AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Monsoon Update : राज्यात जोरदार पावसाची शक्यता, पुढील मान्सूनची वाटचाल कशी असणार? पंजाबराव डख यांचा मोठा इशारा

अखेर आता मान्सूनची प्रतिक्षा संपली आहे, मान्सून तळकोकणात दाखल झाला आहे. दरम्यान पुढील काही दिवसांमध्ये मान्सूनची वाटचाल कशी असेल? याबाबत हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी अंदाज वर्तवला आहे.

Monsoon Update : राज्यात जोरदार पावसाची शक्यता, पुढील मान्सूनची वाटचाल कशी असणार? पंजाबराव डख यांचा मोठा इशारा
Punjabrao Dakhe Weather UpdateImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jun 07, 2026 | 9:33 PM
Share

शेतकऱ्यांचे डोळे मान्सूनकडे लागले होते. अखेर प्रतिक्षा संपली आहे. महाराष्ट्रात मान्सूनचं आगमन झालं आहे. मान्सून तळकोकणात दाखल झाला आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय हवामान विभागाकडून तब्बल 25 जिल्हांना जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. पुढील चार ते पाच दिवस पुणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर हवामान विभागाकडून नागरिकांना सतर्कतेचं अवाहन करण्यात आलं आहे. दरम्यान हवामान विभागाच्या अंदाजानंतर आता हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी देखील राज्यात मान्सूनची पुढील वाटचाल कशी असेल याबाबत आपला अंदाज व्यक्त केला आहे.

काय आहे पंजाबराव डख यांचा अंदाज? 

‘मान्सून तळकोकणातून सक्रिय झाला आहे. तो आता हळहुळ पुढे सरकत आहे. सात तारखेचा पाऊस हा सर्वदूर होणार नाही. 8 जून, 9 जून असा थोडा-थोडा करत मान्सून राज्यात पुढे सरकणार आहे. 14 जूनपर्यंत मान्सून महाराष्ट्राचा बरासचा भाग कव्हर करेल असा अंदाज पंजाबराव डख यांनी वर्तवलेला आहे.  सात जूनच्या रात्रीपर्यंत बऱ्याच भागांमध्ये  सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, अहिल्यानगर, पुणे, बीड जिल्हा, लातूर, जिल्हा धाराशिव जिल्हा मराठवाड्यापर्यंत मान्सून मजल मारेल. उत्तर महाराष्ट्रातही काही जिल्ह्यांपर्यंत मान्सून पोहोचेल अशी माहिती देखील त्यांनी यावेळी दिली आहे. दरम्यान यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना देखील सल्ला दिला आहे. शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, जर शेतात एक इतिपेक्षा जास्त ओल असेल तरच पेरणी करावी, एक किंवा दोन बोट ओल असेल तर पेरणी करू नये, असंही यावेळी डख यांनी म्हटलं आहे.

काय आहे भारतीय हवामान विभागाचा अंदाज 

दरम्यान भारतीय हवामान विभागाकडून देखील मान्सूनचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मान्सून तळकोकणात दाखल झाला आहे, परंतु तो अद्याप महाराष्ट्राच्या अनेक भागांपर्यंत पोहोचायचा आहे. येत्या 15 जून पर्यंत मान्सून राज्यातील बहुतांश भाग व्यापून टाकेल असा अंदाज भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.

Follow Us
डान्समध्ये गौतमीला टक्कर देणाऱ्या ऐश्वर्याला मोठा धक्का, पोलिसांनी थेट
Aishwarya Jadhav Dancer | डान्समध्ये गौतमीला टक्कर देणाऱ्या ऐश्वर्याला मोठा धक्का, पोलिसांनी थेट...
दहीहंडीतील लावणी भोवली! नृत्यांगणा राधा पाटीलसह आयोजकांवर गुन्हा दाखल
Dancer Radha Patil News | पुण्यात दहीहंडीतील लावणी भोवली! नृत्यांगणा राधा पाटीलसह आयोजकांवर गुन्हा दाखल
बारामतीत पवार विरुद्ध पवार! सुनेत्रा पवारांसमोर युगेंद्र पवारांचं...
Baramati | बारामतीत पवार विरुद्ध पवार! सुनेत्रा पवारांसमोर युगेंद्र पवारांचं स्वतंत्र पॅनल; सोमेश्वर कारखान्याची निवडणूक रंगणार
विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
Vishakha Raut | विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला इशारा
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला कडक इशारा
20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर!
Nanded | 20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर! नांदेडमध्ये हजारो एकर पीक धोक्यात
तू तुझं तुझं बघ ना! सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर
Ambadas Danve On Gunaratna Sadavarte | तू तुझं तुझं बघ ना! बाळासाहेब ठाकरेंच्या फोटोवरून सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर, पुढे म्हणाले...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी... त्या बड्या नेत्याने...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी अनेक जण आमच्याशी संपर्कात, त्या बड्या नेत्याने सगळंच सांगितलं
अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल...
Manoj Jarange | अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल, पुढे म्हणाले...
सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! सोयाबीन माना टाकू लागलं
Amravati | सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! अमरावतीत सोयाबीन माना टाकू लागलं; शेतकरी संकटात