1.35 कोटी खर्चून मुंबईतील दोन उद्यानांचं सुशोभिकरण, आदित्य ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त रविवारी भूमिपूजन

गोरेगाव येथील आरे चेक नाक्याजवळ रविंद्र वायकर यांनी शहीद तुकाराम ओंबळे तसेच स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या स्मरणार्थ आमदार निधीतून दोन भव्य मनोरंजन उद्याने उभारली आहेत.

1.35 कोटी खर्चून मुंबईतील दोन उद्यानांचं सुशोभिकरण, आदित्य ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त रविवारी भूमिपूजन
आदित्य ठाकरे, पर्यावरण मंत्री
Follow us
| Updated on: Jun 12, 2021 | 4:50 PM

मुंबई : जोगेश्‍वरी विधानसभा क्षेत्रातील पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी जोगेश्‍वरी विधानसभेचे आमदार तसेच माजी राज्यमंत्री रविंद्र वायकर दरवर्षी वृक्षलागवडीचा कार्यक्रम हाती घेतात. 16 जून (रविवारी) रोजी पर्यटन, पर्यावरण, राजशिष्टाचार तसेच मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आरे चेक नाका येथील दोन उद्यानांच्या सुशोभिकरणाचे भूमिपूज वायकर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यावेळी या उद्यानांमध्ये वृक्षारोपण करण्यात येणार आहे. त्याचबरोबर रक्तदान शिबीराचेही आयोजन करण्यात आले आहे. (1.35 crore Spent on beautification of two parks in Mumbai, BhumiPujan on Sunday on occasion of Aditya Thackeray birthday)

मुंबईचं फुप्फुस अशी ओळख असलेल्या गोरेगाव (पूर्व) येथील आरे चेक नाक्याजवळ रविंद्र वायकर यांनी शहीद तुकाराम ओंबळे तसेच स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या स्मरणार्थ आमदार निधीतून दोन भव्य मनोरंजन उद्याने उभारली. या दोन्ही उद्यानांमध्ये मुंबईच्या विविध भागांतील जनता येत होती. परंतु काही कारणांमुळे ही दोन्ही उद्याने गेली काही वर्ष आरे प्रशासनाने बंद ठेवली आहेत. या उद्यानांच्या निर्मितीसाठी शासनाने लाखो रुपये खर्च केले असून ती बंद न ठेवता नागरिकांसाठी खुली करण्यात यावी, असे पत्र वायकर यांनी आरे प्रशासनाला दिले होते. एवढेच नव्हे तर आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनानुसार पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय मंत्री सुनिल केदार यांच्या अध्यक्षतेखाली आरेतील प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत या उद्यानांबाबत चर्चा करुन ती जनतेसाठी खुली करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

पर्यटन, पर्यावरण, राजशिष्टाचार तसेच मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री आदित्य ठाकरे यांचा रविवारी वाढदिवस आहे. या दिवसाचे औचित्य साधत आरे चेक नाक्याजवळील शहीद तुकाराम ओंबळे तसेच स्वातंत्र्यवीर सावरकर या उद्यानांचे नव्या रुपात सुशोभिकरण करुन ती नागरिकांसाठी खुली करण्यासाठी रविवार 13 जून रोजी सकाळी 10 वाजता या दोन्ही उद्यानांच्या सशोभिकरणाच्या कामाचे भूमिपूजन तसेच वृक्षारोपणाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे.

1.35 कोटी रुपयांचा खर्च

शहीद तुकाराम ओंबळे उद्यानाच्या सुशोभिकरणासाठी 60 लाख रुपये तर स्वातंत्र्यवीर सावरकर उद्यानाच्या सुशोभिकरणासाठी 75 लाख रुपयांची तरतुद आमदार निधीतून करण्यात आली आहे. याच दिवशी शिवसेनेच्या शाखा क्रमांक 52 आणि 53 च्या वतीने रक्तदान शिबीराचेही आयोजन करण्यात आले आहे.

इतर बातम्या

वनजमिनीवरील चाळींचं सर्वेक्षण करा, मालवणी दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रवीण दरेकरांची मागणी

मुंबईला पावसाने पुन्हा झोडपले, मिठी नदीचं पाणी रेल्वे रुळावर, मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प!

Mumbai Rains: मोदी सरकारमुळेच मुंबई तुंबली, शिवसेना खासदाराचा दावा

(1.35 crore Spent on beautification of two parks in Mumbai, BhumiPujan on Sunday on occasion of Aditya Thackeray birthday)

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.