AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सुरुवात ठाण्यातून झाली आता इतिहासही…, राऊतांचा शिंदेंच्या बालेकिल्ल्यातून हल्लाबोल

आज ठाण्यामध्ये शिवसैनिकांशी संवाद साधण्यासाठी ठाकरे गटाच्या वतीनं मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे, या मेळाव्यात बोलताना संजय राऊत यांनी पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.

सुरुवात ठाण्यातून झाली आता इतिहासही..., राऊतांचा शिंदेंच्या बालेकिल्ल्यातून हल्लाबोल
Image Credit source: tv9 Marathi
| Updated on: Mar 02, 2025 | 8:14 PM
Share

आज शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं शिवसैनिकांशी संवाद साधण्यासाठी ठाण्यात मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. या मेळाव्यात बोलताना शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. या मोहिमेची पहिली स्वारी ठाण्यातून आहे, टेंभी नाक्यावर आलो आहे, धर्मवीर आनंद दिघेंना अभिवादन करण्यासाठी, पण गद्दारांना महिलांना पुढे करण्याची सवयच आहे. हे दिवस ही जातील, सुरुवात ठाण्यातून झाली होती, नवा इतिहासही ठाण्यातच होईल असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

नेमकं काय म्हणाले संजय राऊत 

प्रत्येकजण सांगतोय मला राऊत सांहेबांचं भाषण ऐकायचं आहे, पण मी म्हणतोय मला आज बोलायचं नाहीये, कोणी बोलूच नका. आज शिवसैनिकांना बोलू द्या, पण आज आम्ही जी मोहीम सुरू केली आहे. त्या मोहिमेचा पहिला दिवस किंवा पहिली स्वारी ही ठाण्यावर आहे. मी ठाण्यामध्ये प्रवेश केला नेहमीप्रमाणे आमच्या राजन विचारे साहेबांनी आनंद नगर नाक्यावर स्वागत केलं. तेव्हा मी म्हणालो परत एकदा आपले जुने वैभवाचे दिवस सुरू झाले आहेत.

टेंभी नाक्यावर आलो, धर्मवीर आनंद दिघे यांना अभिवाद करण्यासाठी पोहोचलो, तेव्हा पाच पंचवीस महिला समोर आल्या, गद्दारांना महिलांना पुढे करायची सवयच आहे. आम्ही बाळासाहेबांच्या विचारांचे खरे वाहक आणि वारसदार आहोत. हे फक्त होर्डिंग लावतात, यांचा वारसदार म्हणून जन्म गुजरातला झाला आहे. जेव्हा शंभर रेडे कापले तेव्हा एक जन्माला आला. त्यामुळे ठाणेकरांना निष्ठा सांगण्याची गरज नाही, ठाणेकरांनी निष्ठा काय असते हे वारंवार महाराष्ट्राला दाखवून दिलं आहे, असा हल्लाबोल यावेळी संजय राऊत यांनी केला आहे.

दरम्यान संजय राऊत आणि शिवसेना ठाकरे गटाचे नेते जेव्हा टेंभी नाक्यावर पोहोचले, तेव्हा शिवसेना ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गट आमने-सामने आल्याचं पाहायला मिळालं. जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली, यावरून देखील राऊत यांनी शिंदेंना टोला लगावला आहे.  आनंद आश्रमात जाण्यापासून आम्हाला कोणीही रोखू शकत नाही, पण आनंद आश्रम कोणत्या तरी खासगी व्यक्तीनं आपल्या नावावर करून घेतला आहे. तो आता दिघे साहेबांचा आश्रम राहिला नाही, असं राऊत यांनी म्हटलं आहे.

Follow Us
ज्ञानेश कुमार यांच्यामागचा बॉस कोण? संजय राऊतांनी सरळ नावचं सांगून...
ज्ञानेश कुमार यांच्यामागचा बॉस कोण? संजय राऊतांनी सरळ नावचं सांगून टाकलं
अशोक उईकेंचं अभिजीत दीपकेंना थेट आव्हान; आश्रमशाळ मुद्द्यावरून...
अशोक उईकेंचं अभिजीत दीपकेंना थेट आव्हान; आश्रमशाळांच्या मुद्द्यावरून मोठा वाद
लालबागच्या राजाच्या चरणस्पर्श दर्शनाची रांग बंद, मुखदर्शनासाठी गर्दी..
Lalbaugcha Raja 2026 : लालबागच्या राजाच्या चरणस्पर्श दर्शनाची रांग बंद, मुखदर्शनासाठी गर्दी कायम
अभिनेता अजय देवगणला महापालिकेचा मोठा धक्का, थेट जुहूमधील बंगल्याला...
अभिनेता अजय देवगणला महापालिकेचा मोठा धक्का, थेट जुहूमधील बंगल्याला नोटीस
साहेब पाण्याचा थेंब नाही, बाजारात गेलो होतो पण...मुख्यमंत्र्यांपुढे...
Devendra Fadnavis : साहेब पाण्याचा थेंब नाही, बाजारात गेलो होतो पण...मुख्यमंत्र्यांपुढे हात जोडत शेतकरी ढसा ढसा रडला
निवडणूक आयोगावर बोलताना राऊतांची जीभ घसरली; त्या वक्तव्यावरून...
Ram Kadam : निवडणूक आयोगावर बोलताना राऊतांची जीभ घसरली; त्या वक्तव्यावरून राम कदमांचा पलटवार
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला! आजची सुनावणी...
Shiv Sena Symbol : शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला! आजची सुनावणी झालीच नाही; आता पुढे...
IIT पवई प्रकरणात मोठा ट्विस्ट! साहिल वाकोडेचा iPhone पोलिसांच्या हाती
IIT पवई प्रकरणात मोठा ट्विस्ट! साहिल वाकोडेचा iPhone पोलिसांच्या हाती, ChatGPT संदर्भांतील आरोपाचं काय होणार?
देश असाच चालणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय?; कपिल सिब्बलांचा सवाल
Kapil Sibal : देश असाच चालणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय?; कपिल सिब्बलांचा सवाल, नेमकी काय केली मागणी?
निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर..
Satej Patil : निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर थेट आरोप