VIDEO | माथेरानमध्ये पर्यटकांची तुफान गर्दी, दीड किलोमीटरपर्यत वाहनांच्या रांगा

हर्षल भदाणे पाटील

| Edited By: |

Updated on: Jul 04, 2021 | 3:22 PM

गेल्या दोन महिन्यांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर 26 जूनपासून माथेरानमधील लॉकडाऊन उठवण्यात आला आहे. त्यामुळे अनेक पर्यटकांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे.

VIDEO | माथेरानमध्ये पर्यटकांची तुफान गर्दी, दीड किलोमीटरपर्यत वाहनांच्या रांगा
matheran

Follow us on

माथेरान : गेल्या दोन महिन्यांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर 26 जूनपासून माथेरानमधील लॉकडाऊन उठवण्यात आला आहे. त्यामुळे अनेक पर्यटकांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. सलग दोन दिवस सुट्टी असल्यामुळे पर्यटकांची गर्दी पाहायला मिळत आहे. माथेरानच्या घाटापर्यंत वाहनांच्या रांगा लागलेल्या पाहायला मिळत आहे. (Matheran Unlock Many Tourist crowded to place vehicles queue up to two kilometers)

स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध 

माथेरानमध्ये नुकतंच लॉकडाऊन उठवण्यात आला आहे. त्यामुळे केवळ पर्यटनावर अवलंबून असणाऱ्या स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत. पण मुख्य प्रवेशद्वार असणाऱ्या दस्तुरी नाक्यावर वनखात्याच्या आणि वन संरक्षक समितीच्या माध्यमातून वाहन कर आकारणी केली जात आहे. याबाबत समिती आणि वनखात्याचे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे.

सामान घेऊन पर्यटकांची पायपीट

सध्या माथेरानमध्ये वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र आहे. लॉकडाऊननंतर पहिल्याच शनिवारी दस्तुरी नाक्यावर वाहनांची संख्या वाढली होती. त्यामुळे कित्येक गाड्या या तिसऱ्या वळणापर्यंत घाटात लावण्यात आल्या. विशेष म्हणजे या ठिकाणाहून एक ते दीड किलोमीटर सामान घेऊन पर्यटकांना पायपीट करावी लागत आहे.

पाहा व्हिडीओ : 

(Matheran Unlock Many Tourist crowded to place vehicles queue up to two kilometers)

संबंधित बातम्या : 

कोकणात शिवसेनेला मोठा धक्का; नाणार प्रकल्प समर्थक शिवसैनिकांचा भाजपमध्ये प्रवेश

अडीच लाखांचे 19 मोबाईल कॉल लोकेशनने शोधले, धुळ्यातील पोलिसांची भन्नाट कामगिरी

पावसानं दडी मारली, पीक वाटवण्यासाठी तरुणाची भन्नाट शक्कल, एकरातील कपाशीला जीवदान

Non Stop LIVE Update

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI