MukhyaMantri Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींनो आता काय? त्या हप्त्याबाबत मोठी अपडेट समोर, थेट…
महायुती सरकारच्या ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने’चा नोव्हेंबरचा हप्ता अजून जमा न झाल्याने लाभार्थी चिंतेत आहेत. हे पैसे कधी मिळणार असा सवाल सर्व लाडक्या बहिणींच्या मनात आहे. त्याबद्दल...

महायुती सरकारच्या ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा’ (MukhyaMantri Ladki Bahin Yojana) सुरूवातीपासूनच खूप बोलबाला आहे. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असलेल्या राज्यातील महिलांना महायुती सरकारतर्फे दर महिन्याता 1500 रुपये देण्यात येतात. गेल्या वर्षी म्हणजे जुलै 204 मध्ये सुरू झालेल्या योजनेचा आत्तापर्यंत 2 कोटींपेक्षा अधिक महिन्यांना लाभ घेतला असून दर महिन्याला त्यांच्या खात्यात हे पैसे जमा होतात. या योजनेत काही गैरप्रकार झाल्याचे समोर आल्यानंतर सरकारकडून पडताळणी सुरू करण्यात आली. त्याचअंतर्गत पात्र लाडक्या बहिणींना ई-केवायसी करण्यास सांगण्यात आले. त्याची मुदतही आता वाढवून 31 डिसेंबर 2025 पर्यंत करण्यात आली आहे.
मात्र दर महिन्याला लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या पैशांबद्दल आता नवी अपडेट समोर आली आहे. नोव्हेंबर महीना सुरू होऊन संपायला आला, आज 20 तारीख उजाडली तरी राज्यातील लाडक्या बहिणींना अद्याप या महिन्यात हप्ता मिळालेला नाही. या महिन्याचे 1500 रुपये काही लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झालेले नाही. त्याचबद्दल आता मोठी अपडेट समोर आली आहे.
नोव्हेंबरचे पैसे कधी मिळणार ?
लाडक्या बहिणींना दर महिन्यात 1500 रुपये देण्यात येतात, मात्र नोव्हेंबर महीना सूरु होऊन 20 दिवस झाले, आता महिन्याचा शेवट जवळ यायला लागला तरी खात्यात पैसे जमा न झाल्याने लाडक्या बहिणी अस्वस्थ झाल्या आहेत. त्यांच्या याच हप्त्याबबात अपडेट मोर आली आहे. लाडक्या बहिणींना नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात या योजनेचे, या महिन्याचे पैसे मिळणार आहे अशी माहिती सूत्रांनी दिली.
नोव्हेंबर महिना सुरु होऊन 19 दिवस उलटून गेले, आजची 20 तारीख आली तरी नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नव्हती. सध्या राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे पडघम वाजत असून आचारसंहितेच्या काळात महिलांच्या खात्यात पैसे येणार की नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात होता. मात्र आता लाडक्या बहिणींच्या खात्यात लवकरच हे पैसे जमा केले जातील अशी चर्चा सुरू आहे. त्यानुसार निवडणुकीच्या आधीच लाडक्या बहिणींना पैसे मिळण्याची चिन्हं आहेत. नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात महिलांना पैसे देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र त्याची अधिकृत तारीख काही अद्याप जाहीर झालेली नाही, त्यामुळे हे पैसे कधी मिळतात याकडे पात्र लाडक्या बहिणींचे लक्ष लागले आहे.
ईकेवायसीची मुदत वाढवली
दरम्यान, लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळवण्यासाठी ईकेवायसी करणे अनिवार्य आहे. ही प्रक्रिया पूर्ण केली नाही, तर यापुढे संबंधित महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येणार नाही. यासाठी आधी 18 नोव्हेंबरपर्यंत मुदत होती, मात्र लाखो महिलाचे ई-केवायसी न झाल्याने ही मुदत वाढवण्यात आली असून आता 31 डिसेंबर 2025 पर्यंत ही मुदतवाढ देण्यात आली आहे.
