एस.टी. कर्मचाऱ्यांसाठी आजचा मोठा दिवस, 11 वा. पगारवाढीसंदर्भात महत्वाची बैठक, तोडगा निघणार?

एसटी महामंडळाच्या विलीनीकरणासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीचा अहवाल येईपर्यंत एसटी कामगारांना अंतरिम वेतनवाढ देण्याचा पर्याय देण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर आज 11 वाजता परिवहन मंत्री अनिल परब यांच्या उपस्थितीमध्ये बैठक होणार आहे.

एस.टी. कर्मचाऱ्यांसाठी आजचा मोठा दिवस, 11 वा. पगारवाढीसंदर्भात महत्वाची बैठक, तोडगा निघणार?
Follow us
| Updated on: Nov 24, 2021 | 7:30 AM

मुंबई: एसटी महामंडळाच्या विलीनीकरणासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीचा अहवाल येईपर्यंत एसटी कामगारांना अंतरिम वेतनवाढ देण्याचा पर्याय देण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर आज 11 वाजता परिवहन मंत्री अनिल परब यांच्या उपस्थितीमध्ये बैठक होणार आहे. आजचा दिवस हा एसटी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाचा असून, या बैठकीमध्ये संपावर तोडगा निघेल  अशी अपेक्षा आहे. दरम्यान त्यापूर्वी  मंगळवारी आमदार गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत आणि एसटीचे प्रतिनिधी यांच्यामध्ये तब्बल दोन तास बैठक झाली.

…तोपर्यंत संप चालू ठेवता येणार नाही

याबाबत  माहिती देताना अनिल परब यांनी म्हटले आहे की, कोर्टाने विलीनीकरणाचा विचार करण्यासाठी समिती नेमली आहे. समितीचा जो काही अहवाल येईल तो आम्ही मान्य करू. पण तोपर्यंत संप चालू राहू शकत नाही. त्यामुळे कामगारांना अंतरिम वेतनवाढ देण्याचा पर्याय दिला आहे. एसटी कर्मचाऱ्यांसोबत सकारात्मक चर्च झाल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान आज  अकरा वाजता होणाऱ्या बैठकीमध्ये एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा निघण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.

कोर्टाच्या आदेशाचं उल्लंघन करू शकत नाही

मंगळवारी अनिल परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचे नेतृत्व करत असलेल्या भाजपा आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना ते म्हणाले की, गेले काही दिवस एसटीचा संप सुरू आहे. कर्मचाऱ्यांनी एसटीच्या विलीनीकरणाची मागणी लावून धरली आहे. या मागणीबाबत तिढा कायम होता. कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधी, सदाभाऊ खोत, गोपीचंद पडळकर यांच्यासोबत चर्चा झाली. सविस्तर चर्चा झाली. वेतन वेळेवर मिळावे. वेतन वाढावं अशी कर्मचाऱ्यांची मागणी आहे. उच्च न्यायालयाने समिती बनवली आहे. समितीकडे सध्या हा विषय आहे. 12 आठवड्यात अहवाल द्यायचा आहे. अहवाल आल्यानंतर मुख्यमंत्री तो कोर्टात सादर करतील, कोर्टाच्या आदेशाचं कोणीच उल्लंघन करू शकत नाही. कामगारांना जे जे हवं आहे ते आम्ही देत आहोत. एका बाजूने समितीची प्रक्रिया सुरू आहे. याला बराच कालावधी लागणार आहे. तिढा कायम राहू नये, यासाठी कर्मचाऱ्यांना अंतरिम वेतनवाढीचा पर्याय दिला आहे. दरम्यान याच संदर्भात आज पुन्हा एकदा एसटी कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधी आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्यामध्ये आज बैठक होणार आहे.

दोन पावलं मागे घ्या

कामगारांनी अधिक ताणू नये. सरकार दोन पावलं पुढे यायला तयार आहे. तुम्ही दोन पावलं मागे या. चर्चेने मार्ग निघत असतो. एसटी सेवा ठप्प असल्याने प्रवाशांचे हाल सुरू आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी आपला संप मागे घ्यावा असे आवाहन देखील परब यांनी केले आहे.

संबंधित बातम्या

शरद पवारांनी घेतली शशिकांत शिंदेंची भेट; जिल्हा बँक निवडणुकीच्या निकालांवर बंद दाराआड चर्चा

ST Workers Strike : अंतरिम पगारवाढीचा पर्याय मान्य होईल? पडळकर आणि खोत एसटी कर्मचाऱ्यांशी चर्चा करणार

अमरावतीच्या घटनेची सुप्रीम कोर्टाच्या निवृत्त न्यायाधीशामार्फत चौकशी करा; चंद्रकांत पाटील यांची मागणी

Non Stop LIVE Update
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच.
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?.
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती.
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा.
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?.
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन.
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?.