राज ठाकरे दिल्लीला रवाना, राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आज दुपारी दिल्लीला रवाना झाले आहेत. त्यांच्यासोबत पक्षाचे नेते अविनाश अभ्यंकर आणि अनिल शिदोरे देखील आहेत. राज ठाकरेंच्या या दिल्ली वारीने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

राज ठाकरे दिल्लीला रवाना, राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
Follow us
| Updated on: Jul 07, 2019 | 8:22 PM

मुंबई: सध्या राज्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. प्रत्येक पक्ष आपली रणनिती ठरवत असून त्यासाठी भेटी-गाठीही होत आहेत. त्यातच आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आज दुपारी दिल्लीला रवाना झाले आहेत. त्यांच्यासोबत पक्षाचे नेते अविनाश अभ्यंकर आणि अनिल शिदोरे देखील आहेत. राज ठाकरेंच्या या दिल्ली वारीने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

राज ठाकरे आणि त्यांच्यासोबतचे नेते सोमवारी (8 जुलै) दुपारी 12 वाजता केंद्रीय निवडणूक आयुक्तांची भेट घेणार आहेत. यावेळी ते निवडणूक आयुक्तांसमोर आपली ईव्हीएमबाबतची भूमिका मांडण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. राज ठाकरेंनी लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजपविरोधात चांगलेच रान उठवले होते. राज्यात अनेक ठिकाणी त्यांनी सभाही घेतल्या आणि भाजपच्या धोरणांची चिरफाड केली. मात्र, लोकसभा निवडणुकांचा निकाल पाहून त्यांनी एकाच शब्दात प्रतिक्रिया व्यक्त केली, तो शब्द होता ‘अनाकलनीय’. या निकालानंतर राज ठाकरेंनी ईव्हीएमवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. तसेच निवडणूक आयोगाच्या भूमिकांवरही नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे आता राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आपली भूमिका थेट मुख्य निवडणूक आयुक्तांकडे मांडणार असल्याचे दिसत आहे.

दरम्यान, माजी खासदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनीही दुसऱ्यांदा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची ‘कृष्णकुंज’वर जाऊन भेट घेतली होती. या दोघांमध्ये सुमारे तासभर चर्चा झाली. राजू शेट्टी यांनी याआधी लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यानंतर काही दिवसातच  त्यांनी पुन्हा राज ठाकरेंच्या भेट घेतली. त्यामुळे अनेक शक्यता वर्तवल्या जात आहेत. आगामी काळात महाराष्ट्रात नवी समीकरणं दिसण्याचीही शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे.

Non Stop LIVE Update
बच्चू कडूचा राजकारणात कोणी बाप नाही, बच्चू कडू यांचा जोरदार प्रहार
बच्चू कडूचा राजकारणात कोणी बाप नाही, बच्चू कडू यांचा जोरदार प्रहार.
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.