AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

MPSC PSI results : MPSC च्या PSI पदांचा निकाल जाहीर, कुठे आणि कसा बघाल निकाल?

एमपीएससी विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी आणि गोड बातमी आहे. कारण पी. एस. आय. 2019 च्या 650 पदांचा निकाल जाहीर झाला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे.

MPSC PSI results : MPSC च्या PSI पदांचा निकाल जाहीर, कुठे आणि कसा बघाल निकाल?
पीएसआय पदांचा निकाल जाहीरImage Credit source: twitter
| Updated on: Mar 08, 2022 | 6:02 PM
Share

मुंबई : एमपीएससी (Mpsc Exam) विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी आणि गोड बातमी आहे. कारण पी. एस. आय. (PSI result) 2019 च्या 650 पदांचा निकाल जाहीर झाला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांची यादी (PSI list) संकेतस्थळावर प्रसिद्ध केली गेली आहे. विद्यार्थ्यांची प्रतिक्षा अखेर संपली आणि 2 वर्षानंतर पी.एस.आय पदाचा निकाल जाहीर झालाय. हा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी गुलाल उधळत जल्लोष केला आहे तर पात्र विद्यार्थ्यांचा सत्कारही काही ठिकाणी केला गेला आहे. जा. क्र. 08/2019 पोलिस उपनिरीक्षक मुख्य परीक्षा 2019 ची सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. तसेच भरतीप्रक्रियेतून बाहेर पडण्यासाठी वेबलींक सुरू करण्यात येत आहे.  अशी माहिती ट्विटरवरून आयोगाने दिली आहे.

लोकसेवा आयोगाचे ट्विट

कुठे बघाल निकाल?

https://mpsc.gov.in/ /या एमपीएससीच्या अधिकृत संकेतस्थलावर जाऊन तुम्ही निकाल पाहू शकता. तसेच वरती एसपीएससी आयोगाच्या अधिकृत ट्विटर हॅन्डलवर जे लिंक दिली आहे. त्यावरही तुम्ही क्लिक करून अधिकृत पात्र विद्यार्थ्यांची यादी पाहू शकता, असे आयोगाकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे पात्र उमेदवारांसाठी निकाल पाहणं सोपे झाले आहे. आतापर्यंत बऱ्याच जणांनी या संकेतस्थळांना भेट देऊन निकाल पाहिला आहे. ऑनलाईन निकालामुळे विद्यार्थ्यासाठी ही प्रक्रिया आणखी सोपी झाली आहे.

कोरोनामुळे विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान

गेल्या दोन वर्षात अनेकदा परीक्षा आणि निकाल लांबणीवर गेल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. आता कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यानंतर उर्वरीत प्रक्रिया वेगाने पार पाडण्याचा प्रयत्न एमपीएसी आयोगाकडून करण्यात येत आहे. अनेकदा परीक्षा लांबणीवर गेल्यामुळे एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचे उद्रेकही आयोगाला सहन करावा लागला आहे. वेळोवेळी विद्यार्थी आंदोलने करताना दिसून आले आहेत. मात्र आता निकाल जाहीर झाल्याने विद्यारर्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

RTE अंतर्गत निवड झालेल्या बालकांच्या प्रवेशास मुदतवाढ, प्लेग्रुप ते पहिलीसाठी वयोमर्यादा निश्चित

HSC Exam 2022 : ऑनलाईन धडे घेतलेल्या 12 वीच्या विद्यार्थ्यांची आज पासून ऑफलाईन परीक्षा, 14 लाख 85 हजार 826 विद्यार्थी देणार परीक्षा

JEE Mains 2022 : जेईई मेन्स परीक्षेसंदर्भात महत्त्वाची अपडेट, NTA कडून विद्यार्थ्यांना अलर्ट

नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला
नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा.
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स.
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका.
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका.
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी.
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक.
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित.
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?.
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया.