AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sanjay Raut : कुठे गेल्या फडफडणाऱ्या भाजपच्या महिला नेत्या? हनी ट्रॅपवरुन राऊतांचे हादरवणारे आरोप

Sanjay Raut : हनीट्रॅप प्रकरणावरुन खासदार संजय राऊत यांनी खळबळजनक आरोप केले आहेत. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली. त्यांनी भाजपच्या महिला नेत्यांवर सुद्धा निशाणा साधला आहे. पुढच्या काही दिवसात महाराष्ट्रातील राजकारण आणखी तापण्याची शक्यता आहे.

Sanjay Raut : कुठे गेल्या फडफडणाऱ्या भाजपच्या महिला नेत्या? हनी ट्रॅपवरुन राऊतांचे हादरवणारे आरोप
Sanjay Raut
| Updated on: Jul 21, 2025 | 10:48 AM
Share

“महाराष्ट्रात फडणवीसांच जे सरकार चालवलं जातय ते सरकार नसून गुंडांची टोळी आहे. राज्यात एकप्रकारच अराजक माजलेलं आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून छातीठोक भाषण करत आहेत, हे करीन, ते करीन. याला सरळ करीन त्याला सरळ करीन. भ्रष्टाचाऱ्यांना तुरुंगात टाकीन. त्यांच्या राज्यात काय चाललय ते स्वत गृहमंत्री, मुख्यमंत्री आहेत. इतका हतबल मुख्यमंत्री महाष्ट्राने पाहिलेला नाही” अशी टीका संजय राऊत यांनी केली. “आधीचं सरकार घटनाबाह्य होतं. आता फडणवीसांच सरकार अनैतिक, व्याभिचारी सरकार आहे. फडणवीस काही करु शकत नाहीत. अशा प्रकारच सरकार हे महाराष्ट्राला कलंकीत करणारं सरकार आहे” असं संजय राऊत म्हणाले.

“आमदार, मंत्री, पक्षाचे पदाधिकारी ज्या प्रकारच वर्तन करतायत, ते याआधी महाराष्ट्रात कधी घडलं नव्हतं. काल खासदार, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासमोर छावा संघटनेच्या राज्यप्रमुखावर हल्ला झाला. मुंबईतल्या गुंड टोळ्या टायकलवाडीमध्ये अशा प्रकारच्या मारामाऱ्या करायच्या. आमदार निवासात मारामाऱ्या होतात. हनी ट्रॅपची प्रकरण सुरु आहेत” अशी टीका संजय राऊत यांनी केली.

या महिला नेत्या आज कुठे आहेत?

“राज्यातच कोणता गुन्हा घडत नाही. मंत्र्याच्या बारमधून बारबाला पकडल्या जातात. कुठे गेल्या भारतीय जनता पार्टीच्या फडफडणाऱ्या महिला नेत्या. विरोधी पक्षांच्या लोकांवर काही गुन्हे, आरोप झाले की, या सगळ्या महिला नेत्या पुढे येत होत्या. आज कुठे आहेत?. मंत्र्याच्या लेडीज बारमध्ये महिला सापडल्या, महिलांलर अत्याचार वाढले आहेत. हनी ट्रॅपची प्रकरण वाढलेली आहेत” असं संजय राऊत म्हणाले.

वेश पालटून जायचे, सीडी दाखवायचे

हनीट्रॅपबद्दल देवेंद्र फडणवीस यांना माहित असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला. ‘देवेंद्र फडणवीस खोटं बोलत आहेत. चार मंत्री हनी ट्रॅपमध्ये अडकले आहेत’ असं राऊत म्हणाले. “विजय वडेट्टीवार यांनी थोडी माहिती दिली आहे. यासंदर्भात पूर्ण माहिती मी देणार आहे. उद्याचा सामनाचा अग्रलेख वाचायला त्यांनी सांगितलं. ही लोक वेश पालटून जात होते. त्यांना सीडी दाखवत होते” असा दावा राऊत यांनी केला.

महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.