AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सोलापुरमधील अक्कलकोट रोड एमआयडीसीतील कारखान्याला भीषण आग, 3 जणांचा मृत्यू

सोलापूरच्या अक्कलकोट MIDC परिसरातील सेंट्रल इंडस्ट्री नावाच्या कारखान्याला भीषण आग लागली आहे. मध्यरात्री 3 वाजता सुरू झालेली ही आग अद्याप नियंत्रणात आलेली नाही. तीन कामगार जखमी झाले असून सध्या रुग्णालयात दाखल आहेत.

सोलापुरमधील अक्कलकोट रोड एमआयडीसीतील कारखान्याला भीषण आग, 3 जणांचा मृत्यू
सोलापूरमध्ये कारखान्याला भीषण आगImage Credit source: tv9 marathi
| Updated on: May 18, 2025 | 11:07 AM
Share

सोलापुर शहरातील अक्कलकोट एमआयडीसी परिसरातील एका कारखान्याला भीषण आग लागली आहे. सोलापूरमधील सेंट्रल इंडस्ट्री या कारखान्याला मध्यरात्री 3 च्या सुमारास आग लागली आणि पाहता पाहता या आगीने अतिशय रौद्ररूप धारण केलं आहे. या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या अेक गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आणि त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू केले. अग्निशमन दलाच्या जवानांनी 3 जणांना कारखान्यातून बाहेर काढलं आहे. या आगीत तिघांना आपला जीव गमवावा लागल्याची माहिती समोर येत आहे.

दरम्यान या आगीत तीन जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.  तसेच आणखीही पाच ते सहा जण आग लागलेल्या या कारखान्याच्या आतच अडकून पडले आहेत. त्यांच्यापैकीही काही जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आगीतून बाहेर काढलेल्या तिघांची अवस्था अजून गंभीर असून त्यांना उपचारांसाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

आग लागून अनेक तास उलटून गेल्यानंतरही ही आग विझलेली नाही. कारखान्यात आणखी पाच ते सहा कामगार अडकून पडले आहेत. टनास्थळी अग्निशमन दलाची मोठी टीम पोहोचली असून पोलिसांचाही मोठा बंदोबस्त तैनात आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी, ती विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान शर्थीचे प्रयत्न करत आहेत.

दरम्यान आग लागलेल्या या कारखान्यात टॉवेल तयार केले जायचे. त्या साहित्यामुळे आग आणखीनच पसरत गेली असून प्रचंड नुकसान झाल्याचे समजते.   आगीमध्ये कारखान्यातील सर्व साहित्य जळून खाक झालं आहे.

रात्री लागलेली ही आग इतकी भीषण होती की, मध्यरात्री संपूर्ण परिसर आगीच्या ज्वालांनी वेढला गेला होता. अगदी दूरवरूनही आगीच्या ज्वाळा स्पष्टपणे दिसत होत्या. इतक्या तासांनंतरही या आगीवर अद्यापही नियंत्रण मिळवता आलेलं नाही. अग्निशमन दलाकडून कारखान्यातील तापमान कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.