डिझाईनर मास्कवरुन अजितदादांच्या सूचना, काल किशोरीताई म्हणाल्या मला ‘मॅचिंग’ची आवड, आज N95 घातला

काही दिवसांपूर्वीच पुण्यात बोलत असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नागरिकांना डिझाईनर मास्क परिधान न करण्याचा सल्ला दिला होता. त्याऐवजी N95 मास्क वापरण्याचं आवाहन अजित पवार यांनी जनतेला केलं होतं. यावरुनच शुक्रवारच्या पत्रकार परिषदेत काही पत्रकारांनी किशोरीताईंना छेडलं.

डिझाईनर मास्कवरुन अजितदादांच्या सूचना, काल किशोरीताई म्हणाल्या मला 'मॅचिंग'ची आवड, आज N95 घातला
किशोरी पेडणेकर आधी डिझायनर मास्कमध्ये, आज एन९५ मास्क
Follow us
| Updated on: Jan 08, 2022 | 12:53 PM

मुंबई : मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी शहरातील कोरोना रुग्णसंख्या 20 हजाराच्या पार गेल्यामुळे लॉकडाऊनबाबत (Corona Lockdown) जनतेत असलेला संभ्रम दूर करण्यासाठी शनिवारी सकाळी पत्रकार परिषद घेतली. यावेळी किशोरीताईंच्या N95 मास्कने लक्ष वेधून घेतलं. आता रुक्ष दिसणारा N95 मास्क लक्षवेधी का ठरावा, असा प्रश्न कोणालाही पडेल. तर याचं कारण म्हणजे पेडणेकर नेहमी ज्या प्रकारचे मास्क घालतात, त्यापेक्षा तो वेगळा होता. किशोरीताईंना असलेली डिझाईनर कापडी मास्कची आवड लपलेली नाही. नेहमीच साडीला मॅचिंग असणारे त्यांचे मास्क महिलावर्गात चर्चेचा विषय ठरतात. खुद्द किशोरी पेडणेकरांनीही आपली ही सुप्त आवड बोलून दाखवली होती. मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी डिझाईनर मास्क न घालण्याचा सल्ला दिल्यावरुन कालच पत्रकारांनी महापौरांना टोकलं होतं, आणि दुसऱ्याच दिवशी पेडणेकरांनी मॅचिंग मास्कच्या हौसेला मुरड घालून N95 मास्क घातल्याचं दिसत आहे.

काही दिवसांपूर्वीच पुण्यात बोलत असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नागरिकांना डिझाईनर मास्क परिधान न करण्याचा सल्ला दिला होता. त्याऐवजी N95 मास्क वापरण्याचं आवाहन अजित पवार यांनी जनतेला केलं होतं. यावरुनच शुक्रवारच्या पत्रकार परिषदेत काही पत्रकारांनी किशोरीताईंना छेडलं.

किशोरी पेडणेकर काय म्हणाल्या होत्या?

“मुळात माझा तीन लेयरचाच मास्क आहे. श्वसनाला मला जे योग्य वाटतं, की माझा बचाव होतोय, थ्री लेयरच्या मास्कने. आणि मी महिला आहे, वय वाढलं, तरी सौंदर्य किंवा छान राहणं, यात काही गैर नाही, मास्क तर लावायचाच आहे. त्यामुळे कोणी काहीही म्हणू दे, म्हणजे त्यांचं (अजित पवार) म्हणणं बरोबरच आहे. माझा पण थ्री लेयरचाच मास्क असतो, कॉटनचा असून. तो धुतला जातो, पुन्हा वापरला जातो, आणि ती काळजी मी घेतेय. त्यामुळे पवार साहेबांनी जे सांगितलं, N95 घाला. N95 चा जो मास्क आहे, तो थोडा महाग आहे. सामान्यातल्या सामान्य जनतेचं मी नेतृत्व करते. माझ्या सामान्य जनतेला काय परवडेल, त्याचं मी जर उदाहरण राहिली. तर ते वापरतील आणि करतील, आदर्श घेतली. त्यात महिला असल्यामुळे एक सुप्त गुण असतो, सगळंच मॅचिंग हवं. माझं संरक्षण होतंय ना त्या मास्कनी, मग तो मी वापरते” असं किशोरी पेडणेकर म्हणाल्या होत्या.

पाहा कालचा व्हिडीओ :

आजच्या पत्रकार परिषदेत काय घडलं?

किशोरी पेडणेकर यांच्याकडून पीपीई किट घालून बीकेसीत पाहणी केली. बीकेसीमध्ये 2500 बेड आहेत. राज्यातील कोरोना संकट गंभीर झालं आहे. 700 टन ऑक्सिजन लागेल त्यावेळी लॉकडाऊन करावं लागेल, असं महापौर म्हणाल्या. घाबरुन जाऊ नये, काळजी घ्यावी, मी प्रत्येक रुग्ण आणि नर्स सोबत बोलले आहे. आयुक्तांनी घाबरु नका असा सांगितलं, पण नियम पाळायला हवेत. मुंबईत आढळलेल्या 20 हजार रुग्णांपैकी 17 हजार रुग्ण हे लक्षणविरहीत आहेत, असं महापौरांनी सांगितलं.

पाहा आजचा व्हिडीओ :

संबंधित बातम्या :

देशात कोरोनाचा स्फोट, तब्बल 7 पटीने वाढ, दिवसभरात 1.42 लाख नवे रुग्ण, महाराष्ट्राची काय स्थिती ?

राज्यात कोरोनाचा कहर सुरुच, दिवसभरात 40 हजारापेक्षा अधिक रुग्ण, 20 रुग्णांचा मृत्यू

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.