AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Raj Thackrey : ज्यांनी तुमच्या मतांचा अपमान केला, गृहीत धरलं त्यांचा वचपा काढा – राज ठाकरे

राज्यातील बिघडलेल्या राजकारणावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वेळोवळी टीका केली आहे. मात्र आज दसऱ्याच्या दिवशी पॉडकास्टमधून राज्यातील जनतेशी संवाद साधताना राज ठाकरे यांनी या बिघडलेल्या राजकारणावर पुन्हा एकदा आसूड ओढला. ज्यांनी तुमच्या मतांचा अपमान केला, त्यांचा वेध घ्या. स्वप्नातील महाराष्ट्र घडवण्यासाठी मला एक संधी द्या, असे आवाहन राज ठाकरे यांनी केलं.

Raj Thackrey :  ज्यांनी तुमच्या मतांचा अपमान केला, गृहीत धरलं त्यांचा वचपा काढा - राज ठाकरे
राज ठाकरे
| Updated on: Oct 12, 2024 | 9:48 AM
Share

आज दसरा, साडेतीन मुहूर्तांपैकी एक. या दिवशी विजया दशणीच्या शुभेच्छा देत आपण एकमेकांना सोन म्हणून आपट्याची पानं देत असतो. पण महाराष्ट्राचं सोनं तर गेले अनेक वर्ष लुटलं जातंय, आणि आम्ही फक्त आपट्याची पानं एकमेकांना वाटत आहोत. आपल्या हातात आपट्याची पानं सोडून दुसरं काही रहात नाही आणि बाकीचे सगळे सोनं लुटून चालले आहेत, पण आमचं दुर्लक्ष … आम्ही कधी आमच्या आयुष्यात मग्न तर कधी जाती-पातीमध्ये मश्गुल. आमचं या लोकांकडे लक्ष राहणार कधी ? आजचा दसरा खूप महत्वाचा कारण तो निवडणुकीच्या तोंडावर आहे, अशावेळी बेसावध राहून चालणार नाही असे म्हणत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यातील जनतेला संबोधित केले. विजया दशमीनिमित्त पहिल्यांदाच पॉडकास्टवरून संवाद साधताना राज ठाकरे यांनी राज्यातील राजकारणावर आणि राजकारण्यांवर टीका करत आसूड ओढले.

ज्यांनी तुमच्या मतांचा अपमान केला, त्यांचा वेध घ्या. या सत्ताधाऱ्यांनी तुमची फसवणूक केली आहे.  एकदा माझ्या सहकाऱ्यांंना काम करण्याची संधी द्या, जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र करून दाखवतो. स्वप्नातील महाराष्ट्र घडवण्यासाठी मला एक संधी द्या, असे आवाहन राज ठाकरे यांनी केलं.

दरवर्षी तुम्ही बेसावध राहता आणि सगळे राजकारणी आपापले खेळ करत राहतात. पण या सगळ्यात महाराष्ट्राची प्रगती कुठे चालली आहे ? असा सवाल त्यांनी विचारला. फक्त राज्यात रस्ते बांधण, फ्लायओव्हर, ब्रिजेस बांधणं म्हणजे प्रगती नव्हे. घरात कलर टीव्ही आला, हातात मोबाईल आला , ही गॅझेट्स म्हणजे प्रगती नव्हे.

प्रगती ही बुद्धीची व्हावी लागते, डोक्यातून.. प्रगती समजााची व्हावे लागते. परदेशातले देश पाहतो आपण, त्याला प्रगत देश म्हणतात. पण आपण मात्र अजूनही चाचपडतच आहोत.

इतक्या थापा ऐकूनही तुमचा राग व्यक्त होत नाही

पण इतके वर्ष हे लोकं जे थापा मारतात, ते ऐकूनसुद्धा तुमच्यातला राग व्यक्त होताना मला दिसत नाही. त्याच त्याच लोकांना, त्याच माणसांना तुम्ही दरवेलेस निवडून देता. मग काही उरत नाही, पश्चातापाचा हात कपाळावर मारून घेता. पाच वर्षं बोंब मारायची , ऐन मोक्याच्या वेळी तुम्ही शस्त्र झाडावर नेऊन ठेवता.

मतदानाचं जे शस्त्र तुमच्या हातात आहे, ते मतदानाच्या दिवशी न वापरता, या सगळ्या लोकांना शिक्षा न करता तुम्ही ते (मतदानाचं) शस्त्र नुसतं वर ठेवून देता. आणि निवडणुका संपल्या की मग या सगळ्या लोकांवर बोलत राहता, अशा शब्दांत राज ठाकरे यांनी मतदारांना सुनावलं.

