AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लाडकी बहीण योजनेच्या अर्जाची A टू Z माहिती; नाव, पत्ता, वैवाहिक स्थिती… ‘ही’ माहिती भरावी लागणार

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अर्जात महिलेला तिचं नाव, पत्ता, वैवाहिक माहिती, बँक अकाउंटसह अनेक गोष्टींची माहिती द्यावी लागणार आहे. संबंधित माहिती भरल्यानंतर तो फॉर्म महिलांना आपल्या जवळील अंगणवाडी केंद्रांमध्ये जमा करायचा आहे.

लाडकी बहीण योजनेच्या अर्जाची A टू Z माहिती; नाव, पत्ता, वैवाहिक स्थिती... 'ही' माहिती भरावी लागणार
लाडकी बहीण योजनेच्या अर्जाची A टू Z माहिती
| Updated on: Jul 03, 2024 | 4:25 PM
Share

महाराष्ट्र सरकारकडून राज्यभरातील 21 ते 65 वयोगटातील महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील गरीब कुटुंबातील महिलांना दर महिन्याला 1500 रुपयांची आर्थिक मदत सरकारकडून केली जाणार आहे. ज्या कुटुंबांचं वार्षिक आर्थिक उत्पन्न हे अडीच लाखांच्या आत आहे, अशाच कुटुंबातील महिलांना यो योजनेचा लाभ मिळणार आहे. विशेष म्हणजे राज्य सरकारने पाच एकर पेक्षा जास्त जमीन असणाऱ्यांना कुटुंबातील महिलांनादेखील या योजनेचा लाभ देण्यास मान्यता दिली आहे. त्यामुळे राज्यातील कोट्यवधी महिलांना आता या योजनेचा लाभ मिळणार आहे. फक्त शासकीय सेवेत कर्मचारी असलेल्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. राज्य सरकारकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, ही योजना 1 जुलै 2024 पासून सुरु झाली आहे. या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी आता महिलांची राज्यभरातील सेतू कार्यालये, तहसील कार्यालये इथे गर्दी होताना दिसत आहे. ही गर्दी पाहता राज्य सरकारने अर्ज दाखल करण्याची तारीख वाढवली आहे. महिला 31 ऑगस्टपर्यंत या योजनेचा लाभ मिळावा यासाठी अर्ज दाखल करु शकणार आहेत. या योजनेचा अर्ज नेमका कसा आहे? याची देखील माहिती आता समोर आली आहे. या अर्जात नेमक्या कोणकोणत्या गोष्टी भरायच्या आहेत, याची माहिती समोर आली आहे.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अर्जात महिलेला तिचं नाव, पत्ता, वैवाहिक माहिती, बँक अकाउंटसह अनेक गोष्टींची माहिती द्यावी लागणार आहे. संबंधित माहिती भरल्यानंतर तो फॉर्म महिलांना आपल्या जवळील अंगणवाडी केंद्रांमध्ये जमा करायचा आहे. याशिवाय ऑनलाईनदेखील हा फॉर्म भरता येणार आहे. या अर्जाचा फोटो आता आमच्या हाती आला आहे. संबंधित अर्जाचा फोटो हा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

अर्जामध्ये काय-काय विचारण्यात येतं?

  • महिलेचे संपूर्ण नाव-
  • महिलेचे लग्नापूर्वीचे नाव
  • महिलेचे लग्नानंतरचे नाव
  • जन्म दिनांक: दिनांक/ महिना/वर्ष-
  • अर्जदाराचा संपूर्ण पत्ता-
  • जन्माचे ठिकाण –
  • जिल्हा-
  • गाव/वाहर
  • ग्रामपंचायत/ नगरपंचायत/ नगरपालिका-
  • पिनकोड
  • मोबाईल क्रमांक-
  • आधार क्रमांक-
  • शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात देणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ घेत आहात का? होय/नाही. असल्यास, दरमहा रु.
  • वैवाहिक स्थिती
  • विवाहित/ घटस्फोटीत/ विधवा/ परितत्क्या/ निराधार
  • अर्जदाराचे बैंक खाते असलेल्या बैंकेया तपशील-
  • बँकेचे पूर्ण नाव –
  • बँक खाते धारकाये नाग
  • बँक खाते क्रमाक
  • IFSC कोड
  • आपला आधार क्रमांक बैंक खात्याला जोडले आहे काय? होय किंवा नाही

Narishakti Prakar/नारीशक्ती प्रकार :

  • १) अंगणवाडी सेविका
  • २) अंगणवाडी मदतनीस
  • ३) पर्यवेधिका
  • ४) ग्रामसेवक
  • ५) वार्ड अधिकारी
  • ६) सेतू सुविधा केंद्र
  • ६) सामान्य महिला

सर्व कागदपत्रांच्या प्रती सादर/Upload करण्यात यावी,

  • १) आधार कार्ड
  • २) अधिवात/जन्म प्रमाणपत्र
  • ३) उत्पन्न प्रमाणपत्र
  • ४) अर्जदाराने हमीपत्र
  • ५) बँक पासबुक
  • ६) अर्जदाराणा फोटो

अर्जाचा फोटो पाहा

Mukhyamantri Majhi Ladki Bahini Yojana how to fill form read in marathi

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा अर्ज असा आहे (फोटो सौजन्य – सोशल मीडिया)

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.