VIDEO | मुंबई-गुजरात हायवेवर चालत्या कारमध्ये अचानक स्पार्क, काही सेकंदात जळून खाक

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर काल एका कारला भीषण आग लागल्याची घटना घडली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. (Mumbai-Ahmedabad highway car caught fire Video Viral)

VIDEO | मुंबई-गुजरात हायवेवर चालत्या कारमध्ये अचानक स्पार्क, काही सेकंदात जळून खाक
Mumbai-Ahmedabad highway car fire


वसई : गेल्या काही दिवसांपासून मुंबई जवळील अनेक हायवेवर बर्निंग कारचा थरार पाहायला मिळत आहे. मुंबई-अहमदाबाद महामार्गावर काल एका कारला भीषण आग लागल्याची घटना घडली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. पण ही कार मात्र पूर्ण जळून खाक झाली. (Mumbai-Ahmedabad highway car caught fire Video Viral)

नेमकं काय घडलं? 

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर एका कारला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. मुंबई जवळील वसई भागातून मुंबईवरुन गुजरातच्या दिशेने जाणाऱ्या एका रस्त्यावर रात्री 11 सुमारास ही घटना घडली. मुंबई अहमदाबाद महामार्गावर एका धावत्या कारमध्ये अचानक स्पार्क झाला. यानंतर त्या गाडीत अचानक आगीचा भडका उडाला. यावेळी आगीची तीव्रता इतकी भीषण होती की, पेट घेतलेल्या कारमध्ये अक्षरश: स्फोट होत होते.

सुदैवाने जीवितहानी नाही

दरम्यान या दुर्घटनेनंतर  वसई-विरार महापालिकेच्या अग्निशमन दलातील जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर तात्काळ अग्निरोधक यंत्रांचा वापर करत ही आग विझवण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र ही कार पूर्णत: जळून खाक झाली. या दुर्घटनेमुळे महामार्गावर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती.  (Mumbai-Ahmedabad highway car caught fire Video Viral)

पाहा व्हिडीओ :

संबंधित बातम्या : 

VIDEO | देवेंद्र फडणवीसांच्या भरधाव वेगात असलेल्या ताफ्यातील गाडीला आग, सुदैवाने इजा नाही 

VIDEO | मुंबई-नाशिक महामार्गावर ‘द बर्निंग कार’चा थरार, भर रस्त्यात चालती गाडी पेटली

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI