पौंष पौर्णिमेनिमित्त खासदार संभाजीराजेंकडून सपत्निक जेजुरीच्या खंडेरायाचा अभिषेक

संभाजीराजे यांनी सपत्निक कुळाचार, जागरण गोंधळाचा विधी पार पाडत खंडेरायाला साकडं घातलं.

पौंष पौर्णिमेनिमित्त खासदार संभाजीराजेंकडून सपत्निक जेजुरीच्या खंडेरायाचा अभिषेक
सागर जोशी

|

Jan 28, 2021 | 3:56 PM

जेजुरी : संपूर्ण महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडोबा मंदिरात पौंष पोर्णिमा मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीनं साजरी झाली. यावेळी खासदार संभाजीराजे छत्रपती आणि त्यांच्या पत्नी संयुक्ताराजे यांच्या हस्ते खंडेरायाला अभिषेक घालण्यात आला. यावेळी संभाजीराजे यांनी सपत्निक कुळाचार, जागरण गोंधळाचा विधी पार पाडत खंडेरायाला साकडं घातलं.(MP SambhajiRaje Chhatrapati visit to Khanderaya of Jejuri with his wife)

लग्नाला 25 वर्षे पूर्ण होत असताना खंडेरायाच्या दर्शनाला सपत्निक येता आलं ही समाधानाची बाबत असल्याचं खासदार संभाजीराजे छत्रपती म्हणाले. सध्याच्या अडचणीच्या काळात भाविकांनी गर्दी न करता अधिकाधिक काळजी घेण्याचं आवाहनही संभाजीराजे यांनी केलंय.

खंडेरायाची देवदिवाळी उत्साहात संपन्न

जेजुरी गडावर चंपाषष्टी उत्सव डिसेंबर महिन्यात पार पडला. एकूण सहा दिवस हा उत्सव चालतो. महाराष्ट्राचं लोकदैवत असलेल्या श्री खंडोबाला सर्वसामान्यांपासून ते उच्चभ्रूंपर्यंत मानलं जातं, त्याला पूजलं जातं. अश्विन महिन्यात जसा देवीचा नवरात्र उत्सव असतो तसा हा खंडेरायाचा सहा रात्रींचा उत्सव असतो. खंडेरायाच्या गडावर घट स्थापन करुन साजरा होणारा ‘चंपाषष्ठी’ महोत्सव अर्थात खंडेरायाची ‘देवदिवाळी’ उत्साहात पार पडली.

उत्सावाच्या त्यानिमित्ताने मंदिरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती. गडावर सहा दिवस-रात्री ‘चंपाषष्ठी’ हा महोत्सव थाटामाटात साजरा केला गेला. गडावर कोव्हिड नियम पाळून शेकडोंच्या संख्येने भाविक दाखल झाले होते.

कोरोना महामारीमुळे सोमवती अमावस्यानिमित्त जेजुरी गडावरती संचारबंदी लागू करण्यात आली होती. मात्र देवदिवाळीदरम्यान संचारबंदी उठवण्यात आलेली आली. त्यानंतर चंपाष्ठमी उत्सवानिमित्त सर्व भाविकांना दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात आलेलं आहे. कोरोनाच्या अनुषंगाने शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन भाविकांनी करावे अशी ही विनंती देवस्थान समितीकडून त्यावेळी करण्यात आली होती.

संबंधित बातम्या :

जेजुरी गडावर चंपाषष्ठी उत्सवास प्रारंभ, खंडेरायाच्या देवदिवाळीला उत्साहात सुरवात

सोमवती यात्रेनिमित्त सोन्याच्या जेजुरीत जमावबंदी; 12 ते 14 डिसेंबरपर्यंत भाविकांसाठी बंद

MP SambhajiRaje Chhatrapati visit to Khanderaya of Jejuri with his wife

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें