AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मराठा समाजाच्या एसईबीसी आरक्षणावर स्टे आहे की नाही? कोर्टाने काय म्हटलं?; सुनावणीवेळी काय काय घडलं?

आज मुंबई हायकोर्टात मराठा आरक्षणावरील सुनावणी झाली. आज वकिलांनी काय युक्तिवाद केला ते जाणून घेऊयात.

मराठा समाजाच्या एसईबीसी आरक्षणावर स्टे आहे की नाही? कोर्टाने काय म्हटलं?; सुनावणीवेळी काय काय घडलं?
Maratha-reservation_-High-court-Mumbai-highcourt
| Updated on: Jun 11, 2025 | 6:42 PM
Share

राज्य सरकाराने मराठा समाजाला एसईबीसी कायद्याअंतर्गत 10 टक्के आरक्षण दिले होते. हे आरक्षण सरकारी नोकऱ्या आणि शिक्षणात देण्यात आले होते. मात्र या आरक्षणाच्या विरोधात हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आल्या. आरक्षणाच्या बाजुने देखील याचिका दाखल आहेत. आज मुंबई हायकोर्टात मराठा आरक्षणावरील सुनावणी झाली. आज वकिलांनी काय युक्तिवाद केला ते जाणून घेऊयात.

सुप्रीम कोर्टाने मुंबई हायकोर्टाला मे महिन्यात मराठा आरक्षणावरील सर्व याचिकांवर सुनावणी घेण्याचे निर्देश दिले होते.आरक्षणाच्या विरोधातील याचिकांमुळे उच्च शिक्षणातील मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना आरक्षण देण्यात अडचण येत असल्याचे समोर आले होते. त्यामुळे मराठा आरक्षणाच्या वैधतेबाबतची नव्याने सुनावणी आजपासून मुंबई हायकोर्टात होत आहे. मराठा आरक्षण वैध ठरणार की नाही याची फैसला होणार आहे.

हायकोर्टाचे न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांच्या नेतृत्वाखालील विशेष त्रिसदस्यीय पूर्णपीठ सुनावणी घेत आहे. सुरुवातीला प्रकरण अंतरिम दिलास्यासाठी घ्यायचं की फायनल ऑर्डरसाठी यावर वकिल आणि न्यायमूर्ती यांच्यात युक्तीवाद सुरू झाला. यावेळी विरोधी वकिलांनी “जो पर्यंत तारीख होत नाही तो पर्यंत स्टे द्यावा असा युक्तिवाद केला. यानंतर “फायनल सुनावणीसाठी प्रकरण घेण्यात यावं” असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला.

मराठा आरक्षणाच्या सुनावणीबाबत बोलताना महाराष्ट्राचे महाधिवक्ता बिरेंद्र सराफ म्हणाले की, “सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाला आधीच अंतरिम दिलासा आहे.मग पून्हा सुनाणी घेण्यात अर्थ नाही, आता अंतिम सुनावणीला सुरूवात करायला हवी.”

यानंतर न्यायमूर्तींनी म्हटले की, “मराठा आरक्षणाच्या विरोधात अनेक याचिका आहेत.त्यामुळे आपण सर्वांनी एकत्र बसून विरोधकांची बाजून नेमकं कोणं मांडणार हे ठरवा.”

यावर विरोधी वकिल प्रदीप संचेती यांनी म्हटले की, “प्रत्येक याचिकाकर्त्याने विविध विषय वाटून घेतले आहे. प्रत्येकाला आपलं मत मांडायचं आहे. त्यामुळे प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार द्यायला हवा.

यानंतर न्यायमूर्ती म्हणाले की, “पुढील सुनावणी १८ व १९ जुलैला सायंकाळी ५ वाजता घेऊया का?” यावर संचेती म्हणाले, “आम्हाला अडीच ते तीन दिवस युक्तिवाद करण्यासाठी द्या”. यानंतर सरकारी वकिलांनी, “आम्हाला युक्तिवादासाठी दोन दिवस हवे आहेत.” अशी मागणी केली.

यानंतर न्यायाधिश घुगे यांनी, “मराठी आरक्षणाची पुढील सुनावणी १८ तारखेला ३ वाजता आणि १९ जूलै २०२५ रोजी पुर्ण दिवस चालेल” अशी माहिती दिली. त्यानंतर १९ जुलै ला पुढची तारीख जाहीर केली जाणार आहे.

आज मराठा समजाच्या एसईबीसी आरक्षणवर कुठलाही स्टे दिलेला नाही, त्यामुळे मराठा विद्यार्थ्याना एसईबीसी एडमिशन चा मार्ग मोकळा झाला आहे. आता पुढ़ील सुनावणी पुढ़िल महिन्यत १८ -१९ जुलै ला होणार आहे.

भाजप-सेनेचे 200 जागांवर एकमत, शिंदेंच्या घरी पहाटेपर्यंत मॅरेथॉन बैठक
भाजप-सेनेचे 200 जागांवर एकमत, शिंदेंच्या घरी पहाटेपर्यंत मॅरेथॉन बैठक.
ठाकरे बंधूच्या युती महायुतीशी लढत,मुंबईत कोणाचे किती नगरसेवक जिंकणार?
ठाकरे बंधूच्या युती महायुतीशी लढत,मुंबईत कोणाचे किती नगरसेवक जिंकणार?.
डोहाळे जेवणाचा खर्च आमचा.. राणांच्या त्या विधानानंतर अंधारेंचं आव्हान
डोहाळे जेवणाचा खर्च आमचा.. राणांच्या त्या विधानानंतर अंधारेंचं आव्हान.
ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा पण जागा वाटप गुलदस्त्यात!
ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा पण जागा वाटप गुलदस्त्यात!.
शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या..
शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत....
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप.
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं.
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा.
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का.