नितेश राणे यांची मालेगाव बॉम्बस्फोटाचा निकाल येताच काँग्रेसवर जोरदार टीका; म्हणाले, नाक रगडून…
29 सप्टेंबर 2008 रोजी मालेगावच्या भिक्कू चौकात बॉम्बस्फोट झाला. आज तब्बल 17 वर्षांनंतर या बॉम्बस्फोटाचा निकाल आलाय. या निकालानंतर मालेगावात हिंदुत्ववादी संघटनांनी आनंद उत्सव साजरा करण्यात सुरूवात केलीये. नुकताच नितेश राणे यांनी काँग्रेसवर टीका केली आहे.

29 सप्टेंबर 2008 रोजी मालेगावच्या भिक्कू चौकात बॉम्बस्फोट झाला. यानंतर साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना अटक करण्यात आली. आता या प्रकरणातील 7 आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. कोर्टाच्या या निकालानंतर मालेगावात जल्लोषाचे वातावरण आहे. यावर अनेक राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया येताना दिसत आहेत. आता यावर मंत्री नितेश राणे यांनीही भाष्य केले.
नितेश राणे म्हणाले की, समाजाची बदनामी जी या मालेगावच्या प्रकरणातून करण्याचा प्रयत्न होता, त्यांना तोंडावर चपराक मिळाली आहे. त्यामुळे यापुढे हिंदू समाजाची बदनामी करण्याचा प्रयत्न कुणीही करू नये. परत परत एकच विषय सिद्ध होतोय की, आतंकवादाचा रंग आणि जिहादचा रंग हा हिरवाच आहे. कॉंग्रेसच्या काळात हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांवर खोट्या केस करण्यात आल्या, त्यांना अडकवण्यात आलं.
हिंदुत्ववादी विचारसरणीचे राज्य आणि केंद्र सरकार असताना शक्य नाही. आमच्या हिंदू राष्ट्रामध्ये आमचा हिंदू सुरक्षेत आहे हे पुन्हा सिद्ध झालंय. पुढे बोलताना नितेश राणे यांनी म्हटले की, खरंतर या लोकांनी हिंदू समाजाची माफी मागितलं पाहिजे. यांनी मंदिरात जाऊन हिंदू समाजाची माफी मागावी. पुरावे यांच्या विरोधात चुकीच्या पद्धतीने सादर करण्यात आले. ते कोर्टात कोणतेही पुरावे सिद्ध करू शकले नाहीत.
सर्व पद्धतीने हिंदू समाजाची बदनामी करणे हा कार्यक्रम कॉंग्रेसकडून चालू होता. आतंकवादाला ताकद देणे, जिहादला ताकद देणं हे त्यांचे सुरू होतं. ज्यांनी ज्यांनी यांची बदनामी केली, त्यांनी नाक रगडून माफी मागितली पाहिजे. या लोकांनी काही नसताना 17 वर्ष शिक्षा भोगली. त्यावेळीच्या कॉंग्रेस सरकारला हिंदू द्वेशच करायचं होतं, हे आपण बघतो. पाकिस्तानची भाषा आणि कॉंग्रेस पक्षाची भाषा एकच असते.
आमच्या हिंदू राष्ट्राला इस्लाम राष्ट्र बनवण्यासाठी जे जे प्रयत्न करत आहेत त्यांची भाषा कॉंग्रेस आणि त्यांची लोक बोलत आहेत. यामुळे हे पुरावेच देऊ शकले नाहीत. खरोखरच भगवा दहशतवाद होता का? कोणत्याही परिस्थितीमध्ये हिंदू समाजाची बदनामी करायची हे जे काही षडयंत्र होतं, ते हाणून पाडलंय, असेही नितेश राणे यांनी म्हटले आहे.
