AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! मोदींच्या मंत्रिमंडळात मोठा फेरबदल होण्याची शक्यता; राज्यातील 2 खासदारांना संधी मिळणार..

मोदी सरकार आपल्या केंद्रीय मंत्रिमंडळात मोठे बदल करण्याच्या तयारीत आहे. तसा निर्णय देखील झाला. फक्त आता घोषणा बाकी आहे. दोन नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. यामध्ये राज्यातील दोन खासदारांचे नाव चर्चेत आहे.

मोठी बातमी! मोदींच्या मंत्रिमंडळात मोठा फेरबदल होण्याची शक्यता; राज्यातील 2 खासदारांना संधी मिळणार..
Modi government Cabinet
| Updated on: Jun 26, 2026 | 11:39 AM
Share

मागील काही दिवसांपासून केंद्र सरकारकडून मोठे निर्णय घेतले जात आहेत. इराण आणि अमेरिका युद्धात सरकारने काही निर्णय घेतले. एलपीजी गॅससह पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये वाढ केली. आता केंद्रातील मोदी सरकारच्या मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या हालचालींना वेग आला. मोठे फेरबदल केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळात होऊ शकतात. फक्त औपचारिक घोषणा करणे बाकी असून सर्वकाही ठरल्याचीही माहिती मिळतंय. यादरम्यान नव्या चेहऱ्यांना मंत्रिमंडळात संधी मिळू शकते, अशीही एक चर्चा आहे. जुलै महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात मंत्रिमंडळातील फेरबदलाची घोषणा होऊ शकते. ज्या मंत्र्यांची कामगिरी चांगली नाही, अशांना बाहेरचा रस्ता दाखवून नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाऊ शकते, असे सूत्रांकडून सांगितले जात आहे. दोन केंद्रिय मंत्र्यांना डिच्चू देऊन दोन नव्या चेहऱ्यांना संधी मिळू शकते.

विशेष बाब म्हणजे राज्यातील दोन खासदारांना मोदी सरकार त्यांच्या मंत्रिमंडळात स्थान देऊ शकते, अशी चर्चा आहे. खासदार श्रीकांत शिंदे आणि खासदार संजय जाधव यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश होऊ शकतो, अशी जोरदार चर्चा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. यामुळे कोणत्याही क्षणी या फेरबदलाची घोषणा होऊ शकते.

काही दिवसांपूर्वीच एकनाथ शिंदे यांनीही अमित शाह यांची भेट घेतली. ठाकरे गटातील 6 खासदारांच्या बंडखोरीनंतर एकनाथ शिंदे यांच्या पक्षाची ताकद वाढली. आता श्रीकांत शिंदे आणि संजय जाधव यांना थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात स्थान मिळू शकते. तसा निर्णयही झाल्याची माहिती मिळत आहे.

शिवसेना ठाकरे गटाची साथ सोडत चक्क 6 खासदार शिवसेना शिंदे गटात गेले. मुंबईमध्ये त्यांचा पक्षप्रवेशही झाला. याबाबत मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. ऑपरेशन टायगर यशस्वी करण्यासाठी खासदार श्रीकांत शिंदे यांनी मोठे काम केले. खासदारांच्या संपर्कात तेच होते. लोकसभा अध्यक्षांच्या भेटीनंतर एकनाथ शिंदे राज्यात दाखल झाले होते. श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ऑपरेशन टायगर यशस्वी झाले.

Follow Us
Video : राम मंदिर दानचोरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
Video : राम मंदिर दानचोरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुप्रिया सुळेंनी सुचवला पर्याय, म्हणाले...
Video :  शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुप्रिया सुळेंनी सुचवला पर्याय, म्हणाले ते हजारो कोटी रुपये थेट..राजकारण न करण्याचं आवाहन!
राज्यात दुष्काळ जाहीर होताच आदित्य ठाकरेंचे महत्त्वाचे विधान!
Video: दुष्काळ बाजूला ठेव, बांधावर जाऊन...राज्यात दुष्काळ जाहीर होताच आदित्य ठाकरेंचे महत्त्वाचे विधान!
हंडाभर पाण्यासाठी महिलांचा रोजचा संघर्ष; परभणीत दुष्काळाचं गडद सावट
Parbhani : पहाटे 4 वाजता उठायचं, 2.5 किमी... हंडाभर पाण्यासाठी महिलांचा रोजचा संघर्ष; परभणीत दुष्काळाचं गडद सावट, Video व्हायरल
स्क्रिप्ट रायटर, समुपदेशनाची गरज... शायना एन.सी. यांचा राऊतांवर पलटवार
Shaina NC : स्क्रिप्ट रायटर, समुपदेशनाची गरज म्हणत... शायना एन.सी. यांचा संजय राऊतांवर पलटवार
Pune : लांबलेल्या गणेश विसर्जन मिरवणुकांमध्ये काय घडतंय?
Video: पुण्यात 28 तासांपासून तुफान गर्दी, डान्स अन् गाणं सुरूच...लांबलेल्या गणेश विसर्जन मिरवणुकांमध्ये काय घडतंय?
आम्ही मरावं की जगावं... दुष्काळी परिस्थितीबाबत सांगताना शेतकऱ्याला...
Jalna : आम्ही मरावं की जगावं... दुष्काळी परिस्थितीबाबत सांगताना शेतकऱ्याला अश्रू अनावर
बाप्पा विसर्जनाच्या प्रतीक्षेत ताटकळला; उपनगरचा राजा काल सकाळपासून...
Ganpati Visarjan 2026 : बाप्पा विसर्जनाच्या प्रतीक्षेत ताटकळला; उपनगरचा राजा काल सकाळपासून मढ जेटीवरच, प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह
राज्यात दुष्काळ जाहीर; दत्ता भरणे नेमकं काय म्हणाले?
Maharashtra Drought Issue : राज्यात दुष्काळ जाहीर; दत्ता भरणे नेमकं काय म्हणाले?
राऊत अचानक राज ठाकरेंच्या भेटीला दोघांमध्ये नेमकी काय चर्चा?
Sanjay Raut Meet Raj Thackeray : संजय राऊत अचानक राज ठाकरेंच्या भेटीला शिवतीर्थवर! दोघांमध्ये नेमकी काय चर्चा? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण