AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोर्टाच्या आदेशानंतर मराठा आंदोलक परत जाणार का? मुंबईत सद्यस्थिती काय?

मुंबई उच्च न्यायालयाने मराठा आरक्षण आंदोलनातील आंदोलकांना आझाद मैदान तात्काळ सोडण्याचे आदेश दिले आहेत. मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखालील आंदोलकांनी हा आदेश मान्य करण्यास नकार दिला आहे.

कोर्टाच्या आदेशानंतर मराठा आंदोलक परत जाणार का? मुंबईत सद्यस्थिती काय?
| Updated on: Sep 02, 2025 | 3:16 PM
Share

मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावं, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनाचा पावित्रा घेतला आहे. मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषणाची हाक दिली असून गेल्या पाच दिवसांपासून त्यांचे उपोषण सुरु आहे. आता मराठा आरक्षणासाठी मुंबईच्या आझाद मैदानात सुरु असलेल्या आंदोलनाला आता न्यायालयाच्या आदेशामुळे एक वेगळं वळण मिळालं आहे. मुंबई उच्च न्यायालयाने दुपारी ३ वाजेपर्यंत आझाद मैदान रिकामे करण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत. पण आंदोलकांनी मैदान सोडण्यास ठाम नकार दिला आहे. त्यामुळे पोलीस आणि आंदोलकांमध्ये तणाव वाढला आहे.

राज्य सरकारने मराठा आरक्षण आंदोलनाबाबत उच्च न्यायालयात भूमिका मांडल्यानंतर आज पुन्हा सुनावणी पार पडली. मनोज जरांगे पाटील यांच्यावतीने नामवंत वकील सतिश माने शिंदे हे मैदानात उतरले आहेत. माने शिंदे हे उच्च न्यायालयात आंदोलनांची बाजू मांडत असून सुरुवातीलाच आंदोलकांकडून झालेल्या गैरकृत्याबद्दल न्यायालयात दिलगिरी व्यक्त केली. या सुनावणीत न्यायालयाने दुपारी 3 वाजेपर्यंत आझाद मैदान खाली करण्याचे निर्देश आंदोलकांना दिले आहेत. तसेच, पोलिसांनाही कायद्यानुसार कारवाई करण्याचे बजावले आहे. मात्र, कुठल्याही परिस्थितीत 3 वाजेपर्यंत मैदान सोडणार नाही, अशी भूमिका आंदोलकांची दिसून येत आहे.

मराठा आंदोलनामुळे मुंबईतील जनजीवन विस्कळीत झाल्याची तक्रार करणाऱ्या एका जनहित याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात आज सुनावणी झाली. या सुनावणीदरम्यान, न्यायालयाने आंदोलकांना तातडीने आझाद मैदान रिकामे करण्याचे निर्देश दिले. सध्या पोलिसही कायद्यानुसार कारवाई करण्यास सांगितले. न्यायालयाच्या या आदेशानंतरही मराठा आंदोलकांनी आझाद मैदान सोडणार नाही, अशी भूमिका घेतली आहे.

एपीएमसी मार्केटजवळ गाड्या लावा

अनेक आंदोलकांनी एकत्र येत सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. मनोज जरांगे पाटील यांनीही आझाद मैदान रिकामे करण्याची नोटीस स्वीकारण्यास नकार दिला आहे. त्यामुळे मैदानात एक प्रकारे संघर्षमय परिस्थिती निर्माण झाली आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर मुंबई पोलिसांनी आझाद मैदान आणि आसपासच्या परिसरात मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. डीसीपी झोन १ चे प्रवीण मुंडे यांनी आझाद मैदान परिसरात येऊन आंदोलकांना सहकार्य करण्याची विनंती केली आहे. पोलिसांनी आंदोलकांना त्यांच्या गाड्या एपीएमसी मार्केटजवळ लावण्यास सांगितले आहे. पोलिसांच्या या सूचनांना काही आंदोलकांनी सहकार्य करण्याची तयारी दर्शवली आहे, पण काही आंदोलकांकडून आम्ही दादांचा (जरांगे पाटील) निर्णय मान्य करू असे सांगण्यात येत आहे.

