मुंबईला धोकादायक करणाऱ्यांमध्ये तुम्ही आहात? वाचा महापौर काय म्हणतायत?

मास्क न वापरणारे 25 टक्के मुंबईकर शहरासाठी धोकादायक असल्याचं सांगत कोरोना आणखी गेला नाही त्यामुळे नियम अटी पाळा, असं आवाहन मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी केलंय.

  • गिरीश गायकवाड, टीव्ही 9 मराठी, मुंबई
  • Published On - 14:45 PM, 21 Dec 2020
मुंबईला धोकादायक करणाऱ्यांमध्ये तुम्ही आहात? वाचा महापौर काय म्हणतायत?

मुंबई :  सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सगळेजण सज्ज झालेत. परंतु या उत्साहाच्या वातावरणात मास्क न लावणाऱ्यांची संख्याही दिवसेंदिवस वाढू लागलीय. अशात कोरोना गेलाय की काय? असा प्रश्न अनेकांना पडलाय. मुंबईत तर 25 टक्के लोक मास्क घालत नाहीयत. हेच 25 टक्के लोक मुंबईसाठी धोका असल्याचं मुंबई महानगरपालिकेच्या महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या आहेत. (Mumbai Mayor Kishori Pednekar Slam Who Dont Wear Mask)

“सणांचे दिवस जवळ आले आहेत. गर्दी करु नका. रात्रीचा कर्फ्यू तर लागलाच आहे, पण कठोर पावलं ऊचलण्यासाठी मनपाला भाग पाडू नये, असा इशारा देत 25 टक्के मास्क न घालणारी लोकं मुंबईसाठी धोकादायक आहेत”, असं महापौर पेडणेकर म्हणाल्या.

महाराष्ट्र सरकारने कोरोना चाचणीसाठीचे दर कमी करुन देखील मुंबईतील अनेक खाजगी लॅब रुग्णांकडून अवाढव्य शुल्क घेत आहेत. अनेक रुग्णांच्या अश्या प्रकारच्या तक्रारी येत आहेत. याच पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी एक महत्त्वाची बैठक बोलावली आहे. संबंधितांना पहिल्यांदा समज देऊ पण जर नाही सुधारले तर त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचा इशारा पेडणेकर यांनी दिलाय.

मुंबई महापालिकेवर शिवसेनेचा भगवा

मुंबई मनपात 227 जागांवर युती होणार की नाही मला माहीत नाही. काँग्रेसचे रवी राजा काय बोलले ते मला माहीत नाही. पण कुणी काहीही बोलू द्या, शिवसेनेला फरक पडत नाही. आमच्यावर कसलाच दबाव नाही. आम्हाला शिवसेना पक्षप्रमुख जो आदेश देतील तो आदेश आम्ही पाळू आणि मुंबई महापालिकेवर भगवा झेंडा फडकवू, असंही पेडणेकर म्हणाल्या.

(Mumbai Mayor Kishori Pednekar Slam Who Dont Wear Mask)

संबंधित बातम्या

मुंबईला आतून बाहेरून बदलणारा कोस्टल प्रोजेक्ट कुठपर्यंत आलाय?, वाचा ही बातमी…

मुंबईकरांनो, तुम्ही फास्ट टॅग लावलंय ना? 26 जानेवारी डेडलाईन