली सराटी येथील उपोषणस्थळी येत जरांगे पाटील यांच्या तब्येतीची विचारपूस केली.

हे सुद्धा वाचा

शरद पवार यांना साकडे

मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरु आहे. परंतु शासनाकडून दखल घेतली गेली नाही. यामुळे नाशिकमध्ये शरद पवार यांना साकडे घालण्यात आले. मराठा आरक्षणासाठी शरद पवार यांनी पुढाकार घ्यावा, अशी मागणी नाशिकमधील सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आली आहे. अंतरवली सराटी येथे सुरू असलेल्या मनोज जारंगे पाटील यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये सकल मराठा समाजाची बैठक झाली. त्यात शरद पवार यांना लक्ष देण्याची मागणी करण्यात आली.

राजकीय नेत्यांना दिले हे इशारे

  • सर्व आमदार खासदारांनी एकत्रित अंतरवली सराटी येथे जाऊन जरांगे पाटील यांचे आंदोलन स्थगित करण्यासाठी प्रयत्न करावे त्यांना हमी द्यावी
  • जर हे नेते आंतरवाली सराटी येथे गेले नाही तर पहिलं आंदोलन शरद पवार यांच्या घरापासून सर्वप्रमुख राजकीय नेत्यांच्या घरासमोर केले जाईल
  • आमदार खासदारांना जर सुरक्षित मतदारसंघात फिरायचं असेल तर आंतरवाली सराटी येथे जाऊन आंदोलन थांबवण्यासाठी प्रयत्न करावे
  • नाशिकमधील सकल मराठा समाजाच्या वतीने शरद पवार यांच्यासह सर्वच राजकीय नेत्यांना इशारा
Non Stop LIVE Update
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना.
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट.
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा.
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो.
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?.
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा.
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका.
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका.
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली.
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?.