मुंबई, पुणे, नाशिक… महाराष्ट्रातील 29 महापालिकांचा मुहूर्त ठरला, प्रभाग रचना कशी? निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद
आज संध्याकाळी ४ वाजता महाराष्ट्र महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकांचा संपूर्ण कार्यक्रम जाहीर होणार आहे. मुंबई, पुणे, नागपूरसह २९ शहरांच्या निवडणुकांच्या तारखांची घोषणा आज केली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

राज्यातील राजकीय वर्तुळात प्रतीक्षा असलेल्या महापालिका (Municipal Corporation) आणि जिल्हा परिषदेच्या (Zilla Parishad) निवडणुकांचा कार्यक्रम आज (१५ डिसेंबर) जाहीर होण्याची दाट शक्यता आहे. राज्य निवडणूक आयोग (Election Commission) आज संध्याकाळी ४ वाजता मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेणार आहे. या पत्रकार परिषदेत, या सर्व निवडणुकांचा संपूर्ण कार्यक्रम जाहीर केला जाईल, असे बोललं जात आहे. त्यामुळे निवडणूक आजच्या घोषणेकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.
महाराष्ट्रातील एकूण २९ महापालिका आणि अनेक जिल्हा परिषदांच्या निवडणुका एकाच वेळी जाहीर होण्याची शक्यता आहे. यात खालील प्रमुख शहरांच्या महापालिकांचा समावेश आहे. मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, नाशिक, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई यांसारख्या प्रमुख शहरांमधील महापालिका निवडणुकांची घोषणा आज करण्यात येणार आहे. तसेच नवी मुंबई, पिंपरी-चिंचवड, कल्याण-डोंबिवली, वसई-विरार, सोलापूर, कोल्हापूर, अमरावती, अकोला इत्यादी महापालिकेच्या निवडणुकीच्या संपूर्ण कार्यक्रमही आज जाहीर होईल, असे बोललं जात आहे.
प्रमुख महापालिकांची नावे
मुंबई विभाग
- मुंबई
- नवी मुंबई
- ठाणे
- कल्याण-डोंबिवली
- वसई-विरार
- भिवंडी
- पनवेल
- मीरा भाईंदर
- उल्हासनगर
पश्चिम महाराष्ट्र
- पुणे
- पिंपरी-चिंचवड
- कोल्हापूर
- सांगली
- सोलापूर
- इचलकरंजी
उत्तर महाराष्ट्र
- नाशिक
- अहिल्यानंगर
- धुळे
- जळगाव
- मालेगाव
मराठवाडा
- लातूर
- नांदेड-वाघाळा
- परभणी
- जालना
- छत्रपती संभाजीनगर
विदर्भ
- नागपूर
- अकोला
- अमरावती
सद्यस्थितीत प्रभाग किती?
निवडणूक आयोगाच्या आजच्या पत्रकार परिषदेत केवळ तारखाच नव्हे, तर निवडणुकीच्या प्रक्रियेतील महत्त्वाचा भाग असलेल्या प्रभाग रचनेवरही स्पष्टता येण्याची शक्यता आहे. हा प्रभाग एक सदस्यीय असेल की दोन किंवा तीन सदस्य असलेला म्हणजे एका प्रभागातून किती नगरसेवक निवडून येणार यावर आज आयोगाकडून स्पष्टता येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
| महापालिका (Municipal Corporation) | प्रभाग / नगरसेवक संख्या (Wards / Corporators) |
| मुंबई | २२७ प्रभाग |
| पुणे | १६२ नगरसेवक संख्या |
| पिंपरी-चिंचवड | १२८ नगरसेवक संख्या |
| ठाणे | ४८ प्रभाग |
| नाशिक | १२२ प्रभाग |
| नागपूर | ५२ प्रभाग |
| कल्याण-डोंबिवली | १२३ प्रभाग |
| नवी मुंबई | १११ प्रभाग |
| वसई-विरार | ११५ नगरसेवक संख्या |
| छत्रपती संभाजी नगर | ११३ प्रभाग |
दरम्यान राज्य निवडणूक आयोग आज संध्याकाळी ४ वाजता मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह या ठिकाणी ही अत्यंत महत्त्वाची पत्रकार परिषद घेणार आहे. या पत्रकार परिषदेवेळी राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे संपूर्ण वेळापत्रक घोषित केलं जातं का? याकडे सर्वांचेच लक्ष लागलं आहे.
