
महाराष्ट्र सरकारकडून राज्यभरातील 21 ते 65 वयोगटातील महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील गरीब कुटुंबातील महिलांना दर महिन्याला 1500 रुपयांची आर्थिक मदत सरकारकडून केली जाणार आहे. ज्या कुटुंबांचं वार्षिक आर्थिक उत्पन्न हे अडीच लाखांच्या आत आहे, अशाच कुटुंबातील महिलांना यो योजनेचा लाभ मिळणार आहे. विशेष म्हणजे राज्य सरकारने पाच एकर पेक्षा जास्त जमीन असणाऱ्यांना कुटुंबातील महिलांनादेखील या योजनेचा लाभ देण्यास मान्यता दिली आहे. त्यामुळे राज्यातील कोट्यवधी महिलांना आता या योजनेचा लाभ मिळणार आहे. फक्त शासकीय सेवेत कर्मचारी असलेल्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. राज्य सरकारकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, ही योजना 1 जुलै 2024 पासून सुरु झाली आहे. या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी आता महिलांची राज्यभरातील सेतू कार्यालये, तहसील कार्यालये इथे गर्दी होताना दिसत आहे. ही गर्दी पाहता राज्य सरकारने अर्ज दाखल करण्याची तारीख वाढवली आहे. महिला 31 ऑगस्टपर्यंत या योजनेचा लाभ मिळावा यासाठी अर्ज दाखल करु शकणार आहेत. या योजनेचा अर्ज नेमका कसा आहे? याची देखील माहिती आता समोर आली आहे. या अर्जात नेमक्या कोणकोणत्या गोष्टी भरायच्या आहेत, याची माहिती समोर आली आहे.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अर्जात महिलेला तिचं नाव, पत्ता, वैवाहिक माहिती, बँक अकाउंटसह अनेक गोष्टींची माहिती द्यावी लागणार आहे. संबंधित माहिती भरल्यानंतर तो फॉर्म महिलांना आपल्या जवळील अंगणवाडी केंद्रांमध्ये जमा करायचा आहे. याशिवाय ऑनलाईनदेखील हा फॉर्म भरता येणार आहे. या अर्जाचा फोटो आता आमच्या हाती आला आहे. संबंधित अर्जाचा फोटो हा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
अर्जाचा फोटो पाहा
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा अर्ज असा आहे (फोटो सौजन्य – सोशल मीडिया)