AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबई महापालिकेच्या निकालाच्या निमित्ताने नेमकं काय घडलं? काय झाले बदल?

शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे साल २०१७ मध्ये एकट्याने मुंबई महानगर पालिका निवडणूक लढवूनही ८५ जागा जिंकल्या होत्या. आता शिवसेनेची उभी शकले होऊनही शिवसेनेची ताकद घटलेली नाही हेच हे निकाल सांगत आहेत.

मुंबई महापालिकेच्या निकालाच्या निमित्ताने नेमकं काय घडलं? काय झाले बदल?
BMC Election 2026
| Updated on: Jan 16, 2026 | 7:56 PM
Share

राज्यातील २९ महानगर पालिकांचे निकाल जाहीर होत आहेत. राज्यात मुंबई महानगर पालिकेसह २६ महानगर पालिकेत भाजपाला मोठे यश मिळालेले आहे. मुंबई महानगर पालिकेत भाजपा आणि शिंदे यांची शिवसेना १२६ तर ठाकरे बंधू ७० जागांवर पुढे आहेत.तर भाजपा आणि शिवसेना महायुतीला १२६ तर उबाटा आणि मनसे यांना ७२ जागा जिंकल्या आहेत. अजूनही मतांची मोजणी सुरु असून संपूर्ण निकाल येण्यासाठी रात्रीचे दहा वाजण्याची शक्यता आहे. मुंबई महानगर पालिकेत आता भाजपाचा महापौर होणार असल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळे शिवसेनेच्या मुंबई महानगर पालिकेतील २८ वर्षांच्या सत्तेला सुरुंग लागल्याचे म्हटले जात आहे. या निकालाच्या निमित्ताने काय- काय बदल होणार आहे हे पाहूयात…

मुंबई महापालिकेच्या निकालाच्या निमित्ताने काय घडलं?

मुंबईतील महापालिका निवडणूकांच्या निमित्ताने उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या २५ वर्षांच्या सत्तेला हादरा बसला आहे. आता तब्बल २५ वर्षांनी मुंबई महानगर पालिकेच्या इतिहासात प्रथमच बिगर शिवसेनेचा महापौर होणार आहे. मुंबई महापालिकेतील शिवसेनेच्या २५ वर्षांच्या सत्तेला सुरुंग लागला असून भाजपाचा महापौर कोण होणार याकडे लक्ष लागले आहे. मुंबई महानगर पालिकेत १९९६ पासून शिवसेनेचाच महापौर विराजमान झाला आहे. शिवसेनेचे पहिले महापौर म्हणून मिलिंद वैद्य विजयी झाले होते. विशेष म्हणजे यंदाच्या २०२६ च्या मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकीतही मिलिंद वैद्य निवडून आले आहेत.

मुंबई महापालिकेच्या शिवसेनेचे महापौर म्हणून मिलिंद वैद्य निवडून येण्याआधी म्हणजे त्यापूर्वी म्हणजे १९९५-९६ ला काँग्रेसचे रा. ता. कदम हे काँग्रेसचे महापौर होते.बिगर शिवसेनेचे ते शेवटचे महापौर होते. त्यानंतर सलग साल २०१७ पर्यंत शिवसेनेचे महापौर निवडून आले आहेत. म्हणजे १९९६ पासून मुंबईच्या महापौरपदी शिवसेनेचे १२ महापौर बसले आहेत.

शिवसेनेच्या १२ महापौरांची नावे –

मिलींद वैद्य

विशाखा राऊत

नंदु साटम

हरेश्वर पाटील

महादेव देवळे

दत्ताजी दळवी

शुभा राऊळ

श्रध्दा श्रीधर जाधव

सुनिल वा. प्रभु

स्नेहल सुर्यकांत आंबेकर

प्रिं.विश्र्वनाथ महाडेश्र्वर

किशोरीताई पेडणेकर

ठाकरेंकडे पक्ष नसला तरी त्यांचे संघटन मजबूत

या मुंबई महानगर पालिका निवडणुकीत उद्धव ठाकरे यांना सायंकाळी सहा वाजेपर्यंत ६४ जागा मिळाल्या होत्या. साल २०१७ मध्ये शिवसेनेने एकट्याने ८४ जागा जिंकल्या होत्या. शिवसेनेच्या २० जागा जरी कमी झाल्या आहेत. शिवसेनेच्या २० जागा कमी झाल्या असल्या तरी उद्धव ठाकरे यांची मुंबईतील ताकद कायम असल्याचे निकालाद्वारे दिसून आले आहे.

