Matheran Mini Train : माथेरानची राणी पुन्हा धावणार, मान्सून संपल्याने या तारखेपासून पुन्हा सेवा बहाल
बच्चे कंपनीची आवडती माथेरानची मिनी ट्रेन पुन्हा सुरु होत आहे. पावसात नेरळ ते माथेरान ही थेट सेवा बंद करण्यात येत असते. आता पावसाळा संपल्याने पुन्हा माथेरानची मिनी ट्रेन सुरु होणार असल्याने पर्यटकांसह स्थानिकांचा फायदा होणार आहे.

माथेरान या निसर्गरम्य थंड हवेच्या ठिकाणची पर्यटकांची आवडती नेरळ ते माथेरान धावणारी मिनी ट्रेन माथेरानची राणी मान्सुननंतर पुन्हा सुरु होत आहे. या मिनी ट्रेनचा सफर येत्या ६ नोव्हेंबरपासून बहाल करण्यात येत असल्याचे मध्य रेल्वेने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. सुरक्षेसाठी पावसाळ्यात या मिनी ट्रेनला जून ते ऑक्टोबर या काळात नेरळ ते माथेरान चालवण्यात येत नाही. या काळात अमन लॉज ते माथेरान ही शटल सेवा सुरु असते. आता थेट नेरळ ते माथेरान अशी सलग सेवा ६ नोव्हेबर पासून सुरु होणार आहे. त्यामुळे पर्यटकांसह स्थानिकांचा फायदा होणार आहे.
६ नोव्हेंबरपासून नेरळ-माथेरान सेवा पुन्हा सुरू
मध्य रेल्वेवरील नेरळ-माथेरान दरम्यानची ट्रेन सेवा ०६ नोव्हेंबर २०२५ पासून पुन्हा सुरू होत आहे. सुरक्षेच्या दृष्टीने जून ते ऑक्टोबर या काळात नेरळ-माथेरान मार्गावरील सेवा बंद ठेवण्यात येत असते. मात्र अमन लॉज आणि माथेरान दरम्यान शटल सेवा वेळापत्रकानुसार सुरू असतात.
नेरळ-माथेरान ते अमन लॉज-माथेरान दरम्यानच्या रेल्वे सेवांच्या वेळा खालीलप्रमाणे आहेत:-
(अ) नेरळ – माथेरान – नेरळ ट्रेन सेवा:–
नेरळ–माथेरान डाऊन गाड्या
१. ट्रेन क्रमांक 52103 – नेरळ येथून सकाळी ०८.५० वा. सुटेल आणि माथेरान येथे ११.३० वा. पोहोचेल (दैनिक)
२. ट्रेन क्रमांक 52105 – नेरळ येथून सकाळी १०.२५ वा. सुटेल आणि माथेरान येथे दुपारी १३.०५ वा. पोहोचेल (दैनिक)
माथेरान – नेरळ अप गाड्या
१. ट्रेन क्रमांक 52104 – माथेरान येथून दुपारी १४.४५ वा. सुटेल आणि नेरळ येथे १७.३० वा. पोहोचेल (दैनिक)
२. ट्रेन क्रमांक – 52106 – माथेरान येथून सायंकाळी १६.०० वा. सुटेल आणि नेरळ येथे सायंकाळी १८.४० वा. पोहोचेल (दैनिक)
गाडी क्रमांक 52103/52104 या गाड्या एकूण ६ कोचेससह चालतील तीन द्वितीय , १ व्हिस्टाडोम कोच आणि दोन द्वितीय श्रेणीसह सामान वाहक व्हॅन. गाडी क्रमांक 52105/52106 या गाड्या एकूण ६ कोचेससह चालतील तीन द्वितीय, एक प्रथम कोच आणि दोन द्वितीय श्रेणीसह सामान वाहक व्हॅन.
(ब) अमन लॉज – माथेरान – अमन लॉज शटल सेवा
अमन लॉज – माथेरान शटल सेवा (दैनिक)
१. गाडी क्रमांक 52153 अमन लॉज येथून ०८.४५ वाजता सुटेल आणि माथेरान येथे ०९.०३ वाजता पोहोचेल.
२. गाडी क्रमांक 52155 अमन लॉज येथून ०९.३५ वाजता सुटेल आणि माथेरान येथे ०९.५३ वाजता पोहोचेल.
३. गाडी क्रमांक 52157 अमन लॉज येथून १२.०० वाजता सुटेल आणि माथेरान येथे १२.१८ वाजता पोहोचेल.
४. गाडी क्रमांक 52159 अमन लॉज येथून १४.२५ वाजता सुटेल आणि माथेरान येथे १४.४३ वाजता पोहोचेल.
५. गाडी क्रमांक 52161 अमन लॉज येथून १५.४० वाजता सुटेल आणि माथेरान येथे १५.५८ वाजता पोहोचेल.
६. गाडी क्रमांक 52163 अमन लॉज येथून १७.४५ वाजता सुटेल आणि माथेरान येथे १८.०३ वाजता पोहोचेल.
शनिवार / रविवार विशेष सेवा खालीलप्रमाणे:
७. विशेष-१ अमन लॉज येथून १०.३० वाजता सुटेल आणि माथेरान येथे १०.४८ वाजता पोहोचेल.
८. विशेष-३ अमन लॉज येथून १३.३५ वाजता सुटेल आणि माथेरान येथे १३.५३ वाजता पोहोचेल.
माथेरान – अमन लॉज शटल सेवा (दैनिक)
१. गाडी क्रमांक 52154 माथेरान येथून ०८.२० वाजता सुटेल आणि अमन लॉज येथे ०८.३८ वाजता पोहोचेल.
२. गाडी क्रमांक 52156 माथेरान येथून ०९.१० वाजता सुटेल आणि अमन लॉज येथे ०९.२८ वाजता पोहोचेल.
३. गाडी क्रमांक 52158 माथेरान येथून ११.३५ वाजता सुटेल आणि अमन लॉज येथे ११.५३ वाजता पोहोचेल.
४. गाडी क्रमांक 52160 माथेरान येथून १४.०० वाजता सुटेल आणि अमन लॉज येथे १४.१८ वाजता पोहोचेल.
५. गाडी क्रमांक 52162 माथेरान येथून १५.१५ वाजता सुटेल आणि अमन लॉज येथे १५.३३ वाजता पोहोचेल.
६. गाडी क्रमांक 52164 माथेरान येथून १७.२० वाजता सुटेल आणि अमन लॉज येथे १७.३८ वाजता पोहोचेल.
शनिवार / रविवार विशेष सेवा खालीलप्रमाणे:
७. विशेष-२ माथेरान येथून १०.०५ वाजता सुटेल आणि अमन लॉज येथे १०.२३ वाजता पोहोचेल. ८. विशेष-४ माथेरान येथून १३.१० वाजता सुटेल आणि अमन लॉज येथे १३.२८ वाजता पोहोचेल. प्रवाशांनी कृपया याची नोंद घ्यावी.
