भारताच्या हातातून विश्वविजेतेपद निसटलं, संजय राऊतांनी भाजपवर टीकास्त्र डागलं; म्हणाले, वानखेडेवर मॅच झाली असती तर…

Sanjay Raut on ICC World Cup 2023 and PM Narendra Modi : वानखेडेवर मॅच झाली असती तर...; वर्ल्ड कपमधील भारताच्या पराभवावर बोलताना संजय राऊत यांचा भाजपवर निशाणा साधला आहे. तसंच कपील देव यांना हा सामना पाहण्यासाठी आमंंत्रित का केलं नाही?, असा सवाल राऊतांनी केलाय.

भारताच्या हातातून विश्वविजेतेपद निसटलं, संजय राऊतांनी भाजपवर टीकास्त्र डागलं; म्हणाले, वानखेडेवर मॅच झाली असती तर...
Follow us
| Updated on: Nov 20, 2023 | 11:45 AM

मुंबई | 20 नोव्हेंबर 2023 : वर्ल्ड कप फायनलमध्ये भारताचा पराभव झाला. या पराभवावर बोलताना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. भारतीय संघ हरला ते दुःख सर्वांना झालं आहे. या देशांमध्ये खेळाडू वृत्ती आहे आणि खेळांमध्ये हारजित होत असते. हा सामना म्हणजे भारत विरुध्द ऑस्ट्रेलिया नसून भाजप विरुद्ध ऑस्ट्रेलिया असा सामना होता. जिंकला तर भारतीय जनता पक्ष, आणि आता हरलात ना? भारत संघ उत्तम खेळला हरले असले तरी त्यांचा अभिनंदन केलं पाहिजे. दुःखात आपण देखील सामील झाले पाहिजे. ही संघावर व्यक्तिगत टीका टीपण्णी करत नाही, असं संजय राऊत म्हणाले.

“वानखेडेवर मॅच झाली असती तर…”

नरेंद्र मोदी स्टेडियम मध्ये भारताचा पराभव झाला आहे. अंतिम सामने दिल्लीत होतात किंवा मुंबई वानखेडे मैदानात होतात. मात्र या वेळेला क्रिकेटमध्ये एका राज्याची राजकीय लॉबी घुसली आहे. मला क्रिकेटमधलं फारसं कळ नाही. पण वानखेडेवर मॅच झाली असती तर ही मॅच आपण जिंकलो असतो, असं जाणकार सांगतात. वल्लभाई पटेल स्टेडियमचं नाव बदलून नरेंद्र मोदी स्टेडियम ठेवलं गेलं आहे. सामना या ठिकाणी ठेवला भारतीय पक्ष सर्व आपल्याकडे श्रय घेण्याचा विचार होता. वर्ल्ड कप जिंकला असता तर देशाला आनंद झाला असता. मात्र ज्या पद्धतीने राजकारण निकालानंतरची व्यवस्था करण्यात आली होती भारतीय जनता पक्ष दुर्दैवाने पाणी त्याच्यावरती फिरलं, असं संजय राऊत म्हणालेत.

“कपिल देव यांना आमंत्रण का नाही?”

सर्वप्रथम देशाला विश्वचषक मिळून दिला कपिल देव आणि त्याच्या संघाला आमंत्रित केलं नाही.कपिल देवच तिथे आगमन झालं असतं इतर राजकीय नेत्यांच्या प्रसिद्धीला ग्रहण लागलं असतं याला म्हणतात राजकारण… पडद्या मागचे राजकारण काल झालं भविष्यात त्याचं नक्कीच चर्चा होणार आहे. क्रिकेटची पंढरी मुंबई मुंबईतून सर्वच उद्योग घेऊन जायचे. पैसा घेऊन जायचा. कॉर्पोरेट कंपन्या घेऊन जायच्या आणि क्रिकेट देखील घेऊन जायचं हा यांचा डाव आहे, अशी घणाघाती टीका राऊतांनी केलीय.

शिवतीर्थवरील राड्यावर म्हणाले…

बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनाला झालेल्या राड्यावरही राऊतांनी भाष्य केलं. सुरुवात कोणी केली त्यांच्यावरती नोटीस कारवाई का केली नाही? मुंब्रा शाखेवरती ज्यांनी बुलडोजर चढवला त्याच्यावरती कारवाई का केली गेली नाही ? स्मृतीस्थळ शिवसेनाप्रमुखांच्या गद्दार आणि बेमान लोकांनी पाय ठेवू नये. बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितले होते. गद्दाराणा तुडवा म्हणून आपण स्वतःला शिवसैनिक समजतात मग आमच्या लोकांनी तुडवण्याचा प्रयन्त केला असेल तर कशाला गुन्हे दाखल करत आहेत, असं राऊत म्हणालेत.

Non Stop LIVE Update
कांदा निर्यात बंदीचे पडसाद, मुंबई-आग्रा महामार्ग शेतकऱ्यांना रोखला अन्
कांदा निर्यात बंदीचे पडसाद, मुंबई-आग्रा महामार्ग शेतकऱ्यांना रोखला अन्.
..तरीही पत्रव्यवहार करता? फडणवीसांच्या त्या पत्रावर राऊतांचा खोचक टोला
..तरीही पत्रव्यवहार करता? फडणवीसांच्या त्या पत्रावर राऊतांचा खोचक टोला.
भाजप म्हणतय देशद्रोही, तेच सत्ताधाऱ्यांचे सहकारी? सकाळी सवाल नंतर बवाल
भाजप म्हणतय देशद्रोही, तेच सत्ताधाऱ्यांचे सहकारी? सकाळी सवाल नंतर बवाल.
मराठा आरक्षण मिळणार की नाही? कोर्टाचा निकाल कोणत्याही क्षणी येणार
मराठा आरक्षण मिळणार की नाही? कोर्टाचा निकाल कोणत्याही क्षणी येणार.
नवाब मलिक आजही सत्ताधारी बाकावरच; फडणवीस यांचा लेटर बॉम्ब निकामी?
नवाब मलिक आजही सत्ताधारी बाकावरच; फडणवीस यांचा लेटर बॉम्ब निकामी?.
... अन् अजितदादा भडकले; फडणवीसांच्या 'त्या' पत्रावर नेमकं काय म्हणाले?
... अन् अजितदादा भडकले; फडणवीसांच्या 'त्या' पत्रावर नेमकं काय म्हणाले?.
ज्येष्ठ अभिनेते ज्युनिअर महमूद यांचं निधन, 'या' आजाराशी देत होते झुंज
ज्येष्ठ अभिनेते ज्युनिअर महमूद यांचं निधन, 'या' आजाराशी देत होते झुंज.
नवाब मलिक यांना महायुतीत नो एन्ट्री, देवेंद्र फडणवीस यांचा लेटरबॉम्ब
नवाब मलिक यांना महायुतीत नो एन्ट्री, देवेंद्र फडणवीस यांचा लेटरबॉम्ब.
थंडीत सरकारला घामटा फुटणार? वडेट्टीवारांच्या घरी विरोधकांची खलबतं सुरू
थंडीत सरकारला घामटा फुटणार? वडेट्टीवारांच्या घरी विरोधकांची खलबतं सुरू.
राऊत माफी मागणार? त्या वक्तव्यावरून आरोग्यमंत्र्याचा थेट इशारा काय?
राऊत माफी मागणार? त्या वक्तव्यावरून आरोग्यमंत्र्याचा थेट इशारा काय?.