कारण यंदांच्या निवडणूकी पूर्वी शिवसेनेत मोठी फूट पडली होती. शिवसेनेचे चिन्ह आणि पक्ष हातातून गेले. तसेच ४० ते ५० विद्यमान शिवसेना नगरसेवक शिंदे गटात गेले आहेत. तरीही ठाकरेचे मुंबईत चांगलं प्रदर्शन झालं. यावरून ठाकरे यांच्याकडे पक्ष नसला तरी त्यांचे संघटन मजबूत असल्याचं दिसून येत आहे.

Follow Us
जरांगे पाटील आणि सरकारची बोलणी पुन्हा फिस्कटली? 58 लाख कुणबी...
Manoj Jarange Patil | जरांगे पाटील आणि सरकारची बोलणी पुन्हा फिस्कटली? 58 लाख कुणबी प्रमाणपत्रांवर ठाम; GR झाल्याशिवाय माघार नाहीच
फडणवीस दिल्लीत जाणार; राऊतांचा मोठा दावा; भाजपच्या अंतर्गत घडामोडींवर
Sanjay Raut | फडणवीस दिल्लीत जाणार; संजय राऊतांचा मोठा दावा; भाजपच्या अंतर्गत घडामोडींवर सूचक विधान
मत व्यक्त केलं म्हणून हल्ला? बापटांवरील हल्ल्यावर पवारांचा संताप
Sharad Pawar | मत व्यक्त केलं म्हणून हल्ला? विद्यानंद बापटांवरील हल्ल्यावर शरद पवारांचा संताप; हा लोकशाही आणि मूलभूत अधिकारांवर हल्ला
मुंबईसाठी फडणवीसांचा मोठा प्लॅन! पुढील 10 वर्षांत मुंबई...
CM Fadnavis | मुंबईसाठी फडणवीसांचा मोठा प्लॅन! पुढील 10 वर्षांत मुंबई झोपडपट्टीमुक्त करणार; तिसऱ्या मुंबईचेही संकेत
जरांगेंचा सरकारला अंतिम इशारा, नेमकं काय म्हणाले?
Manoj Jarange Hunger Strike | जरांगेंचा सरकारला अंतिम इशारा, नेमकं काय म्हणाले?
धराशिवमध्ये राणा जगजितसिंह पाटील यांच्या निवासस्थानासमोर...
धराशिवमध्ये राणा जगजितसिंह पाटील यांच्या निवासस्थानासमोर तीव्र आंदोलन, असं काय घडलं?
मनोज जरांगे पाटील उपोषण सोडणार की नाही? शिष्टमंडळासोबतच्या चर्चेत...
मनोज जरांगे पाटील उपोषण सोडणार की नाही? शिष्टमंडळासोबतच्या चर्चेत नेमकं काय घडलं?
तोडगा निघणार? मनोज जरांगेंना भेटण्यापूर्वी शिष्टमंडळाची अभ्यासक...
तोडगा निघणार? मनोज जरांगेंना भेटण्यापूर्वी शिष्टमंडळाची अभ्यासकांसोबत सविस्तर चर्चा
भिवंडी पालिकेत महत्त्वाची बैठक, नगरसेविका कँडी क्रश खेळण्यात मग्न
भिवंडी पालिकेत महत्त्वाची बैठक, नगरसेविका कँडी क्रश खेळण्यात मग्न
36 Jilhe 50 Batmya | 36 जिल्ह्यांतील 50 महत्त्वाच्या बातम्या;
36 जिल्ह्यांतील 50 महत्त्वाच्या बातम्या; मराठा आंदोलनासह राज्यात मोठ्या घडामोडी, जाणून घ्या एका क्लिकवर