AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबई-पुण्यातील मनसे उमेदवारांची आज होणार घोषणा? निवडणुका जाहीर होताच राज ठाकरे ॲक्शन मोडमध्ये

विधानसभा निवडणुकांची घोषणा होताच महाराष्ट्र नवनिर्माण सेना ॲक्शन मोडमध्ये आली आहे. सध्या राज्यात मनसेच्या बैठकांचा धडाका पाहायला मिळत आहे.

मुंबई-पुण्यातील मनसे उमेदवारांची आज होणार घोषणा? निवडणुका जाहीर होताच राज ठाकरे ॲक्शन मोडमध्ये
महायुतीच्या विरोधातच राज ठाकरेंनी 135 उमेदवार उभे केले. मात्र मतदान होण्याआधीच राज ठाकरेंनी भाजपसोबत जाणार असल्याचं सांगून पत्तेही उघड केले. त्यामुळे आता राज्यात नवीन समीकरण जुळणार असल्याचं दिसून येत आहे.
| Updated on: Oct 16, 2024 | 8:41 AM
Share

Raj Thackeray MNS Meeting : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांचे काऊंटडाऊन सुरु झाले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने मंगळवारी पत्रकार परिषद घेत राज्यातील निवडणुकांची घोषणा केली. त्यानुसार येत्या २० नोव्हेंबर २०२४ ला महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक पार पडणार आहे. तर त्यानंतर लगेचच तीन दिवसांनी २३ नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होतील. आगामी विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजताच राज्यातील सर्वच पक्ष जोमाने कामाला लागले आहेत. विधानसभा निवडणुकांची घोषणा होताच महाराष्ट्र नवनिर्माण सेना ॲक्शन मोडमध्ये आली आहे. सध्या राज्यात मनसेच्या बैठकांचा धडाका पाहायला मिळत आहे.

शिवतीर्थावर महत्त्वाची बैठक

विधानसभा निवडणुकांची घोषणा होताच राज्यात मनसेच्या बैठकांचा धडाका पाहायला मिळत आहे. आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मुंबईतील शिवाजी पार्क या ठिकाणी असलेल्या शिवतीर्थ या निवासस्थानी एक महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीला मनसेचे महत्त्वाचे नेते उपस्थित असणार आहेत. राज ठाकरे यांनी स्वत: ही बैठक बोलवली आहे. आज १६ ऑक्टोबरला सकाळी साधारण नऊ वाजता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी ही बैठक होणार आहे.

पुण्यात अमित ठाकरेंच्या उपस्थितीत बैठक

कालच राज्यात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. त्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी ही बैठक बोलवली आहे. तर दुसरीकडे राज ठाकरेंचे सुपूत्र आणि मनसे नेते अमित ठाकरे हे आज पुणे दौऱ्यावर असणार आहेत. अमित ठाकरे यांच्या उपस्थितीत पुण्यात बैठक पार पडणार आहे. सकाळी साधारण १० नंतर पुण्यात मनसेच्या बैठकांचे सत्र सुरु होईल. या बैठकीला पुण्यातील मनसेचे नेते आणि पदाधिकारी उपस्थति असणार आहे.

मनसेच्या उमेदवारांची यादी

विधानसभा निवडणुकांची घोषणा होण्यापूर्वीच मनसेने काही जागांवर उमेदवारांची नावे जाहीर केली आहे. यात मुंबईसह महाराष्ट्रातील काही महत्त्वाच्या मतदारसंघांचा समावेश आहे.

1. शिवडी, मुंबई – बाळा नांदगावकर 2. पंढरपूर – दिलीप धोत्रे 3. लातूर ग्रामीण – संतोष नागरगोजे 4. हिंगोली विधानसभा – बंडू कुटे 5. चंद्रपूर – मनदीप रोडे 6. राजुरा – सचिन भोयर 7. वणी – राजू उंबरकर

दरम्यान राज ठाकरे यांचे सुपूत्र आणि मनसे नेते अमित ठाकरे हे वरळी विधानसभा मतदारसंघातून लढणार असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. त्यामुळे आज आयोजित केलेल्या बैठकीत मनसेच्या मुंबई-पुण्यातील उमेदवारांची घोषणा केली जाणार आहे. तसेच आदित्य ठाकरेंविरुद्ध अमित ठाकरेंना रिंगणात उतरवायचे की नाही, याबद्दलही चर्चा केली जाणार असल्याचे बोललं जात आहे. त्यामुळे आता या बैठकीत नेमकं काय होतं? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

इकडं अटक वॉरंट जारी अन् तिकडं कोकाटे लिलावती रुग्णालयात दाखल, झाल काय?
इकडं अटक वॉरंट जारी अन् तिकडं कोकाटे लिलावती रुग्णालयात दाखल, झाल काय?.
ठाकरे सेना ही राहुल गांधींची टेस्ट ट्यूब बेबीची शिवसेना...कुणाची टीका?
ठाकरे सेना ही राहुल गांधींची टेस्ट ट्यूब बेबीची शिवसेना...कुणाची टीका?.
गड-किल्ल्यांवरील हिरवी चादर स्वतःच गुंडाळा, अन्यथा... राणेंचा इशारा
गड-किल्ल्यांवरील हिरवी चादर स्वतःच गुंडाळा, अन्यथा... राणेंचा इशारा.
माणिकराव कोकाटेंचं मंत्रिपद धोक्यात, अटक वॉरंट जारी; प्रकरण नेमकं काय?
माणिकराव कोकाटेंचं मंत्रिपद धोक्यात, अटक वॉरंट जारी; प्रकरण नेमकं काय?.
शिवतीर्थावरील चाफा...आशिष शेलारांकडून ठाकरे बंधूंवर खोचक टीका
शिवतीर्थावरील चाफा...आशिष शेलारांकडून ठाकरे बंधूंवर खोचक टीका.
मलिकांमुळे महायुतीतून 'दादा आऊट', भाजप अन् राष्ट्रवादीची भूमिका काय?
मलिकांमुळे महायुतीतून 'दादा आऊट', भाजप अन् राष्ट्रवादीची भूमिका काय?.
मिंधेंचा पक्ष डुप्लिकेट, तसंच त्यांचं ढोंग... राऊतांची शिंदेवर टीका
मिंधेंचा पक्ष डुप्लिकेट, तसंच त्यांचं ढोंग... राऊतांची शिंदेवर टीका.
मोठी बातमी, मंत्री माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल, कोणत्याही क्षणी अटक?
मोठी बातमी, मंत्री माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल, कोणत्याही क्षणी अटक?.
बाण-पंजा एक साथ...शिंदे-काँग्रेस युतीचे नवं पर्व, दानवेंचं टीकास्त्र
बाण-पंजा एक साथ...शिंदे-काँग्रेस युतीचे नवं पर्व, दानवेंचं टीकास्त्र.
निवडणुकीपूर्वी अंबरनाथमध्ये थरार, BJP उमेदवाराच्या कार्यालयावर गोळीबार
निवडणुकीपूर्वी अंबरनाथमध्ये थरार, BJP उमेदवाराच्या कार्यालयावर गोळीबार.