मतदानाच्या दिवशी काय होतं ? हा माझ्या जातीचा, हा माझ्या जवळचा, ओळखीचा असं करून राज्य उभं रहात नाही.

हीच क्रांतीची वेळ

सर्वांना संधी दिलीत तुम्ही… या निवडणुकीत तुम्ही मतदारांनी क्रांती केली पाहिजे, आजपर्यंत तुम्ही ज्यांना सांभळलं ते तुमच्या मतांशी प्रतारण करत आले आहेत. त्यानी तुम्हाला गृहीत धरलं. आणि हेच गृहीत धरणं महाराष्ट्राचं नुकसान करत आहे.

महाराष्ट्रातील तरूण वर्ग, शेतकरी सगळ्यांना मी विनंती करतो की या निवडणुकीत बेसावध राहू नका. शमीच्या झाडावरची ती शस्त्र आता उतरवा. ही क्रांतीची वेळ आहे, वचपा काढण्याची वेळ आहे. ती शस्त्र उतरवून त्या सगळ्या ( राजकारण्यांचा) वेध घ्या. गेली 5 वर्ष ज्यांनी तुमच्या मतांशी प्रतारण केली, ज्यांनी तुमच्या मतांचा अपमान केला, ज्यांनी तुम्हाला गृहीत धरलं. वेडीवाकडी युती आणि आघाडी केली, त्यांचा वचपा काढा.

मी गेली अनेक वर्ष एका महाराष्ट्राचं स्वप्न पहात आहे, ती साकारण्याची संधी मला मिळू दे, जगाला हेवा वाटावा असा महाराष्ट्र माझ्या हातून घडू दे , तेच माझं स्वप्न आहे. ती संधी मला द्या, असं आवाहन राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील तमाम जनतेला केलं.

Follow Us
भगवा टिळा अन् धीरज परदेशी प्रकरण; आमदाराच्या खळबळजनक आरोपानंतर संताप,
भगवा टिळा अन् धीरज परदेशी प्रकरण; आमदाराच्या खळबळजनक आरोपानंतर संताप, अखेर मुख्यमंत्र्यांनी...
भारत-चीन सीमावाद पुन्हा चर्चेत, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाण...
भारत-चीन सीमावाद पुन्हा चर्चेत, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाण... अखेर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने चीनचे टोचले कान, काय घडलं?
पंतप्रधानांच्या नव्या व्हिडीओचा सोशल मीडियावर धुमाकूळ!
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नव्या व्हिडीओचा सोशल मीडियावर धुमाकूळ; नेमकं काय म्हणाले?
सुनावणी संपताच ठाकरेंच्या वकिलांची कोर्टाकडे मोठी मागणी; काय घडलं?
ShivSena | सुनावणी संपताच ठाकरेंच्या वकिलांची कोर्टाकडे मोठी मागणी; नेमकं काय घडलं?
शिवसेना पक्ष-चिन्हाचा फैसला जवळ? संजय राऊत म्हणाले, आशेचा किरण...
Sanjay Raut | शिवसेना पक्ष-चिन्हाचा फैसला जवळ? कपिल सिब्बलांच्या युक्तिवादानंतर संजय राऊत म्हणाले, आशेचा किरण...
विधिमंडळ पक्षात फूट म्हणजे राजकीय पक्षात फूट नाही!
Shivsena Case Hearing | विधिमंडळ पक्षात फूट म्हणजे राजकीय पक्षात फूट नाही!; कपिल सिब्बलांचा सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तिवाद
आमचा युक्तीवाद सुरु होईल तेव्हा... कपिल सिब्बल यांच्या दाव्यांवर शिंदे
आमचा युक्तीवाद सुरु होईल तेव्हा... कपिल सिब्बल यांच्या दाव्यांवर शिंदे गटाकडून सर्वात मोठी प्रतिक्रिया
2018ची घटना असंवैधानिक तर शिंदेंची निवड संवैधानिक कशी?
मोठी बातमी! 2018ची घटना असंवैधानिक तर शिंदेंची निवड संवैधानिक कशी? कपिल सिब्बलांचा कोर्टात मोठा युक्तिवाद
अखेर मुळ शिवसेना कुणाची? सिब्बलांकडून थेट लेखी निवेदनाची प्रत सादर
अखेर मुळ शिवसेना कुणाची? सिब्बलांकडून थेट लेखी निवेदनाची प्रत सादर, चार मुद्यामध्येच... कोर्टात नेमकं काय घडलं?
TET पेपरफुटीचं महाराष्ट्र कनेक्शन उघड! खासगी अकॅडमी चालकाला अटक
TET पेपरफुटीचं महाराष्ट्र कनेक्शन उघड! सोलापुरातून खासगी अकॅडमी चालकाला अटक