AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आझाद मैदानात हायव्होल्टेज ड्रामा, पोलिसांच्या नोटीशीवर मनोज जरांगेंनी घेतली ठाम भूमिका, आता संघर्ष शिगेला

मुंबईच्या आझाद मैदानावर सुरू असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनात तणाव वाढला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखालील आंदोलन उच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही सुरूच आहे. पोलिसांनी आंदोलकांना नोटीस बजावली आहे परंतु ती स्वीकारण्यास आंदोलकांनी नकार दिला आहे.

आझाद मैदानात हायव्होल्टेज ड्रामा, पोलिसांच्या नोटीशीवर मनोज जरांगेंनी घेतली ठाम भूमिका, आता संघर्ष शिगेला
Manoj Jarange Patil
| Updated on: Sep 02, 2025 | 2:19 PM
Share

मराठा आरक्षणासाठी मुंबईच्या आझाद मैदानात आंदोलन सुरु आहे. मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील हे सध्या उपोषणासाठी आझाद मैदानात बसले आहेत. आता या आंदोलनादरम्यान पोलीस आणि मनोज जरांगे यांच्यात तणाव वाढला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आझाद मैदान रिकामं करण्याची नोटीस बजावली आहे. मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्या कोअर कमिटीने ही नोटीस स्वीकारण्यास नकार दिला आहे. न्यायालयाच्या निर्देशांचे उल्लंघन केल्यामुळे पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

मराठा आंदोलनामुळे मुंबईतील जनजीवन विस्कळीत होत असल्याचे मुंबई उच्च न्यायालयात दाखल झालेल्या जनहित याचिकेवर सुनावणी झाली. न्यायालयाने राज्य सरकारला तातडीने आझाद मैदान रिकामे करण्याचे आदेश दिले आहेत. न्यायालयाच्या आदेशानुसार, आंदोलकांना दक्षिण मुंबईतील सीएसएमटी, मरीन ड्राईव्ह, हुतात्मा चौक आणि इतर भागांतून बाहेर काढण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर, मुंबई पोलिसांनी मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्यासोबतच्या कोअर कमिटी सदस्यांना नोटीस बजावली आहे.

या नोटीसमध्ये, आंदोलनासाठी दिलेल्या अटी आणि शर्तींचे उल्लंघन केल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या परवानगीनुसार, हे आंदोलन फक्त एक दिवसासाठी आणि ठराविक वेळेसाठी होतं. मात्र, मनोज जरांगे यांनी उपोषण सुरु ठेवले. त्यामुळे नियमांचं उल्लंघन केल्याचे पोलिसांनी म्हटलं आहे.

आंदोलनासाठी परवानगी नाही

आता पोलिसांनी बजावलेली ही नोटीस मनोज जरांगे पाटील यांनी स्वीकारलेली नाही. मनोज जरांगे पाटील यांनी या नोटीसवर सही केलेली नाही. त्यांच्यासोबतच कोअर कमिटीच्या सदस्यांनीही ही नोटीस नाकारली. पोलिसांच्या म्हणण्यानुसार त्यांनी जाहीर सभा, आंदोलने व मिरवणुका नियम, २०२५ आणि उच्च न्यायालयाच्या आदेशांचं पालन केलं नाही. त्यामुळे, यापुढे आंदोलनासाठी परवानगी नाकारण्यात येत असून, त्यांनी आझाद मैदान तात्काळ रिकामे करावे, असं नोटीसमध्ये म्हटलं आहे.

कुठल्याही परिस्थितीत 3 वाजेपर्यंत मैदान सोडणार नाही

दरम्यान राज्य सरकारने मराठा आरक्षण आंदोलनाबाबत उच्च न्यायालयात भूमिका मांडल्यानंतर आज पुन्हा सुनावणी पार पडली. मनोज जरांगे पाटील यांच्यावतीने नामवंत वकील सतिश माने शिंदे हे मैदानात उतरले आहेत. माने शिंदे हे उच्च न्यायालयात आंदोलनांची बाजू मांडत असून सुरुवातीलाच आंदोलकांकडून झालेल्या गैरकृत्याबद्दल न्यायालयात दिलगिरी व्यक्त केली. या सुनावणीत न्यायालयाने दुपारी 3 वाजेपर्यंत आझाद मैदान खाली करण्याचे निर्देश आंदोलकांना दिले आहेत. तसेच, पोलिसांनाही कायद्यानुसार कारवाई करण्याचे बजावले आहे. मात्र, कुठल्याही परिस्थितीत 3 वाजेपर्यंत मैदान सोडणार नाही, अशी भूमिका आंदोलकांची दिसून येत आहे.

Follow Us
तरुणाच्या मृत्यू प्रकरणात गुणरत्न सदावर्तेंची मोठी पावलं; पोलिसांत...
Lalbaugcha Raja : तरुणाच्या मृत्यू प्रकरणात गुणरत्न सदावर्तेंची मोठी पावलं; पोलिसांत तक्रार, अन् उद्या हायकोर्टात...
मराठवाड्याच्या पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू देणार नाही म्हणालात!
Amit Thackeray : मराठवाड्याच्या पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू देणार नाही म्हणालात! फडणवीसांचा जुना VIDEO दाखवत अमित ठाकरेंचा सवाल
मसाल्यांच्या बाजारात स्प्रिंको या नव्या सीझनिंग ब्रँडचे लॉन्चिंग
Goldie Group : मसाल्यांच्या बाजारात गोल्डी ग्रुपचा नवा धमाका; स्प्रिंको या नव्या सीझनिंग ब्रँडचे लॉन्चिंग
सण-उत्सवात सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; ढोल-ताशांमधील टोल...
Mumbai High Court : सण-उत्सवात सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; ढोल-ताशांमधील टोलवाद्यांवरही कोर्टाचा दणका
दुष्काळग्रस्त भागाची पाहणी अन् आमदार फुलांच्या पायघड्यांवरून चालले
Sanjay Shirsat : दुष्काळग्रस्त भागाची पाहणी अन् आमदार फुलांच्या पायघड्यांवरून चालले; अंबादास दानवेंकडून VIDEO ट्विट करत शिरसाट यांच्यावर टीका
दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार? सुनील तटकरेंनी स्पष्टच सांगितलं
NCP : दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार? सुनील तटकरे यांनी स्पष्टच सांगितलं...
बळीराजाचा दसरा-दिवाळी काळी होऊ देणार नाही! शिंदेंची मोठी ग्वाही
Maharashtra Drought : बळीराजाचा दसरा-दिवाळी काळी होऊ देणार नाही! शिंदेंची मोठी ग्वाही, पुढे म्हणाले...
डब्यात काय आणायचं, हेही शाळा ठरवणार? मेथीची भाजी आणल्याने...
Mira Bhayandar : डब्यात काय आणायचं, हेही शाळा ठरवणार? मेथीची भाजी आणल्याने विद्यार्थ्याला दंड केल्याचा आरोप; प्रशासन ॲक्शन मोडमध्ये
पैसेवाल्यांना आंदोलनाला साथ द्यायची नाही का? जरांगे पाटलांचा सवाल
Manoj Jarange : पैसेवाल्यांना आंदोलनाला साथ द्यायची नाही का? जरांगे पाटलांचा सवाल; पुढे म्हणाले...
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला; आजची सुनावणी....
Shivsena Symbol : शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला; आजची सुनावणी पुढे ढकलली, नवी तारीख काय?