JEE Mains 2022 : जेईई मेन्स परीक्षेसंदर्भात महत्त्वाची अपडेट, NTA कडून विद्यार्थ्यांना अलर्ट
जेईई मेन्स 2022 साठी 1 मार्चपासून नोंदणी सुरु झालेली आहे. गेल्या वर्षी कोरोना (Corona) विषाणू संसर्गाच्या सावटाखाली निवडणुका घेण्यात आल्या होत्या.

JEE Mains 2022 नवी दिल्ली : जेईई मेन्स 2022 साठी 1 मार्चपासून नोंदणी सुरु झालेली आहे. गेल्या वर्षी कोरोना (Corona) विषाणू संसर्गाच्या सावटाखाली निवडणुका घेण्यात आल्या होत्या. मात्र, यावेळी परीक्षा वेगळ्या पद्धतीनं घेण्यात येणार आहेत. यावर्षी परीक्षांसदर्भात बदल करण्यात आले आहेत. नॅशनल टेस्टिंग एजन्सीनं (NTA) जेईई मेन 2022 संदर्भात विद्यार्थ्यांना सूचना दिल्या आहेत. यावर्षी जेईई मेन्स परीक्षेचा अर्ज दाखल करताना काळजीपूर्वक माहिती भरण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. एनटीएनं विद्यार्थ्यांना यावर्षी कोणत्याही प्रकारे अर्जात दुरुस्ती करण्याची संधी देण्यात येणार नसल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. एनटीएकडून यासंदर्भात वेबसाईटवर देखील माहिती देण्यात आली आहे. त्यामुळं विद्यार्थ्यांनी सर्व सूचना काळजीपूर्वक वाचून अर्ज दाखल करणं आवश्यक आहे.
जेईई मेन परीक्षा दोन सत्रात
जेईई मेन 2022 परीक्षा अर्ज भरण्याची सुरुवात 1 मार्चपासून झाली आहे. jeemain.nta.nic.in यावेबसाईटवर विद्यार्थ्यांना अर्ज सादर करता येतील. ज्या विद्यार्थ्यांना जेईई मेन परीक्षा 2022 चे अर्ज दाखल करायचे आहेत त्यांनी 31 मार्चपूर्वी ऑनलाईन पद्धतीनं भरणं आवश्यक आहे. जेईई मेन 2022 परीक्षा दोन सत्रात एप्रिल आणि मे महिन्यात आयोजित केली जाईल. पहिल्या सत्रातील परीक्षा 16 ते 21 एप्रिल दरम्यान आयोजित केली जाईल. तर, दुसऱ्या सत्रातील परीक्षा 24 ते 29 जुलैमध्ये आयोजित करण्यात येणार आहे.
जेईई परीक्षेसाठी नोंदणी कशी करणार?
स्टेप 1 : एनटीए जेईई मेन परीक्षेच्या अधिकृत वेबसाईट jeemain.nta.nic.in या वेबसाईटला भेट द्या
स्टेप 2 : जेईई मेन्स नोंदणी लिंकवर क्लिक करा
स्टेप 3 : वैयक्तिक माहिती नोंदवा
स्टेप 4 : अर्ज भरण्यासाठी लॉगीन करा
स्टेप 5 : जेईई मेन फॉर्म 2022 मधील माहिती नोंदवा
स्टेप 6 : आवश्यक कागदपत्रं स्कॅन करुन अपलोड करा
स्टेप 7 : अर्जाचं शुल्क ऑनलाईन पद्धतीनं सादर करा
स्टेप 8 : अर्जात नोंदवलेली माहिती तपासून घ्या अर्ज सादर करा
अर्जातील माहिती भरल्यानंतर अंतिम सबमिट करण्यापूर्वी माहिती काळजीपूर्वक वाचून घ्या. एनटीएकडून अर्ज दाखल केल्यानंतर कोणत्याही प्रकारे अर्जात सुधारणा करण्याची संधी दिली जाणार नाही. विद्यार्थी त्यांच्या शहराजवळील परीक्षा केंद्राची निवड करु शकतात. भारतात आणि परदेशातील विद्यार्थ्यांची सोय लक्षात घेता परीक्षा केंद्राची संख्या वाढवली जाणार आहे.
इतर बातम्या:
‘गंगुबाई’ची कमाल, सहा दिवसात सहा दशकांपार कमाई, आकडा वाचून तुम्ही थक्क व्हाल!
औरंगाबाद जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीराम महाजन शिवसेनेत, मुंबईत समर्थकांसह प्रवेश सोहळा
