Mumbai Corona Update : महानगरातील कोरोना रुग्णांच्या संख्येत घट, मुंबईत दिवसभरातील रुग्णसंख्या 6 हजाराच्या आत

Mumbai Corona Update : महानगरातील कोरोना रुग्णांच्या संख्येत घट, मुंबईत दिवसभरातील रुग्णसंख्या 6 हजाराच्या आत
कोरोना विषाणू

मुंबईत आज दिवसभरात 5 हजार 956 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. त्यातील 4 हजार 944 रुग्णांना कुठलीही लक्षणं नाहीत. तर 479 जण आज रुग्णालयात दाखल झाले आहेत. तसंच दिवसभरात 15 हजार 551 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. तर मुंबईत आज 12 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती महापालिकेकडून देण्यात आली आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: सागर जोशी

Jan 17, 2022 | 8:37 PM

मुंबई : देशात एकीकडे कोरोना प्रादुर्भाव (Corona Outbreak) वाढत आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची (Corona Patient) संख्या वाढताना पाहायला मिळतेय. अशावेळी देशातील महानगरांमध्ये कोरोना रुग्णसंख्येत काहीशी घट पाहायला मिळत आहे. मागील आठवड्यात मुंबईतील (Mumbai) दिवसाला आढळून येणाऱ्या कोरोना रुग्णांची संख्या 20 हजाराच्या पुढे गेली होती. मात्र, आज मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या 6 हजाराच्या आत आली आहे. त्याचबरोबर राजधानी दिल्लीतील (New Delhi) कोरोना रुग्णसंख्येतही घट पाहायला मिळत आहे.

मुंबईत आज दिवसभरात 5 हजार 956 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. त्यातील 4 हजार 944 रुग्णांना कुठलीही लक्षणं नाहीत. तर 479 जण आज रुग्णालयात दाखल झाले आहेत. तसंच दिवसभरात 15 हजार 551 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. तर मुंबईत आज 12 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती महापालिकेकडून देण्यात आली आहे. या आकडेवारीनुसार मुंबईतील रुग्ण बरे होण्याचा दर 93 टक्के इतका आहे. तर रुग्णवाढीचा दर केवळ 1.22 टक्के आहे. मुंबईतील रुग्ण दुपटीचा कालावधी 55 दिवसांवर गेला आहे.

राजधानी दिल्लीतही कोरोना रुग्णसंख्येत घट

देशाची राजधानी दिल्लीतही कोरोना रुग्णांच्या संख्येत घट पाहायला मिळत आहे. गेल्या 24 तासात दिल्लीत 12 हजार 527 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. 16 जानेवारी रोजी दिल्लीत 18 हजार 286 कोरोना रुग्ण आढळून आले होते.

पुण्यातील कोरोना स्थिती

पुण्यात आज दिवसभरात 3 हजार 959 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. दिवसभरात 3 हजार 67 रुग्णांना डिस्चार्ज मिळालाय. तर पुणे शहरातील 6 आणि पुण्याबाहेरील 6 अशा एकूण 12 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. पुण्यात सध्या 35 हजार 73 सक्रिय कोरोना रुग्ण आहेत.

देशातील कोरोना स्थिती

देशातील कोरोना रुग्णांच्या आकडेवारीकडे नजर टाकली तर संध्याकाळी 7.30 वाजेपर्यंत दिवसभरात 168 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यातील सर्वाधिक 33 मृत्यू हे पश्चिम बंगालमध्ये, दिल्लीमध्ये 24 रुग्णांचा मृत्यू तर महाराष्ट्रात 12 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात मागील 24 तासात 66 हजार 163 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

इतर बातम्या :

‘नानाभाऊ केवळ शारीरिक उंची असून चालत नाही…’ फडणवीसांचं प्रत्युत्तर, तर चंद्रकांतदादांचे सर्व जिल्हाध्यक्षांना महत्वाचे आदेश

‘पंतप्रधान मोदींबद्दल नाही तर एका गावगुंड मोदीबाबत बोललो’, नाना पटोलेंची सारवासारव, भाजपकडून जोरदार प्रत्युत्तर

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें