अडीच लाखांचे 19 मोबाईल कॉल लोकेशनने शोधले, धुळ्यातील पोलिसांची भन्नाट कामगिरी

देवपुर पोलिसांनी मोबाईल लोकेशनच्या मदतीने गहाळ झालेले मोबाईल वापरत असलेल्या इसमांकडून जप्त केले. आतापर्यंत सुमारे दोन लाख 40 हजार रुपये किंमतीचे 19 मोबाईल देवपुर पोलिसांनी जप्त केले होते.

अडीच लाखांचे 19 मोबाईल कॉल लोकेशनने शोधले, धुळ्यातील पोलिसांची भन्नाट कामगिरी
देवपूर पोलिसांनी गहाळ मोबाईल शोधले
Follow us
| Updated on: Jul 04, 2021 | 11:59 AM

धुळे : धुळे-देवपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील भाजी बाजार, बस स्थानकासह इतर परिसरात गहाळ झालेले मोबाईल कॉल लोकेशनच्या मदतीने शोधून देवपूर पोलिसांनी मूळ मालकांना परत केले आहेत. सुमारे दोन लाख 40 हजार रुपये किंमतीचे 19 मोबाईल मालकांना पोलिसांनी दिले आहेत. (Dhule Devpur Police returns 19 mobiles worth Rs 2 lakh 40 thousand to owners)

मोबाईल लोकेशनच्या मदतीने शोध

देवपुर परिसरातील भाजी बाजार, बुध बाजार, शाळा, महाविद्यालय, बसस्थानक या परिसरांमध्ये मोबाईल गहाळ झाल्यानंतर त्या बाबतच्या तक्रारी देवपुर पोलिसात नोंद झाल्या होत्या. त्या तक्रारींची दखल घेत देवपुर पोलिसांनी मोबाईल लोकेशनच्या मदतीने गहाळ झालेले मोबाईल वापरत असलेल्या इसमांकडून जप्त केले. आतापर्यंत सुमारे दोन लाख 40 हजार रुपये किंमतीचे 19 मोबाईल देवपुर पोलिसांनी जप्त केले होते.

मूळ मालकांना मोबाईल परत

जिल्हा पोलिस प्रमुख चिन्मय पंडीत, अप्पर पोलिस अधीक्षक प्रशांत बच्छाव, डीवायएसपी दिनकर पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय चंद्रकांत पाटील, हे. कॉ. डी. डी. पाटील, पो कॉ एस. पी. बोडके, व्ही. एस. आखडमल, एस. एस. सूर्यवंशी यांच्या पथकाने हे मोबाईल जप्त केले होते. आज दुपारी देवपुर पोलिस ठाण्यात मूळ मालकांना बोलवून अपर पोलिस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांच्या हस्ते मोबाईल सुपूर्द करण्यात आले.

पंढरपुरात चोरलेले मोबाईल कर्नाटकात

याआधी, पंढरपुरात चोरीला गेलेले मोबाईल चक्क कर्नाटकात सापडले होते. या प्रकरणी कर्नाटकातील शिगोमा येथील अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आलं होतं. त्याच्याकडून तब्बल 2 लाख 17 हजार रुपयांचे 21 मोबाईल जप्त करण्यात आले होते.

पंढरपूरच्या बाजारपेठेतून नागरिकांचे मोबाईल चोरल्या प्रकरणी कर्नाटकातील शिमोगा येथील अल्पवयीन मुलाला पंढरपूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून वेगवेगळ्या कंपनीचे 2 लाख 17 हजार रुपयांच्या किमतीचे 21 मोबाईल जप्त केल्याची माहिती पोलीस निरीक्षक अरुण पवार यांनी दिली होती.

संबंधित बातम्या : 

पंढरपुरात चोरीला गेलेले मोबाईल कर्नाटकात ट्रेस, अल्पवयीन चोरट्याकडे घबाड सापडलं

कोरोनाग्रस्त मृतदेहाच्या खिशातून मोबाईल-दागिने चोरी, बॉडी रॅप करणाऱ्या कर्मचाऱ्यांचीच हातचलाखी

(Dhule Devpur Police returns 19 mobiles worth Rs 2 lakh 40 thousand to owners)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.