AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाकिस्तानला लस देण्यापेक्षा महाराष्ट्राला द्या, विजय वडेट्टीवारांची केंद्राकडे मागणी

केंद्र सरकारने पाकिस्तानला लस देण्यापेक्षा, महाराष्ट्राला लस द्यावी, अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.(Minister Vijay Wadettiwar Demand For Corona Vaccine)

पाकिस्तानला लस देण्यापेक्षा महाराष्ट्राला द्या, विजय वडेट्टीवारांची केंद्राकडे मागणी
विजय वडेट्टीवार, मदत आणि पुनर्वसन मंत्री
| Updated on: Apr 10, 2021 | 1:31 PM
Share

मुंबई : “राज्यात कोरोनाची स्थिती भीषण होत चालली आहे. देशातील 50 टक्के रुग्ण महाराष्ट्रात आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने पाकिस्तानला लस देण्यापेक्षा महाराष्ट्राला लस द्यावी,” अशी मागणी मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली. (Minister Vijay Wadettiwar Demand For Corona Vaccine)

“तीन आठवड्यांच्या कडक लॅाकडाऊनची मागणी”

“राज्यात कोरोनाची स्थिती भीषण आहे. त्यामुळेच मी तीन आठवड्यांच्या कडक लॅाकडाऊनची मागणी केली आहे. आज याच विषयावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. या बैठकीत सर्व पक्षांची चर्चा केली जाणार आहे,” अशी माहिती विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे.

“पाकिस्तानला लस देण्यापेक्षा, महाराष्ट्राला लस द्या”

कोरोना प्रतिबंधक लसीचा आलेला साठा दोन दिवसात संपेल. देशातील 50 टक्के रुग्ण महाराष्ट्रात आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने पाकिस्तानला लस देण्यापेक्षा, महाराष्ट्राला लस द्यावी, अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.

“सचिन वाझेने लिहिलेले पत्र बाहेर कसे काय येतात?”

“गृहविभाग परमबीर सिंग यांची चौकशी करत आहेत. या प्रकरणात जो दोषी असेल, त्यांच्यावर कारवाई व्हावी,  असं म्हणत या संपूर्ण प्रकरणात राजकारण होत आहे. NIA ची गुप्त चौकशी सुरु आहे. मग त्यांच्या कोठडीतून सचिन वाझेने लिहिलेले पत्र बाहेर कसे काय येतात?” असा प्रश्नही विजय वडेट्टीवार यांनी उपस्थितीत केला आहे.

सर्वपक्षीय बैठक

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी आज पुन्हा एकदा सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. महाराष्ट्रातील कोरोनाच्या (Maharashtra corona) उद्रेकामुळे उद्भवलेली परिस्थिती पाहता, राज्य सरकार कठोर निर्णय घेऊ शकतं. महाराष्ट्रात 3 आठवड्यांचा लॉकडाऊन लावला जाऊ शकतो. मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनीही तसेच संकेत दिले आहेत.

ख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोलावलेल्या या बैठकीला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray), चंद्रकांत पाटील यांच्यासह सर्वपक्षीय नेत्यांना निमंत्रण दिलं आहे.

राज्यात कोरोनाचा हाहाकार, कोरोना रुग्णांची संख्या 32 लाखांच्या पार

महाराष्ट्रातील कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस विदारक होत चालली आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येतही झपाट्याने वाढ होत आहे. गेल्या 24 तासांत राज्यात 58 हजार 993 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. तर 301 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दिवसभरात 45 हजार 391 रुग्ण पूर्णपणे कोरोनामुक्त झाले आहेत.

राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या 32 लाख 88 हजार 540 वर पोहोचली आहे. त्यातील 26 लाख 95 ङजार 148 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत 57 हजार 329 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. राज्यात सध्या 5 लाख 34 हजार 603 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. (Minister Vijay Wadettiwar Demand For Corona Vaccine)

संबंधित बातम्या : 

Maharashtra Lockdown : प्रत्येक ठिकाणी वेगळा निर्णय नाही, आता संपूर्ण महाराष्ट्रासाठी एकच निर्णय घेणार : अजित पवार

Maharashtra Lockdown | मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक बोलवली, तीन आठवड्याच्या लॉकडाऊनवर निर्णय होणार?

ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....