MPSC आयोगाची महत्वपूर्ण घोषणा, अनाथ प्रवर्गातून अर्ज केलेल्या उमेदवारांना प्रमाणपत्र सादर करावं लागणार

अनाथ प्रवर्गातून ज्यांनी खोटे अर्ज केले होते त्यांना हा मोठा झटका असणार आहे. राज्य सेवा पूर्व परीक्षा 2020 मध्ये मुलांनी, तर एमपीएससी गट ब - 2020 ज्या जाहिरातीमध्ये 5 विद्यार्थ्यांनी अर्ज केला होता. त्या मुलांना आता 27 तारखेच्या आज अनाथ असलेले प्रमाणपत्र जमा करावे लागणार आहे.

MPSC आयोगाची महत्वपूर्ण घोषणा, अनाथ प्रवर्गातून अर्ज केलेल्या उमेदवारांना प्रमाणपत्र सादर करावं लागणार
महाराष्ट्र लोकसेवा आयोग

मुंबई : एमपीएससी आयोगानं अजून एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. आई-वडिल नसलेल्या ज्या मुलांनी अनाथ प्रवर्गातून अर्ज केला होता त्यांना प्रमाणपत्र सादर करावं लागणार आहे. अनाथ प्रवर्गातून ज्यांनी खोटे अर्ज केले होते त्यांना हा मोठा झटका असणार आहे. राज्य सेवा पूर्व परीक्षा 2020 मध्ये मुलांनी, तर एमपीएससी गट ब – 2020 ज्या जाहिरातीमध्ये 5 विद्यार्थ्यांनी अर्ज केला होता. त्या मुलांना आता 27 तारखेच्या आज अनाथ असलेले प्रमाणपत्र जमा करावे लागणार आहे. अन्यथा अनाथ आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थी अपात्र होणार आहेत. (Candidates who have applied from orphan category will have to submit certificate)

MPSC बाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय

स्वप्नीलच्या आत्महत्येनंतर अखेर महाविकास आघाडी सरकारला जाग आली आहे. कारण, याबाबत आज पार पडलेल्या बैठकीत MPSCने 817 जागांची शिफारस केली होती त्याबाबत चर्चा झाली. या बैठकीत SEBC प्रवर्गातील 48 विद्यार्थ्यांसह 413 विद्यार्थ्यांना लवकरात लवकर नियुक्ती देण्याचं आश्वासन देण्यात आलं आहे. सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी ही माहिती दिलीय.

MPSCच्या 817 पदांची भरती लवकरच

या बैठकीत 48 SEBC सह 413 विद्यार्थ्यांना लवकरात लवकर नियुक्ती देण्याचं आश्वासन देण्यात आल्याची माहिती विद्यार्थी प्रतिनिधींनी दिली आहे. MPSCच्या 817 पदांची भरती लवकरच केली जाणार आहे. SEBC च्या कोणत्याही विद्यार्थ्यावर अन्याय होणार नाही, असा दावा यावेळी भरणे यांनी केलाय. तसंच 31 जुलैपर्यंत MPSC आयोगावर 4 सदस्यांची नियुक्ती केली जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

MPSC च्या परीक्षांचं वेळापत्रक एक वर्ष आधी जाहीर करण्याची सूचना

त्याचबरोबर UPSC च्या धर्तीवर राज्यात MPSC च्या परीक्षांचं वेळापत्रक एक वर्ष आधी जाहीर करण्याची सूचनाही आजच्या बैठकीत अजित पवार यांनी MPSCला दिल्याचं भरणे म्हणाले. 15 हजार 717 पदांच्या भरतीची प्रक्रियाही लवकर सुरू करण्याच्या सूचना केल्या आहेत. कोरोना काळात वित्त विभागाने शासकीय भारतीवर बंदी आणली होती. ही पदे भरण्यासाठी ती बंदी काहीशी शिथिल करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचंही भरणे यांनी सांगितलं.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आज महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत MPSC ने 817 जागांसाठी केलेल्या शिफारशीबाबतही चर्चा झाल्याची माहिती भरणे यांनी दिलीय. SEBCच्या जागांबाबत आम्ही विधी व न्याय विभागाचा अभिप्राय मागितला आहे. आज संध्याकाळपर्यंतच तो अभिप्राय येईल, असं सांगतानाच आयोगावर 31 जुलैपर्यंत सदस्यांची रिक्त पदे भरली जातील असंही भरणे यांनी सांगितलं.

संबंधित बातम्या :

PSI भरतीबाबत MPSC चा मोठा निर्णय, मुलाखतीसाठी आता शारीरिक चाचणीत 60 गुण आवश्यक

MPSC Exam 2021 New Date: एमपीएससी परीक्षा 21 मार्चला होणार; विद्यार्थी निर्णय मान्य करणार?

Candidates who have applied from orphan category will have to submit certificate