एकनाथ शिंदे यांनी पत्ते उघडले, ‘या’ नेत्याची मुख्य प्रतोद पदी नियुक्ती, आमदारांना तातडीने व्हीप जारी

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत रमेश बोरनारे यांची मुख्य प्रतोद म्हणून नियुक्ती झाली आहे. ते वैजापूरचे आमदार आहेत. मुख्य प्रतोद पदी नियुक्ती होताच रमेश बोरनारे यांनी शिवसेनेच्या सर्व 57 आमदारांना विशेष अधिवेशनात होणाऱ्या विश्वासदर्शक ठरावावेळी सभागृहात उपस्थित राहण्याचा व्हीप जारी केला आहे.

एकनाथ शिंदे यांनी पत्ते उघडले, 'या' नेत्याची मुख्य प्रतोद पदी नियुक्ती, आमदारांना तातडीने व्हीप जारी
Eknath Shinde
Follow us
| Updated on: Dec 08, 2024 | 9:52 PM

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या मुख्य प्रतोद पदी रमेश बोरनारे यांची निवड करण्यात आली आहे. रमेश बोरनारे हे वैजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. त्यांची आता शिवसेनेच्या मुख्य प्रतोद पदी निवड करण्यात आली आहे. विशेष म्हणजे मुख्य प्रतोद पदी निवड झाल्यानंतर लगेच रमेश बोरनारे यांनी शिवसेनेच्या सर्व 57 आमदारांसाठी व्हीप जारी केला आहे. विधिमंडळाचं सध्या विशेष अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनाचा उद्या शेवटचा दिवस आहे. विशेष अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधानसभेच्या सभागृहात विश्वास दर्शक ठराव मांडण्यात येणार आहे. यावेळी सभागृहात उपस्थित राहण्याचे आदेश मुख्य प्रतोद रमेश बोरनारे यांनी व्हीपद्वारे दिला आहे.

रमेश बोरनारे यांनी व्हीपमध्ये नेमकं काय म्हटलंय?

“शिवसेना विधिमंडळ पक्षाच्या सर्व विधानसभा सदस्यांना पक्षादेश बजावण्यात येत आहे की, शनिवारी, 7 डिसेंबर 2024 पासून मुंबईत विधान भवन येथे विधिमंडळाचं विशेष अधिवेश सुरु होत आहे. या अधिवेशादरम्यान 9 डिसेंबर 2024 ला सरकारचा विश्वासदर्शक प्रस्ताव आहे. शिवसेना पक्षाच्या विधानसभेच्या सर्व सन्माननीय सदस्यांनी सभागृहात पूर्णवेळ उपस्थित राहून विश्वासदर्शक प्रस्तावाच्या बाजूने मतदान करावे, असा पक्षादेश आहे”, असं मुख्य प्रतोद रमेश बोरनारे यांनी व्हीपमध्ये म्हटलं आहे.

रमेश बोरनारे कोण आहेत?

रमेश बोरनारे हे वैजापूरचे विद्यमान आमदार आहेत. ते 2019 च्या विधानसभा निवडणुकीवेळी देखील याच मतदारसंघातून निवडून आले होते. रमेश बोरनारे हे एकनाथ शिंदे यांचे खंदे समर्थक आहेत. शिंदे यांनी शिवसेनेत मोठं बंड पुकारलं त्यावेळी रमेश बोरनारे यांनी त्यांना खमकी साथ दिली होती. गुवाहाटीला जाणाऱ्या 40 शिवसेनेच्या आमदारांमध्ये रमेश बोरनारे यांचादेखील समावेश होता. विशेष म्हणजे 2022 ला झालेल्या सत्तांतरानंतर शिंदेंनी शिवसेना आमदार भरत गोगावले यांना मुख्य प्रतोद केलं होतं. पण यावेळी रमेश बोरनारे यांना संधी देण्यात आली आहे. कदाचित शिंदे यावेळी भरत गोगावले यांना मंत्रिपदाची संधी देणार आहेत. त्यामुळे प्रतोद पदी रमेश बोरनारे यांची वर्णी लागल्याची चर्चा आहे.

हे सुद्धा वाचा

'ते आपलंच पोरगं..', पोलीस अधिकाऱ्यासोबत कराडचे फोनवरुन संभाषण व्हायरल
'ते आपलंच पोरगं..', पोलीस अधिकाऱ्यासोबत कराडचे फोनवरुन संभाषण व्हायरल.
दादांच्या 'त्या' विधानाचा अर्थ काय? दोषी कोण सरकार की लाडक्या बहिणी?
दादांच्या 'त्या' विधानाचा अर्थ काय? दोषी कोण सरकार की लाडक्या बहिणी?.
रत्नागिरीतून ठाकरे गटाला खिंडार अन्... उदय सामंतांचा मोठा दावा काय?
रत्नागिरीतून ठाकरे गटाला खिंडार अन्... उदय सामंतांचा मोठा दावा काय?.
अजितदादांची लाडकी बहीण योजनेवर मोठी कबुली; म्हणाले, 'मागे वेळ कमी...'
अजितदादांची लाडकी बहीण योजनेवर मोठी कबुली; म्हणाले, 'मागे वेळ कमी...'.
'...मी त्यांचा श्रीकृष्ण व्हायला तयार', अभिजीत बिचुकलेंचं मोठं वक्तव्य
'...मी त्यांचा श्रीकृष्ण व्हायला तयार', अभिजीत बिचुकलेंचं मोठं वक्तव्य.
शिंदेंचा लहान फोटो, धनुष्यबाण गायब, माजीमंत्र्याच्या जाहिरातीची चर्चा
शिंदेंचा लहान फोटो, धनुष्यबाण गायब, माजीमंत्र्याच्या जाहिरातीची चर्चा.
पतीकडून पत्नीची हत्या अन् बनवला व्हिडीओ... कारण ऐकून बसेल धक्का
पतीकडून पत्नीची हत्या अन् बनवला व्हिडीओ... कारण ऐकून बसेल धक्का.
नालासोपाऱ्यातील 41 इमारतींवर हातोडा, कित्येक कुटुंब बेघर
नालासोपाऱ्यातील 41 इमारतींवर हातोडा, कित्येक कुटुंब बेघर.
'बाळासाहेब नसते तर काय झालं असतं?' 'सामना' अग्रलेखात नेमकं काय म्हटलं?
'बाळासाहेब नसते तर काय झालं असतं?' 'सामना' अग्रलेखात नेमकं काय म्हटलं?.
'बाळासाहेबांना भारतरत्न द्या', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची मागणी
'बाळासाहेबांना भारतरत्न द्या', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची मागणी.