AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी ! आमच्याकडे 237 आमदार, ज्यांना युतीमध्ये राहायचं नाही ते बाहेर पडतील; अतुल सावे यांचा थेट इशारा

पाच वर्ष आमच्याकडे 237 आमदार आहेत, त्यामुळे ज्यांना युतीमध्ये राहायचं नाही ते बाहेर पडतील असा थेट इशारा नांदेडचे पालकमंत्री अतुल सावे यांनी शिवसेनेच्या आमदाराला दिला आहे.

मोठी बातमी ! आमच्याकडे 237 आमदार, ज्यांना युतीमध्ये राहायचं नाही ते बाहेर पडतील; अतुल सावे यांचा थेट इशारा
| Updated on: Apr 21, 2025 | 5:21 PM
Share

मोठी बातमी समोर येत आहे, पाच वर्ष आमच्याकडे 237 आमदार आहेत, त्यामुळे ज्यांना युतीमध्ये राहायचं नाही ते बाहेर पडतील असा थेट इशारा नांदेडचे पालकमंत्री अतुल सावे यांनी शिवसेनेच्या आमदाराला दिला आहे. हदगाव मतदार संघाचे शिवसेनेचे आमदार बाबुराव कदम यांनी तांडावस्तीच्या निधीवाटपावरून पत्र लिहून नाराजी व्यक्त केली होती, यावरून अतुल सावे यांनी थेट इशारा दिला आहे.

हदगावचे शिवसेनेचे आमदार बाबुराव कदम यांनी अतुल सावे यांना पत्र लिहून तांडा वस्ती सुधार योजनेचा निधी विरोधकांना वाटप केल्याची तक्रार केली होती. तसेच नांदेडमध्ये आल्यानंतर निषेध व्यक्त करू, असा इशारा दिला होता. यावर नांदेड दौऱ्यावर आल्यानंतर अतुल सावेंनी आमदार बाबुराव कदम यांना थेट इशारा दिला असून आमच्याकडे पाच वर्षे 237 आमदार आहेत, ज्यांना युतीत राहायचं नाही ते बाहेर पडतील असं त्यांनी म्हटलं आहे. दरम्यान आता अतुल सावे यांच्या या वक्तव्यानंतर नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.  प्रस्ताव कलेक्टर पाठवतात, आम्ही त्यांना मंजुरी देतो, त्यामुळे आमदारांनी ते प्रस्ताव चेक करावेत असंही अतुल सावे यांनी यावेळी म्हटलं आहे.

दरम्यान तांडा वस्तीचा निधी हा आमच्या खात्याच्या अंतर्गत दिला जातो, याचे सगळे प्रस्ताव असतात ते कलेक्टरच्या माध्यमातून मंजूर करून पाठवले जातात.  त्याच्यानंतर आम्ही उपलब्ध करून देतो. हा प्रस्ताव आम्ही तयार करत नाही, हा प्रस्ताव कलेक्टरकडून येतो. त्यामुळे आम्ही निधी उपलब्ध करू दिला, आम्ही निधी उपलब्ध करून दिला नाही, असा आमदारांमध्ये गैरसमज निर्माण होतो, असंही यावेळी अतुल सावे यांनी म्हटलं आहे.

डीपीडीसीची बैठकीपूर्वी  या शहराचे काय विषय आहेत त्यावर चर्चा करण गरजेचं होतं. महत्त्वाचा विषय असा होता की महापालिकेचे काही विषय प्रलंबित होते. शिक्षण, आरोग्य, पोलीस विभाग व पाणीटंचाई याबाबत आढावा घेतला, अधिकाऱ्यांशी चर्चा केली. लोकप्रतिनिधिंना देखील सूचना देण्यात आल्या आहेत, त्यांच्या भागातील जे काही महत्त्वाचे विषय असतील त्यांचे प्रस्ताव सादर करावेत, असं अतुल सावे यांनी म्हटलं आहे.

Follow Us
मी पुन्हा येईल, मी... फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
Abhijeet Dipake On CM Fadnavis : जेलमध्ये टाकलं तर... मीच तेच म्हणेल जे तुम्ही म्हणायचे; मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल...मुख्यमंत्री फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
Abhijeet Dipke : खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर अभिजीत दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं कौतुक
Abhijeet Dipke : मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; अभिजीत दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं तोंडभरून कौतुक
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ते.....
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ‘वोटचोर ग्यानू’पर्यंत भन्नाट पोस्टर्स होतायेत व्हायरल
दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; शिरसाटांचा विरोधकांना..
Sanjay Shirsat : दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; संजय शिरसाटांचा विरोधकांना थेट सवाल, पुढे म्हणाले...
CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच..
Mumbai CJP Protest : ज्ञानेश कुमारांविरोधात शिवाजी पार्कवर रणकंदन; CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच...
परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी....
Mumbai CJP Protest : परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी;  ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी CJPचं जेलभरो आंदोलन
हे आंदोलन म्हणजे..; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले
Ashish Shelar : हे आंदोलन म्हणजे....; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले...
व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : ठाकरे बंधूंवर विखे पाटलांनी साधला निशाणा
Video : राजकीय प्रतिमा परत मिळवण्यासाठी ठाकरे बंधूं..., विखे पाटलांनी साधला निशाणा