New year celebration : वर्षातला शेवटचा सुर्यास्त पाहण्यासाठी गर्दी, सेलिब्रेशनची नियमावली काय? वाचा सविस्तर

चौपाट्यांवर पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. तसेच कोस्ट गार्ड, लाईफ गार्डही मोठ्या संख्येने तैनात करण्यात आले आहेत. खाजगी सुरक्षा रक्षाकांनाही याठिकाणी बोलावण्यात आले आहे. त्यामुळे नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे.

New year celebration : वर्षातला शेवटचा सुर्यास्त पाहण्यासाठी गर्दी, सेलिब्रेशनची नियमावली काय? वाचा सविस्तर
Sunset
Follow us
| Updated on: Dec 31, 2021 | 5:14 PM

मुंबई : मुंबईतील अनेक चौपाट्यावर वर्षाचा शेवटचा सुर्यास्त पाहण्यासाठी लोक गर्दी करत आहेत, त्यामुळे सध्या मुंबईतल्या अनेक चौपाट्यांना यात्रेचे स्वरूप आले आहे. कोरोना आणि ओमिक्रॉनचे वाढते आकडे लक्षात घेता प्रशासनाकडून निर्बंध लागू करण्यात आलेत. त्यामुळे पोलीस लोकांना चौपाट्या रिकाम्या करण्यास सांगत आहेत. लोकांनी घरी बसूनच 31 डिसेंबरचे सेलिब्रेशन करावे आणि नवर्षाचे स्वागतही घरूनच करावे असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

चौपाट्यांवर मोठा पोलीस बंदोबस्त

मुंबईच्या जूहू चौपाटीवर मुंबईकरांनी सुर्यास्त पाहण्यासाठी गर्दी केली आहे. या चौपाटीवर २५० पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. तसेच कोस्ट गार्ड, लाईफ गार्डही मोठ्या संख्येने तैनात करण्यात आले आहेत. खाजगी सुरक्षा रक्षाकांनाही याठिकाणी बोलावण्यात आले आहे. त्यामुळे नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे.

पार्टी-सेलिब्रेशनला बंदी

वाढत्या कोव्हिड प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत नवीन वर्षाच्या सेलिब्रेशन पार्ट्यांना आधीच चाप लावण्यात आला आहे. रेस्टॉरंट, हॉटेल, बार, पब, रिसॉर्ट, क्लब यासारख्या कुठल्याही खुल्या किंवा बंदिस्त जागी 30 डिसेंबर ते 7 जानेवारी या काळात न्यू इयर सेलिब्रेशनसाठी जमता येणार नाही.

बाहेरून येणाऱ्या वाहनांची तपासणी

पोलीस बाहेरून मुंबईमध्ये येणाऱ्या प्रत्येक वाहनांची तपासणी करत आहेत. जे वाहनचालक कोरोना नियमांचे आणि वाहतुक नियमांचे उल्लंघन करत आहेत, त्यांच्यावर पोलिसांकडून कारवाईचा बडगा उगारण्यात येत आहे. वाहनधारकांना मुंबईमध्ये येण्याचे कारण, तसेच वाहनाचे वैध कागदपत्रांची देखील पोलिसांकडून विचारणा होत आहे. नववर्षाच्या निमित्ताने मुंबईमध्ये अनेक जण येतात. सध्या राज्यात ओमिक्रॉनची साथ चालू आहे. ओमिक्रॉनच्या प्रसाराला आळा घालण्यासाठी तसेच संभाव्य घातपात टाळण्यासाठी तपासणी मोहीम सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Kalyan Crime: पती-पत्नीने मित्रांच्या मदतीने रिक्षा चालकास बेदम मारहाण करुन लुटले, सीसीटीव्हीच्या सहाय्याने लागला गुन्ह्याचा छडा

Hero Pleasure ते Honda Dio, 2021 मधील देशातील टॉप 5 स्कूटर्स, जाणून घ्या किंमती आणि फीचर्स

Murder at Teesri Manzil 302 Review : 14 वर्षांनंतर रिलीज झाला इरफान खान यांचा सिनेमा; कसा आहे, वाचा…

Non Stop LIVE Update
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच.
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?.
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती.
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा.
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?.