AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ट्रकची बाईकला धडक, MIM च्या धुळे जिल्हाध्यक्षांचा मृत्यू

एमआयएमचे धुळे जिल्हाध्यक्ष समसुल हुद्दा मोहम्मद शहा यांच्या बाईकला चाळीसगावला जाताना अपघात झाला. MIM Dhule President Dies Accident

ट्रकची बाईकला धडक, MIM च्या धुळे जिल्हाध्यक्षांचा मृत्यू
| Updated on: Jan 06, 2021 | 11:58 AM
Share

धुळे : मालेगावहून चाळीसगावच्या दिशेने जाताना बाईक अपघातात एमआयएमच्या धुळे जिल्हाध्यक्षांना प्राण गमवावे लागले. अपघातात गंभीर जखमी झालेल्या 58 वर्षीय समसुल हुद्दा मोहम्मद शहा यांनी रुग्णालयात जाताना अखेरचा श्वास घेतला. तर त्यांच्यासोबत असलेल्या दुचाकीस्वार तरुणाचा जागीच मृत्यू झाला. (MIM Dhule District President Samsul Hudda Mohammed Shah Dies in Accident)

एमआयएमचे धुळे जिल्हाध्यक्ष समसुल हुद्दा मोहम्मद शहा चाळीसगावला जाताना अपघात झाला. मालेगाव शहराजवळ चाळीसगाव फाट्यावर त्यांच्या बाईकला ट्रकने धडक दिली होती. समसुल हुद्दा मोहम्मद शहा यांच्या निधनाने कुटुंबीय, समर्थक आणि एमआयएमच्या कार्यकर्त्यांमध्ये  दुःखाचं वातावरण पसरलं आहे.

ट्रक-बाईकची भीषण धडक

मालेगावमधील कमलपुरा भागात राहणाऱ्या मोहम्मद जुनेद यांच्यासह समसुल दुचाकीने भंगार माल खरेदीसाठी जात होते. अंबिका हॉटेलच्या बाजूला माल वाहतूक ट्रकने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. चेहऱ्यावरुन ट्रकचे टायर गेल्याने जुनेद यांचा जागीच मृत्यू झाला. तर समसुल हुद्दा शहा यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली होती.

अपघाताची माहिती मिळाल्यानंतर मालेगाव तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जुनेद यांचा मृतदेह सामान्य रुग्णालयात नेण्यात आला, तर जखमी समसुल यांना तातडीने खासगी रुग्णालयाकडे नेण्यात आले. समसुल यांचा एक पाय पूर्णपणे निकामी झाल्याने त्यांना पुढील उपचारासाठी नाशिकमधील खासगी रुग्णालयात नेले जात होते. परंतु वाटेतच त्यांची प्राणज्योत मालवली.

वंचित पदाधिकाऱ्यांच्या अपघाताच्या आठवणी ताज्या

बीड जिल्ह्यातील गेवराईजवळ कार आणि ऑईल टँकरच्या भीषण अपघातात वंचित बहुजन आघाडीच्या पाच पदाधिकाऱ्यांचा जागीच मृत्यू झाला होता. नोव्हेंबर महिन्यात ही घटना घडली होती. औरंगाबादकडे जात असताना वंचितच्या पदाधिकाऱ्यांच्या गाडीला अपघात झाला होता. लातूरचे वंचितचे जिल्हाध्यक्ष सदाशिव भिंगे यांचा मृतांमध्ये समावेश होता. अपघातातील सर्व पदाधिकारी लातूरचे रहिवासी होते.

संबंधित बातम्या :

बीडमध्ये भीषण अपघात, वंचितच्या लातूर जिल्हाध्यक्षांसह पाच जणांचा मृत्यू

(MIM Dhule District President Samsul Hudda Mohammed Shah Dies in Accident)

महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.