लॉकडाऊनमुळे पहिल्यांदाच इतके दिवस नांदेडमध्ये, मंत्री अशोक चव्हाण सध्या काय करतात?

सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण (Minister Ashok Chavan) सध्या पहिल्यांदाच नांदेडला दीर्घ काळासाठी मुक्कामी आहेत.

लॉकडाऊनमुळे पहिल्यांदाच इतके दिवस नांदेडमध्ये, मंत्री अशोक चव्हाण सध्या काय करतात?
Follow us
| Updated on: Apr 17, 2020 | 3:14 PM

नांदेड : सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण (Minister Ashok Chavan) सध्या पहिल्यांदाच नांदेडला दीर्घ काळासाठी मुक्कामी आहेत. अशोक चव्हाण यांची नांदेडचे म्हणून ओळख असली तरी यापूर्वी सलग इतका दीर्घकाळ ते कधीही नांदेडला राहिलेले नाहीत. अगदी निवडणुकीच्या काळातही ते राज्यभर फिरत असतात. मात्र, आता कोरोनामुळे ते गेल्या एक महिन्यापासून शहरात मुक्कामी आहेत (Minister Ashok Chavan).

अशोक चव्हाण यांचे वडील आणि महाराष्ट्राचे दिवंगत नेते शंकरराव चव्हाण हे राज्याच्या स्थापनेपासून मंत्रिमंडळात होते. त्यामुळे अशोक चव्हाण यांचे संपूर्ण बालपण आणि शिक्षण मुंबईतच झाले. आपल्या आयुष्याचा जोडीदारदेखील त्यांनी मुंबईतच निवडला आणि प्रेमविवाह करत आयुष्याची नवी सुरुवात तिथेच केली. एम.बी.ए असे उच्च शिक्षण घेत चव्हाण यांनी मुंबईतच व्यावसायिक कंपन्यात जम बसवलेला आहे. त्यामुळे दिवाळीचे चार दिवस सोडले तर ते कधीच सलग दीर्घकाळ नांदेडला राहिलेले नाहीत.

आयुष्याच्या प्रवासात ते आमदार, मंत्री आणि मुख्यमंत्रीही झाले. त्यामुळे त्यांचा कायम मुक्काम हा मुंबईतच असे. इतकच काय तर अटीतटीच्या निवडणुकीतदेखील आजवर त्यांना इथेच तंबू ठोकून राहण्याची वेळ आली नाही. मात्र आता कोरोनामुळे ते गेल्या महिनाभरापासून नांदेडमध्येच आहेत.

देशातील रेल्वे , विमानसेवा बंद असल्याने 600 किलोमीटरचा प्रवास रस्त्यावरुन टाळत चव्हाण नांदेडमध्येच आहेत. असे असले तरी ते घरात बसून राहिलेले नाहीत. रोज कुठे न कुठे फिरुन ते जिल्ह्याचा आढावा घेत आहेत. त्यामुळे कोरोनाने आजवर कधीच झाल्या नाहीत अशा अनेक घटना घडवून आणल्या आणि या गोष्टीला स्वतः चव्हाण यांनीही ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलताना दुजोरा दिला.

दुसरीकडे चव्हाण सलग इतका काळ जिल्ह्यात असल्याने त्यांचा सर्वत्र संचार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील रस्ते, स्वच्छता यावर त्यांचे बारीक लक्ष आहे. नांदेडच्या विकासाच्या नवनवीन कल्पनांबाबत ते अधिकाऱ्यांशी चर्चा करतात. सोबतच कोरोनाविरोधातील लढाईत त्यांचा प्रत्यक्ष आणि सक्रिय सहभाग आहे. त्यामुळेच नांदेड जिल्ह्यातील सर्वच यंत्रणा सुतासारखी सरळ बनली आहे.

आपण मुंबईच्या प्रेमात असल्याचे ते स्वतः सांगतात. मात्र, लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर त्यांचं लोकांमध्ये मिसळण्याच प्रमाण प्रचंड वाढवलं आहे. त्यातूनच त्यांचा हा दिर्घकाळाचा मुक्काम नांदेडकरांच्या पसंती उतरला आहे. हे प्रेम कायम टिकवण्यासाठी त्यांनी अधूनमधून असे दीर्घ मुक्काम नांदेडला केले तर राजकीय प्रवास सुकर होणार आहे.

“नांदेडमध्ये एवढा वेळ राहिला मिळतोय, याचा आनंद आहे. जबाबदारी जास्त आहेत. राज्य स्तरावर अनेक जिल्ह्यात जावं लागतं. मुंबईत मुख्यालय असल्यामुळे सरकार मुबईहून चालतं. पण कोरोनामुळे गेल्या 20 ते 25 दिवसांपासून आम्ही नांदेड जिल्ह्यामध्ये आहोत. मुख्यमंत्र्यांच्या सल्ला आणि सूचनेनुसार पालकमंत्री आपापल्या जिल्ह्यात राहिले पाहिजेत. मला आनंद आहे की, त्यामुळे जिल्ह्यातील सर्व भागातील लोकांशी संवाद साधता येतोय. कोरोनामुळे लोक त्रस्त झाले आहेत. आपल्याकडून जेवढी मदत करणं शक्य आहे तितकी मदत करतोय”, असं अशोक चव्हाण म्हणाले.

रोजचा दिनक्रम कसा असतो?

“दिनक्रम सांगायाचा झाला तर सध्या कुठे काही अडचणी असतील, कुठे रेशन मिळत नाही किंवा कुठे एखादा रुग्ण आढळला, रुग्णालयांचे कामं सुरु आहेत, जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठका होतात, तालुक्याला रोजचं जाणं-येणं आहे. रोजचा दिनक्रम काही निश्चित नसतो. मात्र, जे काही सकाळी विषय आले ते हाताळावे लागतात”, असं अशोक चव्हाण यांनी सांगितलं.

संबंधित बातम्या :

घाबरुन घरी बसायला मी झायरा वसीम नाही, बबिता फोगाटचा इशारा, तब्लिगींवरील ट्विटने वाद

पुणे पोलिसांचं मिशन ‘ऑल आऊट’, मॉर्निंग वॉकच्या नावाखाली फिरणाऱ्या ‘मच्छरां’वर कारवाई

Non Stop LIVE Update
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.