AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Prakash Mahajan : ‘तुम्हाला भिणारे दुसरे असतील, मी कुठे येऊ सांगा’, मनसे नेत्याच नारायण राणेंना ओपन चॅलेंज

Prakash Mahajan : प्रकाश महाजन यांना धमकीचा मेसेज, फोन कॉल आल्यानंतर मराठवाडा पोलीस त्यांच्या घरी गेले आहेत. त्यांच्याकडून माहिती घेतली जात आहे. प्रकाश महाजन यांचा नारायण राणेंसोबत शाब्दीक वाद पेटला आहे. नारायण राणे यांनी फेसबुकच्या माध्यमातून प्रकाश महाजन यांना धमकीवजा इशारा देणारी पोस्ट केली. त्याला आता प्रकाश महाजन यांनी चॅलेंज केलं आहे.

Prakash Mahajan : 'तुम्हाला भिणारे दुसरे असतील, मी कुठे येऊ सांगा', मनसे नेत्याच नारायण राणेंना ओपन चॅलेंज
Narayan Rane vs Prakash Mahajan
| Updated on: Jun 10, 2025 | 10:29 AM
Share

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते प्रकाश महाजन आणि भाजप नेते, माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यातील शाब्दीक वाद चांगलाच पेटला आहे. काल मनसेचे नेते प्रकाश महाजन यांनी नितेश राणे यांच्यावर टीका केल्यानंतर, नारायण राणे यांनी फेसबुकच्या माध्यमातून प्रकाश महाजन यांना धमकीवजा इशारा देणारी पोस्ट केली होती. यानंतर प्रकाश महाजन यांना अनेक धमकीचे फोन आले होते. आता प्रकाश महाजन यांनी थेट नारायण राणे यांना आव्हान देणारी भाषा केली आहे. त्यांनी नारायण राणे यांच्यावर अत्यंत बोचरी, जिव्हारी लागणारी टीका केली आहे. “मी नारायण राणे नावाच्या राजकीय गुंडाविरुद्ध लढायला तयार आहे. नारायण राणे मी कणकवलीत येतो, करायला लावा उलट्या. मला लेचपेचा समजू नका. माझ्या नेत्यावर टीका करणार, मी काय तुमच्या मुलावर फुले उधळू का?” असा सवाल प्रकाश महाजन यांनी केला आहे.

“उध्दव ठाकरे यांना उध्दव म्हणतो, हा तुझ्या वयाचे आहेत का ते?. तुम्हाला भिणारे दुसरे असतील, मी कुठे येऊ सांगा. दिल्ली, मुंबई किंवा कणकवलीतल्या घरी येतो. जीवाला भिलो असतो, तर एक शिक्षकाचा मुलगा राजकारणात आला नसता. नारायण राणे आता भाजपमध्ये आलेत. बाळ स्वयंसेवक आहे मी, आणीबाणी भोगलीय मी” असं प्रकाश महाजन म्हणाले. “दुर्देव आहे ज्या गोपीनाथ मुंडेंनी राज्यातील गुन्हेगारी विरोधात आवाज उठवला, त्या भारतीय जनता पार्टीत असे गुन्हेगार येऊन बसले आहेत” अशा शब्दात नारायण राणेंवर हल्लाबोल केला.

‘नारायण राणे यांनी स्वतःच्या मुलाच्या दोन थोबाडीत मारायला पाहिजे होत्या’

“खुलेआम संवैधानिक पदावर असताना धमक्या देत आहेत, आणि गृहमंत्री याची दखल घेत नाहीत. नारायण राणे म्हणाले होते, बाळासाहेब माझ्या जीवनात नसते तर माझा एन्काऊंटर झाला असता, सामान्य माणसांचा होतो एन्काऊंटर. नारायण राणे यांनी स्वतःच्या मुलाच्या दोन थोबाडीत मारायला पाहिजे होत्या. संघ, भाजप आणि फडणवीस यांच्याबद्दल काय बोलतात हे बापलेक काढून पहा. “गिड्ड त नू फितनतू” गिड्ड्या माणसाचा जन्मजात स्वभाव कळत नाही ही म्हण आहे मराठवाड्यात. मी क्रांती चौकात जाऊन थांबणार” असं प्रकाश महाजन म्हणाले.

‘केंद्रीय मंत्री पदावरून तुम्हाला का काढलं ते पण सांगा’

“राज ठाकरेंचा मी कर्यकर्ता आहे. अमित ठाकरेंसोबत माझे बोलणे झाले आहे. मी साहित्यक भाषेत बोललो तर राग आला, मी जर बीडच्या भाषेत बोललो तर काय होईल?. मी तर महाजन आहे, आमचे तोंड फाटकं आहे. केंद्रीय मंत्री पदावरून तुम्हाला का काढलं ते पण सांगावे. आमचे पण दोन- चार मित्र भाजपमध्ये आहेत” अशी टीका प्रकाश महाजन यांनी केली.

धमक्या देणा-यांना प्रकाश महजनांकडून आव्हान. “आज मी क्रांती चौकात उभा राहणार आहे. ज्यांना माझे घर माहित नाही, त्यांनी क्रांती चौकात यावे आणि काय करायचे ते करावे” असं प्रकाश महाजन म्हणाले.

Follow Us
साहेब पाण्याचा थेंब नाही, बाजारात गेलो होतो पण...मुख्यमंत्र्यांपुढे...
Devendra Fadnavis : साहेब पाण्याचा थेंब नाही, बाजारात गेलो होतो पण...मुख्यमंत्र्यांपुढे हात जोडत शेतकरी ढसा ढसा रडला
निवडणूक आयोगावर बोलताना राऊतांची जीभ घसरली; त्या वक्तव्यावरून...
Ram Kadam : निवडणूक आयोगावर बोलताना राऊतांची जीभ घसरली; त्या वक्तव्यावरून राम कदमांचा पलटवार
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला! आजची सुनावणी...
Shiv Sena Symbol : शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला! आजची सुनावणी झालीच नाही; आता पुढे...
IIT पवई प्रकरणात मोठा ट्विस्ट! साहिल वाकोडेचा iPhone पोलिसांच्या हाती
IIT पवई प्रकरणात मोठा ट्विस्ट! साहिल वाकोडेचा iPhone पोलिसांच्या हाती, ChatGPT संदर्भांतील आरोपाचं काय होणार?
देश असाच चालणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय?; कपिल सिब्बलांचा सवाल
Kapil Sibal : देश असाच चालणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय?; कपिल सिब्बलांचा सवाल, नेमकी काय केली मागणी?
निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर..
Satej Patil : निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर थेट आरोप
निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत
Election Commission : निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत 14 वेळा आक्षेप! वाचा प्रकरण काय?
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची अनोखी मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई, 80 मंडळांवर गुन्हे
भाजपमध्ये संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी
BJP : भाजपमध्ये मोठा संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी