AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कल्याण स्टेशनवर मोठा राडा; मनसे कार्यकर्त्यांनी स्टेशन मास्तरला चोपला

कल्याण रेल्वे स्टेशनवर मोठा राडा झाला आहे. मनसे कार्यकर्त्यांनी स्टेशन मास्तरला चोप दिला आहे. या मारहाणीनंतर जीआरपी पोलिसांनी मनसे कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं.

कल्याण स्टेशनवर मोठा राडा; मनसे कार्यकर्त्यांनी स्टेशन मास्तरला चोपला
kalyan newsImage Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Oct 05, 2026 | 1:51 PM
Share

सुनील जाधव, प्रतिनिधी : कल्याणमधून मोठी बातमी हाती आली आहे. कल्याणमध्ये रेल्वे स्टेशनवर मोठा राडा झाला आहे. कल्याण रेल्वे स्थानकात मनसे पदाधिकाऱ्याला स्टेशन मास्तरला चोप दिल्याची घटना उघडकीस आली आहे. महिला पॉइंट्समनसोबत गैरवर्तनाचा आरोप करत मनसे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी स्टेशन मास्तरला चोप दिला. स्टेशन मास्तरला चोप दिल्याने त्यांच्या सहकारी कर्मचाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली. स्टेशन मास्तरला चोप देतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

कल्याण रेल्वे स्थानकात कार्यरत असलेल्या महिला पॉईंट्समनसोबत गैरवर्तनाचा आरोप स्टेशन मास्तरावर होता. त्यानंतर मनसे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी स्टेशन मास्तरला चोप दिला. डीवाय स्टेशन मास्तरकडून सहा महिन्यांपासून त्रास दिल्याचा महिलेचा आरोप आहे. या स्टेशन मास्तरने घरी येण्यास सांगत अश्लील भाषेत बोलल्याचा आरोप महिलेचा होता. या महिलेने मनसे पदाधिकाऱ्यांकडे स्टेशन मास्तरची तक्रार केली होती. हा प्रकार उघडकीस येताच मनसे रेल्वे कामगार सेना पदाधिकारी आक्रमक झाले. त्यांनी डीवाय स्टेशन मास्तर आशुतोष कुमार यांना पदाधिकाऱ्यांनी मारहाण करत चोप दिला. त्यानंतर कल्याण जीआरपीने कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. आता या प्रकरणात डिवाय स्टेशन मास्तवर काय कारवाई केली जाते, हे पाहावे लागेल.

डोंबिवलीत भटक्या कुत्र्याला बेदम मारहाण 

डोंबिवलीत भटक्या कुत्र्याला बेदम मारहाण करून फाशी देऊन हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय.  सागर्ली येथील सुरेश कॉम्प्लेक्समध्ये हा प्रकार घडल्याची तक्रार करण्यात आलीये.. कुत्र्याला बॅटने मारहाण करण्यात आली. त्यानंतर वॉचमनने कुत्र्याच्या गळ्यात दोरी बांधून फाशी दिल्याचा दावा तक्रारीत करण्यात आलाय. या घटनेचा व्हिडिओही समोर आला आहे. ही घटना सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दरम्यान, प्राणीमित्र हिर मंजीतसिंग राजपूत यांच्या तक्रारीवरून मानपाडा पोलिसांनी दोन रहिवासी आणि वॉचमनविरोधात गुन्हा दाखल केलाय. सोसायटीमधील तिघांनी कुत्र्याला अमानुषपणे मारहाण केल्याने एकच खळबळ उडाली आहे. आता या प्रकणात नागरिकांकडून तिघांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

Follow Us
ज्ञानेश कुमारांना दिलासा की पुढे संकट?; सुप्रीम कोर्टाने अंतरिम कारवाई
Gyanesh Kumar Hearing Update : ज्ञानेश कुमारांना दिलासा की पुढे संकट?; सुप्रीम कोर्टाने अंतरिम कारवाई नाकारली, कारण...
लाज आम्हाला नाही, तर...; चित्रा वाघ यांचा रोहित पवारांवर थेट पलटवार
Chitra Wagh vs Rohit Pawar : लाज आम्हाला नाही, तर...; चित्रा वाघ यांचा रोहित पवारांवर थेट पलटवार
MPSC च्या आंदोलनासाठी बारामतीतून गाड्या आणल्या म्हणत थेट व्हिडीओच...
MPSC च्या आंदोलनासाठी बारामतीतून गाड्या आणल्या म्हणत थेट व्हिडीओच दाखवला; रोहित पवारांवर गंभीर आरोप
नवरात्रीचा खर्च कमी करून दुष्काळग्रस्तांसाठी मोठी मदत; 18 लाख...
इतर खर्च कमी करून दुष्काळग्रस्तांसाठी मोठी मदत; 11 लाख देण्याचा निर्णय, भाजप नेत्याचा पुढाकार
बोरिवलीतील सावरकर उद्यानात गुजराती बॅनरवरून मनसेचे आंदोलन, मराठी...
बोरिवलीतील सावरकर उद्यानात गुजराती बॅनरवरून मनसेचे आंदोलन, मराठी-गुजराती मुद्द्यावरून वाद
भोरमध्ये भातशेती संकटात; पावसाअभावी जमिनीला भेगा, हातातोंडाशी आलेलं...
भोरमध्ये भातशेती संकटात; पावसाअभावी जमिनीला भेगा, हातातोंडाशी आलेलं पीक करपलं
रोहित पवार आमच्यासोबत कॅबिनेटमध्ये मंत्री होतील; नितेश राणेंचं विधान
रोहित पवार आमच्यासोबत कॅबिनेटमध्ये मंत्री होतील अन्... नितेश राणेंचं मोठं विधान चर्चेत
आदिवासी विद्यार्थ्यांचा मुंबई मोर्चा पोलिसांनी रात्रीच अडवला...
आदिवासी विद्यार्थ्यांचा मुंबई मोर्चा पोलिसांनी रात्रीच अडवला, विजय वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
MPSC विद्यार्थ्यांसाठी राहुल गांधी मैदानात; पुण्यातील आंदोलनस्थळी...
MPSC विद्यार्थ्यांसाठी राहुल गांधी मैदानात; पुण्यातील आंदोलनस्थळी जाणार
पुणे बंदच पडले पाहिजे, अभिजीत दिपकेचं मोठं आवाहन; थेट म्हणाले, फोन करा
पुणे बंदच पडले पाहिजे, अभिजीत दिपकेचं मोठं आवाहन; थेट म्हणाले, फोन करा अन्...