आंदोलकांकडून सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी

यावेळी पोलिसांकडून गाड्या काढल्या नाहीत तर कारवाई करावी लागेल, असे आवाहन केले जात आहे. तर आंदोलकांकडून आम्हाला थोडा वेळ द्या, आम्ही तुम्हाला सहकार्य करतोय, असं आंदोलकांनी पोलिसांना सांगितले आहे. यानंतर एका आंदोलकाने दादांनी कोर्टात जे सांगितलंय ते आता करा. आता वेगळं जे काही सांगितलं ते करा, त्यानंतर दादा तुम्हाला जो काही वेगळा निर्णय देतील तो देतील. आता तुम्ही स्वत निर्णय घेऊ नका. न्यायालयाने आपल्याला जे आदेश दिलेले आहेत, ते दादांनीही पाळा अशा सूचना दिल्या आहेत. त्यामुळे माझी विनंती आहे की पोलीस ज्या काही सूचना देतात त्या पाळा. यावेळी आंदोलकांकडून सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली जात आहे. तर दुसरीकडे मुंबईतील सीएसएमटी परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त पाहायला मिळत आहे.

सध्या सीएसएमटी परिसराला छावणीचे रुप आले आहे. आझाद मैदानापासून सीएसएमटी स्टेशन परिसरात मोठ्या प्रमाणात पोलिस, दंगल नियंत्रण पथक पाहायला मिळत आहे. मात्र मराठा आंदोलकांनी आझाद मैदानाचा परिसर सोडणार नाही, असे ठणकावून सांगितले आहे.

Follow Us
तरुणाच्या मृत्यू प्रकरणात गुणरत्न सदावर्तेंची मोठी पावलं; पोलिसांत...
Lalbaugcha Raja : तरुणाच्या मृत्यू प्रकरणात गुणरत्न सदावर्तेंची मोठी पावलं; पोलिसांत तक्रार, अन् उद्या हायकोर्टात...
मराठवाड्याच्या पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू देणार नाही म्हणालात!
Amit Thackeray : मराठवाड्याच्या पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू देणार नाही म्हणालात! फडणवीसांचा जुना VIDEO दाखवत अमित ठाकरेंचा सवाल
मसाल्यांच्या बाजारात स्प्रिंको या नव्या सीझनिंग ब्रँडचे लॉन्चिंग
Goldie Group : मसाल्यांच्या बाजारात गोल्डी ग्रुपचा नवा धमाका; स्प्रिंको या नव्या सीझनिंग ब्रँडचे लॉन्चिंग
सण-उत्सवात सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; ढोल-ताशांमधील टोल...
Mumbai High Court : सण-उत्सवात सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; ढोल-ताशांमधील टोलवाद्यांवरही कोर्टाचा दणका
दुष्काळग्रस्त भागाची पाहणी अन् आमदार फुलांच्या पायघड्यांवरून चालले
Sanjay Shirsat : दुष्काळग्रस्त भागाची पाहणी अन् आमदार फुलांच्या पायघड्यांवरून चालले; अंबादास दानवेंकडून VIDEO ट्विट करत शिरसाट यांच्यावर टीका
दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार? सुनील तटकरेंनी स्पष्टच सांगितलं
NCP : दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार? सुनील तटकरे यांनी स्पष्टच सांगितलं...
बळीराजाचा दसरा-दिवाळी काळी होऊ देणार नाही! शिंदेंची मोठी ग्वाही
Maharashtra Drought : बळीराजाचा दसरा-दिवाळी काळी होऊ देणार नाही! शिंदेंची मोठी ग्वाही, पुढे म्हणाले...
डब्यात काय आणायचं, हेही शाळा ठरवणार? मेथीची भाजी आणल्याने...
Mira Bhayandar : डब्यात काय आणायचं, हेही शाळा ठरवणार? मेथीची भाजी आणल्याने विद्यार्थ्याला दंड केल्याचा आरोप; प्रशासन ॲक्शन मोडमध्ये
पैसेवाल्यांना आंदोलनाला साथ द्यायची नाही का? जरांगे पाटलांचा सवाल
Manoj Jarange : पैसेवाल्यांना आंदोलनाला साथ द्यायची नाही का? जरांगे पाटलांचा सवाल; पुढे म्हणाले...
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला; आजची सुनावणी....
Shivsena Symbol : शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला; आजची सुनावणी पुढे ढकलली, नवी तारीख काय?