AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Amit Thackeray : ‘मुलींचा हात धरल्यावर मारणारच, आमच्या नादाला लागू नका’, अमित ठाकरेंची भाजपच्या विद्यार्थी संघटनेला वॉर्निंग

Amit Thackeray : "लाडकी बहिण गेली आता लाडकी मुलगी आली. आकर्षित करण्यासाठी फुकट पैसे कसले वाटताय. जबाबदारी चंद्रकातंदादा पाटील घेणार आहेत का?. माझ्या मुलांना कोण फुकट पैसे देतोय हे मला नाही आवडणार. त्यांना परिपक्वता येऊ द्या" असं अमित ठाकरे म्हणाले.

Amit Thackeray : 'मुलींचा हात धरल्यावर मारणारच, आमच्या नादाला लागू नका', अमित ठाकरेंची भाजपच्या विद्यार्थी संघटनेला वॉर्निंग
Amit Thackeray
| Updated on: Aug 20, 2026 | 9:55 AM
Share

विलेपार्ल्याच्या साठ्ये महाविद्यालयाबाहेर विद्यार्थी नोंदणी मोहिमेवरुन महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना आणि ABVP मध्ये राडा झाला. त्यावर मनविसेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “एबीवीपीचं हे पहिल्यांदा नाहीय. मी विद्यार्थीसेनेचा अध्यक्ष झाल्यापासून ते करतायत. विद्यार्थी त्यांना विचारत नाहीत. कॉलेजच्या आत किंवा गेटवर स्टॉल लावू नका, असं त्यांना साठ्ये कॉलेजने सांगितलेलं. ते मुलींना हात धरुन कुठेतरी घेऊन चाललेले. मुलींचा हात धरल्यावर तुम्हाला मारणारचं. त्यांनी आमच्या नादाला लागू नये. तुमची भाजपची संघटना आहे. भाजपं सत्तेत आहे. उत्तम काम तुम्ही विद्यार्थ्यांसाठी करु शकता. ते तुम्ही करत नाही. मुलींचा हात धरल्यावर मारणारच” असा इशारा अमित ठाकरे यांनी दिला.

“जिथे नादाला लागणार तिथे मार खाणार. तुम्हाला विद्यार्थ्यांसाठी काम करायचय नीट करा. विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवा. तुम्ही जर जबरदस्ती करत असाल आमचे सदस्य व्हा. विद्यार्थ्यांना वाटतं मनविसेचा स्टॉल आहे. लोकांना जबरदस्ती खेचून घेऊन जाऊ नका” असं अमित ठाकरे म्हणाले. “त्यांची किंमत संपली आहे. एखाद-दोन दिवस चॅनलवर दिसलं पाहिजे म्हणून हे चाललं आहे. जी भाजपं सत्तेत आहे, त्या संघटनेला काम करायचं असतं तर किती केलं असतं. इतकीवर्ष का नाही केलं?. विद्यार्थ्यांचे प्रश्न जाणून घेऊन सोडवा. सत्ता आहे तुमच्याकडे. बाथरुमचा विषय आहे, फि चा प्रश्न आहे. आम्हाला जिथे-जिथे प्रश्न दिसतात ते आम्ही सोडवतो” असं अमित ठाकरे यांनी सांगितलं.

हे विषय सोडवायला तुम्हाला किती वर्ष लागतात?

“एलफिन्स्टन कॉलेजचा विषय घ्या, आपण वॉशरुम नवीन करायला लावलं. हे तात्काळ झालं पाहिजे. छोटे-छोटे विषय आहेत. चेतनाच्या बाहेर गर्दुल्यांचा प्रश्न होता, ते मुलींना छेडायचे आपली टीम तिथे गेली. हे विषय सोडवायला तुम्हाला किती वर्ष लागतात? तुम्हाला सोडवायचा असेल तर नीट सोडवा. आमच्यात मध्ये-मध्ये लुडबूड कुरु नका” असा इशारा अमित ठाकरे यांनी दिला.

