आज रात्रीपासून वातावरण टाईट, निर्बंधांची कडक अंमलबजावणी करण्याचे गृहराज्यमंत्र्यांचे पोलिसांना आदेश

निर्बंधांची राज्यात कडक अंमलबजावणी करा, अशा सूचना गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी पोलीस विभागाला केल्या आहेत.

आज रात्रीपासून वातावरण टाईट, निर्बंधांची कडक अंमलबजावणी करण्याचे गृहराज्यमंत्र्यांचे पोलिसांना आदेश
shambhuraj desai

राज्यात वाढता कोरोना संसर्ग रोखण्यासाठी राज्य शासनाने निर्बंध लावले आहेत. त्या निर्बंधांची राज्यात कडक अंमलबजावणी करा, अशा सूचना गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी पोलीस विभागाला केल्या आहेत. यावेळी राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांबरोबर सातारा पोलीस मुख्यालयातून व्हिसीद्वारे संवाद साधला. राज्य शासनाने रात्रीची संचार बंदी लागू केलेली आहे. विनाकारण कोणी रस्त्यावर फिरत असल्यास त्याच्यावर कारवाई करावी, तसेच शासनाने लावलेल्या निर्बंधांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी कृती आराखडा तयार करा. जे कुणी नियमांचे पालन करणार नाही, त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करावी असे आदेश राज्यातील पोलीस दलाला गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी काढले आहेत.

आजपासून काय नियम लागू

>>महाराष्ट्रात सकाळी 5 ते रात्री 11 पर्यंत संचारबंदी

>> 5 पेक्षा अधिक नागरिकांना एकत्र येता येणार नाही

>> महाराष्ट्रात रात्री 11 ते प. 5 वा. पर्यंत नाईट कर्फ्यू

>> शाळा आणि कॉलेज 15 फेब्रुवारीपर्यंत बंद राहणार

>> सार्वजनिक वाहतुकीत दोन्ही डोस घेतलेल्यांना परवानगी

10 वी, 12 वीच्या विद्यार्थ्यांना मुभा राहिल

>> लग्न समारंभासाठी 50, अंत्यसंस्कारासाठी 20 जणांना परवानगी

>> सामाजिक, धार्मिक कार्यक्रमासाठी 50 जणांना परवानगी

>> खासगी कार्यालयांमध्ये 50 % उपस्थितीची परवानगी

>> दोन्ही डोस घेतलेल्यांनाच कार्यालयांमध्ये येण्याची मुभा

>> स्वीमिंग पूल, स्पा

>> सलूनमध्ये 50 % उपस्थितीत रात्री 10 पर्यंत परवानगी

>> मनोरंजन पार्क, प्राणी संग्रहालय, म्युझियम बंद

> शॉपिंग मॉल, मार्केट कॉम्प्लेक्स 50 % क्षमतेनं सुरु

>> थिएटर, नाट्यगृह 50 %क्षमतेनं सुरु

> तारखा जाहीर झालेल्या सर्व परीक्षा होणार

शिवसेना आमदाराचं ‘ते’ पत्र व्हायरल, नंतर आमदार म्हणतात ‘तो मी नव्हेच’! तर भाजपकडून मात्र पत्राला जनभावनेची उपमा

Ashes Series: अ‍ॅशेसचा थरार, बेन स्टोक्सने टी-शर्टमध्ये लपवलेला चेहरा, भारतानेही ऑस्ट्रेलियाला असचं रडवलेलं

Murder | प्रेम केलं म्हणून संदीपचा जीव गेला? काठीनं जीव जाईपर्यंत संदीपला मारलं, उपचारादरम्यान दगावला!

Published On - 7:34 pm, Sun, 9 January 22

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI