Medical Exam Postponed : राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव, वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा पुढे ढकलल्या

येत्या 19 एप्रिलपासून घेण्यात येणाऱ्या वैद्यकीय परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. (Maharashtra Medical Examinations Postponed announcement by Amit Deshmukh)

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 13:22 PM, 15 Apr 2021
Medical Exam Postponed : राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव, वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा पुढे ढकलल्या
मेडीकल चाचण्या

मुंबई : येत्या 19 एप्रिलपासून घेण्यात येणाऱ्या वैद्यकीय परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. वैद्यकीय शिक्षण आणि सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी याबाबतची माहिती दिली आहे. राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता याबाबचा निर्णय घेण्यात आल्या आहेत. यानुसार या वैद्यकीय परीक्षा जून महिन्यात घेण्यात येतील, असेही अमित देशमुख म्हणाले. (Maharashtra Medical Examinations Postponed announcement by Amit Deshmukh)

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा येत्या सोमवारी (19 एप्रिल) पासून घेण्यात येणार होती. मात्र राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. त्यामुळे याबाबत वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी चर्चा केली. या चर्चेनंतर या परीक्षा जून महिन्यात घ्यावा, असा निर्णय घेण्यात आला. तसेच या परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत जाहीर करण्यात येईल, असे अमित देशमुख यांनी सांगितले.

अमित देशमुख यांचे ट्वीट

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत 19 एप्रिल पासून घेण्यात येणाऱ्या वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा मा. मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा करून येत्या जून मध्ये घेण्यात येणार असून परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत जाहीर करण्यात येईल.  या परीक्षा पुढे ढकलणेबाबत बाबत उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, आरोग्य मंत्री राजेश टोपे, आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्याशीही चर्चा झाली आहे, असे ट्वीटही अमित देशमुख यांनी केले आहे.

दहावी-बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या

दरम्यान महाराष्ट्रातील कोरोना विषाणू संसर्गाची परिस्थिती पाहून दहावी-बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दहावी आणि बारावीच्या परीक्षांचं नवीन वेळापत्रक जाहीर करण्यात येणार आहे. वर्षा गायकवाड यांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, बारावीची परीक्षा मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये तर जून महिन्यात दहावीची परीक्षा आयोजित केली जाणार आहे.

संबंधित बातम्या :

SSC, HSC Board Exam 2021 Postponed : दहावी बारावीच्या नव्या वेळापत्रकानुसार परीक्षा कधी सुरु होणार? वर्षा गायकवाड यांनी काय सांगितलं?

SSC, HSC Board Exam 2021 Postponed : दहावी-बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या, ठाकरे सरकारचा आणखी एक मोठा निर्णय