प्रश्न विचारणाऱ्याला देशद्रोही ठरवलं जातं

“विद्यार्थ्यांचे सगळे विषय घेतलेत. जिथे जमतं तिथे काम सुरु केलय. सगळीकडे काम करुन घेणार. सेलिब्रिटी बनवून ठेवलय राजकारण्यांना. ते अनटचेबल झाले आहेत. कुठल्या मंत्र्याला उत्तर द्यायचं नाहीय. प्रश्न विचारणाऱ्याला देशद्रोही ठरवलं जातं. आता काय नवीन दिमागी नक्षल. आपणच राजकारण्यांना सेलिब्रिटी बनवून ठेवलय. ते फिल्म स्टार्सपेक्षा मोठे झालेत. ज्यांना पदावर बसवलं त्यांना उत्तर द्यायचं नाहीय. चंद्रकांतदादा पाटील कॉलेज लेवललला फिरणार आहेत का?” असं परखड भाष्य अमित ठाकरेंनी केलं.

फुकट पैसे देतोय हे मला नाही आवडणार

सरकार कॉलेजच्या मुलांना पॉकेटमनी देणार या प्रश्नावर अमित ठाकरे यांनी आक्रमक उत्तर दिलं. “कॉलेजच्या मुलांना पॉकेटमनी देणं हे आई-वडिलांचं काम असतं. मला माझ्या मुलांना 2000 रुपये नसतील द्यायचे आणि सरकार देणार असेल तर सरकार जबाबदारी घेणार आहे का?. फुकट पैसे कसले वाटताय?. त्यापेक्षा कॉलेज नीट करा” असं अमित ठाकरेंनी सुनावलं

Follow Us
'पक्ष चोरून तुम्ही मालक होऊ शकत नाही' आदित्य ठाकरेंचा शिंदेंवर निशाणा
आदित्य ठाकरे यांचा शिंदे गटावर हल्लाबोल; 'पक्ष चोरून तुम्ही मालक होऊ शकत नाही'
मुंबई महापालिका मुख्यालयातील उपहारगृह एफडीएच्या परवानगीने पुन्हा सुरू
मुंबई महापालिका मुख्यालयातील उपहारगृह एफडीएच्या परवानगीने पुन्हा सुरू
ज्येष्ठ नागरिकांना मुलांना संपत्तीतून बेदखल करण्याचा अधिकार
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल; ज्येष्ठ नागरिकांना मुलांना संपत्तीतून बेदखल करण्याचा अधिकार
मोदी-शाह संपले; काँग्रेस बैठकीत राहुल गांधींचे मोठे विधान
काँग्रेस बैठकीत राहुल गांधींचे मोठे विधान; 'मोदी-शाह संपले'
मनोज जरांगे पाटील यांचा फडणवीस आणि शिंदेंवर गंभीर आरोप
मनोज जरांगे पाटील यांचा फडणवीस आणि शिंदेंवर गंभीर आरोप; मुंबईकडे कूच करण्याचा इशारा
कंगनाने वर्षा निवासस्थानी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट
कंगना रणौतची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत वर्षा निवासस्थानी भेट
साठ्ये महाविद्यालयाबाहेर मनविसे-एबीविपी कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची
मुंबईतील साठ्ये कॉलेजमध्ये नोंदणी मोहिमेवरून मनविसे आणि एबीविपीत वाद
भारताचा पाकिस्तानवर ५-३ असा दणदणीत विजय
भारताने पाकिस्तानला हरवून हॉकी वर्ल्डकपच्या नॉकआउटमध्ये स्थान मिळवले
राहुल गांधींच्या भेटीनंतर रिया अहिरला धमक्या; पोलिसांकडे तक्रार
राहुल गांधींच्या भेटीनंतर रिया अहिरला धमक्या: युवक काँग्रेसची पोलिसांकडे तक्रार
केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार की नाही? ओमराजेंनी हसत दिलं उत्तर,
केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार की नाही? ओमराजेंनी हसत दिलं उत्तर, काय म्हणाले?