Mumbai Air Quality : मुंबईकरांनो जरा जपून, दिवाळी येताच हवा खराब; AQI थेट 200 पार
Mumbai Weather : मुंबईत दिवाळीदरम्यान फटाक्यांसाठी कडक नियम लागू करण्याक आले आहे. प्रशासनाने व्यापारी तसेच सर्वसामान्य नागरिकांनाही सराकरी नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहेत. मुंबईतील वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर हे निर्देश लागू करण्यात आले आहेत.

दिवाळीचा सण सर्वांसाठीच आनंद, उत्साह घेऊन येतो. फराळ, कपडे, रांगोळ्या यांसह फटाक्यांची आतीषबाजी हे तर दिवाळीचे अविभाज्य घटक. मात्र यामुळेचअनेक महानगरांमध्ये हवेची गुणवत्ताही बिघडू लागते. मुंबईतही असंच काहीसं चित्र दिसत आहे. दिवाळी येताच मुंबईतील हवेवरही परिणाम झाल्याच दिसून येत असून रविवारी, वांद्रे आणि कुलाबा येथील हवेची गुणवत्ता थेट 200 एक्यूआयच्या पुढे गेली, त्यामुळे हवा किती खराब झालीये ते स्पष्ट दिसून आलं. एवढंच नव्हे तर मुंबईच्या इतर भागातही हवेची गुणवत्ता अतिशय असमाधनकार होती. वाढच्या वायू प्रदूषणामुळे, श्वसनाचे आजार असलेल्या लोकांनी पुढील आठवड्यात सतर्क राहण्याचा आणि प्रदूषणाविरुद्ध योग्य ती खबरदारी घ्या असा सल्ला तज्ञांनी दिला आहे.
खरंतर 10 ऑक्टोबरपासूनच मुंबईतील हवेची गुणवत्ता खालावण्यास सुरुवात झाली. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या हवा गुणवत्ता देखरेख अॅपकडून मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी मुंबईची सरासरी हवेची गुणवत्ता 159 एक्यूआय नोंदवली गेली, जी मार्चनंतरची सर्वाधिक आहे.
वांद्रे-कुलाब्यात वाईट हाल
दरम्यान, मुंबईतील विविध भागात बीएमसी आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने संध्याकाळी 6 वाजेपर्यंत हवेच्या गुणवत्तेचे निरीक्षण करण्यासाठी बसवलेल्या उपकरणांच्या रीडिंगनुसार, वांद्रे येथे हवेची गुणवत्ता 218 एक्यूआय आणि कुलाबा येथे हाच आकडा 206 एक्यूआय नोंदवले गेल्याची माहिती समोर आली आहे.
200 पार AQI चा अर्थ तरी काय ?
200 पार AQI चा अर्थ असा की प्रदूषणाचा स्तर खूप अधिक आहे आणि हवेची गुणवत्ता ही आरोग्यासाठी खराब. 100 पेक्षा जास्त AQI असल्यास दमा, फुफ्फुस आणि हृदयरोग असलेल्या लोकांसाठी समस्या वाढू शकतात. 200 पेक्षा जास्त AQI असलेल्या भागात आणखी गुंतागुंत होऊ शकते.
कोणकोणत्या भागात 100 ते 200 दरम्यान AQI ?
मुंबईतील अनेक भागात हवेची गुणवत्ता 100 ते 200 AQI दरम्यान असल्याचे समोर आले आहे. चेंबूर 181, विलेपार्ले 169, गोवंडी 169, मालाड 163, भायखळा 156, घाटकोपर 152, सायन 131, कांदिवली 117, बोरिवली 109, शिवडी 107 आणि वरळी 102 अशी नोंद झाली आहे.
प्रदूषण करणाऱ्यांवर कोणाची कारवाई ?
बीएमसीच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, बीएमसीच्या घनकचरा विभागाला (एसडब्ल्यूएम) प्रदूषण करणाऱ्यांवर दंड आकारण्याचा अधिकार आहे. तर बीएमसीच्या पर्यावरण विभागाशी समन्वय साधून, इमारत कारखाने विभाग हा बांधकाम स्थळांना काम थांबवण्याच्या सूचना जारी करत असतो. शोकॉज नोटीस जारी झाल्यानंतर वॉर्डमध्ये तैनात असलेले संबंधित अधिकारी हे तपासून पाहतात की नियमांचं पालन होत आहे की नाही… प्रदूषण पसरवणाऱ्यांनप बीएमसीने 10 ते 10 हजार रुपयांपर्यंत दंड आकारण्याची तरतूद आहे.
