ट्रकची कारला भीषण धडक, मुक्ताईनगरातील काँग्रेसचे जिल्हा सचिवांचा जागीच मृत्यू

बुलडाणा शिंदखेडाजवळ कारची ट्रकला समोरासमोर धडक होऊन आसिफ खान इस्माइल खान यांचा जागीच मृत्यू झाला. (Muktainagar Congress Secretary Dies Accident)

ट्रकची कारला भीषण धडक, मुक्ताईनगरातील काँग्रेसचे जिल्हा सचिवांचा जागीच मृत्यू
काँग्रेस जिल्हा सचिव आसिफ खान इस्माइल खान

जळगाव : बुलडाण्यात झालेल्या अपघातात मुक्ताईनगरमधील काँग्रेस जिल्हा सचिवांना प्राण गमवावे लागले. ट्रकची कारला धडक बसून झालेल्या भीषण अपघातात आसिफ खान इस्माइल खान यांचा जागीच मृत्यू झाला. (Muktainagar Congress Secretary Asif Khan Dies in Buldana Accident)

काँग्रेसचे जिल्हा सचिव आसिफ खान इस्माइल खान औरंगाबादहून घरी परत येत होते. त्यावेळी रात्रीच्या सुमारास बुलडाणा शिंदखेडाजवळ त्यांच्या कारची ट्रकला समोरासमोर धडक झाली. यामध्ये आसिफ यांचा जागीच मृत्यू झाला.

खान यांच्यासोबत गाडीत असलेले दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. यामध्ये मुक्ताईनगरचे काँग्रेस तालुकाध्यक्ष आत्माराम जाधव यांचा समावेश आहे. यामुळे मुक्ताईनगर शहरात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

नागपूरहून भंडाऱ्याला जाताना दुचाकीस्वारांचा मृत्यू

नागपूरहून जाणाऱ्या बाईकस्वारांचे नियंत्रण सुटून भंडाऱ्यात अपघात झाला. दुचाकी पुलाखाली कोसळून दोघांचा जागीच मृत्यू झाला. भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातून जाणाऱ्या बपेरा मार्गावरील खैरलांजी गावाच्या नाल्यावर काल रात्री हा अपघात घडला. 22 वार्षीय समीर राऊत आणि 20 वर्षीय संगीत चौधरी यांना प्राण गमवावे लागले.

दोन्ही तरुण काल संध्याकाळी नागपूरवरुन गावी जाण्यासाठी निघाले, मात्र सकाळ होऊनही घरी न पोहोचल्याने दोघांच्या कुटुंबीयांनी फोनवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र दोघांचे मोबाईल बंद असल्याने त्यांचा शोध लागत नव्हता.

मोबाईल लोकेशनवरुन दोन्ही तरुणांचा शोध घेतला असता खैरलांजी गावाच्या नाल्याजवळ दोघांचे लोकेशन मिळाले. नाल्याखाली दोघांचे मृतदेह आणि दुचाकी मिळाल्याने हा प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी मृतदेह शवविछेदनासाठी पाठवले आहेत. (Muktainagar Congress Secretary Dies in Accident)

MIM च्या धुळे जिल्हाध्यक्षांचा अपघातात मृत्यू

मालेगावहून चाळीसगावच्या दिशेने जाताना जानेवारी महिन्यात झालेल्या बाईक अपघातात एमआयएमच्या धुळे जिल्हाध्यक्षांना प्राण गमवावे लागले होते. अपघातात गंभीर जखमी झालेल्या 58 वर्षीय समसुल हुद्दा मोहम्मद शहा यांनी रुग्णालयात जाताना अखेरचा श्वास घेतला होता. तर त्यांच्यासोबत असलेल्या दुचाकीस्वार तरुणाचा जागीच मृत्यू झाला होता.

एमआयएमचे धुळे जिल्हाध्यक्ष समसुल हुद्दा मोहम्मद शहा चाळीसगावला जाताना अपघात झाला होता. मालेगाव शहराजवळ चाळीसगाव फाट्यावर त्यांच्या बाईकला ट्रकने धडक दिली होती.

संबंधित बातम्या :

ट्रकची बाईकला धडक, MIM च्या धुळे जिल्हाध्यक्षांचा मृत्यू

(Muktainagar Congress Secretary Asif Khan Dies in Buldana Accident)

Published On - 11:49 am, Wed, 10 February 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI