चिखलोली धरणाचं काम संथगतीनं , नियोजनशून्य कामाचा मनसेकडून अनोख्या पद्धतीनं निषेध

चिखलोली धरणाची उंची वाढवण्याचं संथगतीने होत असल्यानं मनसे कार्यकर्त्यांनी अंबरनाथमध्ये मनसेनं धरणावर जाऊन केक कापत निषेध केला MNS Protest Ambarnath Chikhloli dam

चिखलोली धरणाचं काम संथगतीनं , नियोजनशून्य कामाचा मनसेकडून अनोख्या पद्धतीनं निषेध
मनसेकडून चिखलोली धरणावर निषेध

अंबरनाथ: एखाद्या प्रश्नाकडे लक्ष वेधायचं असेल आणि आंदोलन करायचं असेल तर आजकाल अनोख्या पद्धतींचा वापर करण्यात येतो. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी अंबरनाथमध्ये अनोख्या आंदोलनानं एका प्रश्नाकडं लक्ष वेधलं आहे. चिखलोली धरणाची उंची वाढवण्याचं संथगतीने होत असल्यानं मनसे कार्यकर्त्यांनी अंबरनाथमध्ये मनसेनं धरणावर जाऊन केक कापत निषेध केला. नियोजनशून्य कामाच्या वर्षपूर्तीचा निषेध म्हणून केक कापल्याची माहिती, मनसे पदाधिकाऱ्यांनी दिली. (MNS Protest at Ambarnath Chikhloli dam by cutting cake)

धरणाची उंची वाढवण्याचं काम वर्षभरापासून

अंबरनाथ शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या चिखलोली धरणाची उंची वाढवण्याचं काम वर्षभरापासून सुरु आहे. हे काम अतिशय संथगतीने सुरु असल्याचा आरोप मनसेनं केलाय. याचाच निषेध करण्यासाठी मनसेनं धरणावर जाऊन केक कापला. नियोजनशून्य कामाच्या वर्षपूर्तीच्या निषेध म्हणून हा केक कापल्याची भूमिका मनसेचे अंबरनाथ शहर संघटक स्वप्नील बागलू यांनी स्पष्ट केली.

चिखलोली धरणातून होणारा पाणीपुरवठा बंद

अंबरनाथ शहराच्या पूर्व भागाला चिखलोली धरणातून पाणीपुरवठा केला जात होता. मात्र ३ वर्षांपूर्वी या धरणाचं पाणी एमआयडीसीतल्या केमिकल वेस्टमुळे दूषित झाल्याचं समोर आलं होतं. यानंतर तत्कालीन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी या धरणातून होणारा पाणीपुरवठा थांबवत धरणात प्रदूषण करणाऱ्या कंपन्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले. हे गुन्हे अद्याप दाखल झाले नसले, तरीही धरणातून होणारा पाणीपुरवठा मात्र बंद झाला.

वर्षभरापासून संथगतीनं कामं

धरणाची उंची वाढवण्याचं काम हाती घेण्यात आलं. त्यामुळे गेल्या पावसाळ्यात संपूर्ण भरलेलं धरण रिकामं करण्यात आलं. मात्र, वर्ष उलटूनही या कामाला म्हणावी तशी गती मिळालेली नाहीये. या धरणाचं पाणी बंद असल्यानं पर्यायी व्यवस्था म्हणून एमआयडीसीकडून अंबरनाथ शहराला पाणीपुरवठा होत असला, तरी तो अपुरा असून शहरात नागरिकांना या पाणीटंचाई सोसावी लागतेय.

धरणाच्या या संथगतीने चाललेल्या कामाचा निषेध करण्यासाठी गुरुवारी मनसेचे अंबरनाथ शहरातील कार्यकर्ते चिखलोली धरणावर पोहोचले. धरणाच्या नियोजनशून्य कामाच्या वर्षपूर्तीच्या निषेध असा उल्लेख असलेला केक या कार्यकर्त्यांनी कापला. यानंतर तरी आता लघुपाटबंधारे विभाग या धरणाची उंची वाढवण्याच्या कामाला गती देतो का? हे पाहावं लागणार आहे.

संबंधित बातम्या :
पैशांअभावी बाळाचं ऑपरेशन रखडलं, पाय कापावा लागणार होता पण…

जळगावातील धक्कादायक घटना, बस रिव्हर्स घेताना वृद्ध महिलेचा चाकाखाली येऊन मृत्यू

(MNS Protest at Ambarnath Chikhloli dam by cutting cake)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI